ETV Bharat / state

पुणतांबा रेल्वे स्थानक 'जंक्शन' असूनही रेल्वेला थांबा नाही; स्वातंत्र्यदिनी 'रेल्वे रोको' आंदोलनाचा दिला इशारा - Puntamba Junction - PUNTAMBA JUNCTION

Puntamba Railway station : पुणतांबा रेल्वे स्थानकावर (Puntamba Railway Station) जलद गाड्यांना थांबा मिळावा यासाठी ग्रामस्थांच्या वतीनं 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) दिवशी 'रेल्वे रोको आंदोलन' (Rail Roko Protest) करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. याबाबचं निवेदन पुणतांबा रेल्वे स्थानक व्यवस्थापक पी.के ठाकूर यांना देण्यात आलंय.

Puntamba Railway station
पुणतांबा रेल्वे स्थानक (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 30, 2024, 10:50 PM IST

अहमदनगर (शिर्डी) Puntamba Railway station: मनमाड दौड रेल्वे मार्गावरील अहमदनगर जिल्ह्यातील 'पुणतांबा' हे रेल्वे स्थानक (Puntamba Railway Station) इंग्रज काळापासून महत्वाचे स्थानक म्हणून ओळखले जाते. पुर्वी शिर्डीला येण्यासाठी या स्थानकाचा उपयोग केला जायचा. कालांतरानं पुणतांबा ते शिर्डी असा रेल्वे मार्ग टाकल्यानं हे स्थानक जंक्शन झाले. कोविड काळापूर्वी येथे पँसेजर आणि काही मेल गाड्याही थांबत होत्या. मात्र, कोविड काळात बंद केलेला रेल्वे थांबा कोविड निर्बंध उठल्यानंतरही तसाच सुरु राहिल्यानं पुणतांब्याहुन रेल्वे मार्ग बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचं डॉ. धनंजय धनवटे यांनी सांगितलं आहे.

माहिती देताना डॉ. धनंजय धनवटे (ETV BHARAT Reporter)

'रेल्वे रोको आंदोलन' करणार : पुणतांबा रेल्वे स्थानकावर डेमु आणि एक्सप्रेस गाड्यांचा थांबा पुन्हा सुरु करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी रेल्वे मंत्रालयाकडं मागणी केली. मात्र, त्याकडं दुर्लक्ष केलं गेलं. मागण्या मान्य होत नसल्यानं आता पुणतांबेकर आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांनी ग्रामसभा घेत सर्व रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठी या प्रमुख मागणीसह इतर मागण्याच्या पूर्तेतेसाठी येत्या 15 ऑगस्ट रोजी 'रेल्वे रोको आंदोलन' करण्यात येणार असल्याचं निवेदन रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती, डॉ. धनंजय धनवटे यांनी सांगितली.

रेल्वे स्थानक व्यवस्थापकांना दिलं निवेदन : 15 ऑगस्ट रोजी आंदोलनाची दिशा कशी असेल त्यात काय करायचं याबाबत चर्चा करून आपल्या गावच्या आर्थिक धोरणाच्या दळणवळणाच्या माध्यमातून हातभार लागणार आहे. त्यासाठी सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, ग्रामपंचायत ठराव घेऊन मागण्या मान्य करण्याचं निवेदन पुणतांबा येथील रेल्वे स्थानक व्यवस्थापक पी.के ठाकूर यांना दिले. याचबरोबर निवेदनाच्या प्रती जिल्हा अधिकारी अहमदनगर, अहमदनगर जिल्हा पोलिस प्रमुख, रेल्वे पोलीस फोर्स, केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, पुणे विभाग व्यवस्थापक यांच्यासह स्थानिक खासदार, आमदार यांना पुणतांबा पंचक्रोशीतील ग्रामपंचायत ठराव प्रतीसह सह्याचे निवेदन देण्यात आले आहे.

हेही वाचा -

  1. मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची शिफारस; ब्रिटीशकालीन पाऊलखुणा पूसणार - Mumbai Railway Stations Rename
  2. हावडा सीएसएमटी एक्सप्रेस अपघातग्रस्तांना 50 हजारांची मदत, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल - Howrah Mumbai Train Accident
  3. वेटींग तिकिटावर स्लीपरमध्ये प्रवास करत असाल सावधान! रेल्वेनं लागू केले 'हे' नियम - Railway ticket news

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.