ETV Bharat / state

'पीएसआय' परीक्षा उत्तीर्ण होऊनही 'एमपीएससी'नं नोकरी नाकारली, तृतीयपंथी वीणा काशिदच्या संघर्षाला न्याय मिळणार का? - MPSC Rejected Transgender Job - MPSC REJECTED TRANSGENDER JOB

MPSC Rejected Transgender Job : सरकारी नोकरीत तृतीयपंथीयांना स्थान मिळावे, म्हणून वीणा काशिदनं महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) धाव घेतली. तिच्या बाजूनं निकाल आल्यानंतर एमपीएससीने अर्जामध्ये ट्रान्सजेंडरचा पर्याय ठेवला. वीणानं परीक्षा दिली. प्रिलीयम, मेन्ससह फिजीकलमध्येही उत्तीर्ण झाली. मात्र, तिला पीएसआयची नोकरी देण्यास एमपीएससीनं असमर्थता दर्शवली. काय आहे वीणा काशिदची व्यथा, जाणून घेऊया...

MPSC Rejected Job Transgender
वीणा काशिद (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2024, 9:25 PM IST

Updated : Aug 30, 2024, 10:03 PM IST

सातारा MPSC Rejected Transgender Job : पुरोगामी महाराष्ट्रात समाजातील उपेक्षितांसाठी आजवर अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले गेले आहेत. मात्र, समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडणाऱ्या ट्रान्सजेंडरना सरकार नोकरीत स्थान द्यायला अजुनही तयार नाही. याविरोधात लढा देत एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या साताऱ्यातील तृतीयपंथी वीणा काशिदला एमपीएससीनं नोकरी देण्यास नकार देत महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्वतःहून कोर्टात गेला आहे.

वीणा काशिदची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

संग्राम-मुस्कान संस्थेनं स्वप्नाला दिलं बळ : कराडची विद्यानगरी अर्थात सैदापूर गावच्या वीणा काशिदनं पोलीस उपनिरीक्षक होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. सांगलीत वेश्यांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या संग्राम-मुस्कान या संस्थेच्या मीना शिशू यांच्याशी वीणानं संपर्क साधला. वीणाची हुशारी पाहून त्यांनी एमपीएससीची तयारी करण्याचा सल्ला दिला. अर्थिक मदतही केली. त्यानुसार २०२३ मध्ये वीणा जळगावच्या दीपस्तंभ मनोबल स्पर्धा परीक्षा केंद्रात दाखल झाली. पोलीस उपनिरीक्षक पदासाठी अर्ज करण्याचं ठरवलं. परंतु अर्जात लिंग या लिहीताना मेल आणि फिमेल असे दोनच पर्याय होते. ट्रान्सजेंडरचा पर्यायच नव्हता.

एमपीएससीनं अंतिम यादीतून नाव वगळलं : सर्वोच्च न्यायालय आणि कर्नाटक सरकारच्या निर्णयाच्या आधारावर वीणानं महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) धाव घेत नोकर भरतीत ट्रान्सजेंडर हा पर्याय ठेवण्याची मागणी केली. मॅटनं वीणाच्या बाजूनं निकाल देताना अर्जात ट्रान्सजेंडर पर्याय ठेवण्याचे तसेच या वर्गासाठी स्वतंत्र मेरिट व आरक्षण देण्यास सांगितलं. त्यामुळे वीणाला एमपीएससीची देता आली. पहिल्याच प्रयत्नात वीणानं एमपीएससी क्रॅक केली. एकूण तीन ट्रान्सजेंडरनी ही परीक्षा दिली. त्यात वीणा काशिद उत्तीर्ण झाली. पीएसआय होण्याचं स्वप्न पूर्ण होताना दिसत असतानाच एमपीएससीनं जाहीर केलेल्या अंतिम यादीत नाव नसल्याचं समजताच वीणाला धक्का बसला.

लोकसेवा आयोगाची न्यायालयात धाव : "ट्रान्सजेंडरला पोलीस उपनिरीक्षक पदावर नेमणूक देऊ शकत नाही. त्यासाठी आरक्षणाची पॉलिसी बदलावी लागेल, या कारणावरून एमपीएसीनेच उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता वीणाचा उच्च न्यायालयात लढा सुरू झाला आहे. सगळ्या देशात ट्रान्सजेंडरच्या हिताचे निर्णय होत असताना महाराष्ट्र सरकारनं आमची फरफट सुरू ठेवली आहे. खरोखर महाराष्ट्र पुरोगामी आहे का?," असा सवाल वीणा काशिदनं केला.

आयटीआय इन्स्ट्रक्टर परीक्षेतही मिळवलं यश : तंत्रशिक्षण विभागाच्या वीजतंत्री (इलेक्ट्रीक इन्स्ट्रक्टर) पदासाठीची सरळसेवा भरतीची परीक्षाही ती उत्तीर्ण झाली आहे. त्यामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नेमणूक मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. वीणा ही ट्रान्स वुमन आहे. सैदापुरातील भगवान काशिद यांच्या कुटुंबात जन्मलेल्या वीणाचं नाव विनायक होत. विनायक लहान असताना वडील गेले. दहावीत असताना आईचंही निधन झालं. भाऊ आणि बहिणीनं आधार देत शिक्षणासाठी मदत केली. शिक्षण घेत असताना आपण वेगळे आहोत, असं त्याला जाणवायला लागलं.

लिंग बदलानंतर विनायकची झाली वीणा : कराडच्या गव्हर्मेंट कॉलेजमध्ये इलेक्ट्रीशियन डिप्लोमा करत असताना सतत विद्यार्थ्यांकडून हेटाळणी व्हायची. बायकी लक्षणे असल्याच्या टोमण्यांनी तो तणावाखाली असायचा. परंतु, भावंडांनी विनायकचं हे वेगळेपण मान्य केलं. त्याला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं. वाळवा तालुक्यातील साखराळे येथे आरआयटीमधून विनायकनं एम. टेक. केलं. २०१७ ते २०२२ या दरम्यान मुंबईत सलूनमध्ये त्यानं काम केलं. त्यानंतर विनायकने लिंग बदल करण्याचा निर्णय घेतला आणि विनायकची वीणा काशिद झाली. भविष्यात संधी मिळाली तर महाराष्ट्र पोलीस दलातील सेवेला आपलं प्राधान्य असेल, अशी प्रतिक्रिया तिनं दिली.

हेही वाचा

  1. 'गोकूळ' दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ; सत्ताधारी - विरोधक भिडले - Gokul Annual General Meeting
  2. यंदा गणेशोत्सवात 'पीओपी'च्या गणेश मूर्तींवर बंदी नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा मूर्तीकारांना दिलासा - POP Ganesh Murti Banned
  3. दोषींवर कारवाई होणारच, कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही- अजित पवार - Ajit Pawar Malvan Visit

Last Updated : Aug 30, 2024, 10:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.