ETV Bharat / state

भरधाव वेगातील आलिशान कारची दुचाकीला धडक, पार्टीहून परतणाऱ्या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू - Pune Accident - PUNE ACCIDENT

Pune Accident News : पुण्यातील कल्याण नगर परिसरात शनिवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगानं धावणाऱ्या आलिशान गाडीनं दुचाकीला धडक दिल्यानं दोघांचा जागीच मृत्यू झाला.

pune news 2 people died after car and bike accident in pune kalyaninagar road accused arrested by yerawada police
पुण्यात भरधाव गाडीनं दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 19, 2024, 1:10 PM IST

पुणे Pune Accident News : पुण्यामध्ये भरधाव कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात ही घटना घडली आहे. पार्टी करून घराच्या दिशेनं जात असताना दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीला भरधाव वेगातील आलिशान कारनं धडक दिली. या अपघातात तरुण-तरुणीलाचा जागीच मृत्यू झाला.

अकिब रमजान मुल्ला यांनी दिलेल्या फिर्यादनूसार येरवडा पोलिसांनी 17 वर्षीय अल्पवयीन कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतलंय. सदरील घटना शनिवारी मध्यरात्री 2:30 वाजेच्या सुमारास घडली. तर या अपघातात अनिस अवधिया आणि त्यांची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा जागीच मृत्यू झाला.

दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू : मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मित्रांसोबत बॉलर हॉटेलमध्ये पार्टी करुन घरी परतत होते. कल्याणीनगर-एअरपोर्ट रोडवर एका आलिशान गाडीनं एम.एच. १४ सी क्यु ३६२२ या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तेथील पाहणी केली. तसंच आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्यावर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या अपगातावेळी गाडीची स्पीड 200 च्या वर होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. मृत तरुण-तरुणी राजस्थानचे राहणारे होते.

हेही वाचा -

  1. नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात, आठ जण जागीच ठार, एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश
  2. Pune Accident News : पुण्यात हिट अ‍ॅंड रन! पीएमपीएल बस चालकानं दारुच्या नशेत दहा ते पंधरा गाड्यांना उडवलं, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
  3. Navale Bridge Accident : गुजरातला भुसा घेऊन निघालेला ट्रक अपघातानंतर नवले पुलावर पेटला, चार जणांचा होरपळून मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.