ETV Bharat / state

महाराष्ट्रातील जनता संविधान वाचवण्याची लढाई ताकदीनं लढेल - पृथ्वीराज चव्हाण - PRITHVIRAJ CHAVAN ON CONSTITUTION

महाराष्ट्रात जे काही चाललंय, त्याविरोधात जनता प्रखर भूमिका घेईल, असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

PRITHVIRAJ CHAVAN ON CONSTITUTION
पृथ्वीराज चव्हाण (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2024, 10:57 PM IST

सातारा : शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करण्याचा संदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता. महाराष्ट्रात सध्या जे काही चाललं आहे, त्या विरोधात प्रखर भूमिका घेऊन संविधान वाचविण्याची लढाई जनता अधिक ताकतीनं लढेल. न्यायाचं, समतेच, बंधुत्वाचं राज्य आणि संविधान कधीही नष्ट होणार नाही याची काळजी घेईल, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

बाबासाहेबांचे संविधान जनता कधीही विसरणार नाही : कराडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान दिलं. ते आचरणात आणण्याची आपली जबाबदारी आहे. आजच्याच दिवशी डॉ. आंबेडकरांनी आपला पृथ्वीवरचा प्रवास थांबवला. परंतु त्यांचा विचार आणि त्यांनी देशाला दिलेलं संविधान हे या देशातील जनता कधीही विसरणार नाही."

पृथ्वीराज चव्हाण (Source - ETV Bharat Reporter)

महाराष्ट्रातील जनता प्रखर भूमिका घेईल : "संविधान वाचवण्याची लढाई ही कायमस्वरूपी आपल्याला लढावी लागेल, असं सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत रहा, या बाबासाहेबांच्या संदेशाच्या आधारे महाराष्ट्रातील जनता संविधान वाचविण्याची लढाई अधिक ताकतीनं लढेल. सध्या महाराष्ट्रात जे काही चाललंय, त्याविरोधात प्रखर भूमिका घेईल. न्यायाचं, समतेचं, बंधुत्वाचं वातावरण ठेऊन संविधान कधीही नष्ट होणार नाही, याची काळजी घेईल," असा विश्वासही पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

हेही वाचा

  1. काँग्रेसनं घेतली ईव्हीएमविरोधात लढा देणाऱ्या मारकडवाडी गावातली माती; राहुल गांधींना पाठवणार
  2. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचं निधन; शनिवारी होणार अंत्यसंस्कार
  3. रुसलेले शिंदे हसले, तरी भाजपामध्ये अजूनही फसलेले; एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.