ETV Bharat / state

सिंगापूरहून मतदानाचा हक्क बजावण्याकरिता आले पुण्यात; यादीत नाव नसल्यानं व्यक्त केला संताप - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : चौथ्या टप्प्याच्या मतदानाला आज (13 मे) सकाळपासून सुरुवात झाली आहे. मात्र, मतदारयादीतील घोळ अद्यापही कायम असल्यानं अनेक मतदान केंद्रांवर गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय. तसंच निवडणूक आयोगाच्या या गोंधळामुळं मतदारांमधून नाराजीचा सूर ऐकायला मिळतोय.

Lok Sabha Election Pune Constituency voters angry over missing names in Election Commission List
मतदार यादीत घोळ (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 12:33 PM IST

पुणे Lok Sabha Election 2024 : अठराव्या लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्याच्या मतदानाला आज (13 मे) सकाळपासून सुरुवात झाली आहे. देशातील 10 राज्यांमधील 96 मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यात महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, रावेर, जालना, मावळ, अहमदनगर, पुणे, शिरुर, शिर्डी, बीड आणि औरंगाबाद या 11 मतदारसंघांचा समावेश आहे. तर आज सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांची मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.

पुण्यात देखील आज सकाळपासून मोठ्या उत्साहात मतदानाला सुरूवात झालीये. मात्र, असं असताना मतदार यादीतील घोळ अद्यापही कायम असल्यानं अनेक मतदान केंद्रांवर गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. तर काही मतदारांना आपलं नाव मतदान यादीत आढळून न आल्यानं, त्यांना आल्या पावली माघारी जावं लागलंय. त्यामुळं मतदारांमधून नाराजीचा सूर ऐकायला मिळतोय.

मतदानासाठी सिंगापूरहून आले पुण्यात : पुण्यात मतदान करण्यासाठी बाहेर देशातूनदेखील नागरिक येत आहेत. मात्र, निवडणूक आयोगाच्या यादीतून नाव वगळल्यानं या नागरिकांना मतदानाला मुकावं लागतंय. सिंगापूरहून पुण्यात आलेल्या श्रेयश कुलकर्णी यांनासुद्धा मतदान यादीत नाव नसल्यामुळं मतदानाचा हक्क बजावता आला नाही. त्यामुळं बाहेर देशातील लोकांना मतदान करता यावं, अशी व्यवस्था इथल्या लोकांनी उभी करणं गरजेचं असल्याची भावना कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

पुढं ते म्हणाले की, "मी केवळ मतदान करण्यासाठीच सिंगापूरहून पुण्यात आलो होतो. यापूर्वीही मी सात ते आठ वेळा मतदान केलंय. मात्र, मागच्या वेळी माझं येणं शक्य झालं नव्हतं. त्यामुळं कदाचित मतदार यादीत माझं नाव आलं नाही. सिंगापूरहून येण्याआधी मला मतदानासंदर्भात काही मेसेज आले होते. मात्र, ते सर्व बनावट असल्याचं मला एका अधिकाऱ्यानं सांगितलं. तसंच आता दुसरा फॉर्म भरल्यानंतरच मला पुढच्या वेळेच मतदान करता येईल, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं."

हेही वाचा -

  1. अनवाणी पायांनी मतदान केंद्रात जात पद्मश्री राहीबाई पोपेरेंनी बजावला मतदानाचा हक्क - Lok Sabha Election 2024
  2. रावसाहेब दानवे, सुजय विखे पाटील यांच्यासह ‘या’ नेत्यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क - Lok Sabha Elections 4th Phase
  3. देशातील 96 जागांवर मतदान; 5 केंद्रीय मंत्र्यांसह अनेक दिग्गज रिंगणात, ओवैसी, किशन रेड्डींसह अल्लू अर्जुननं केलं मतदान - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.