वाशिम : वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी 21 ऑक्टोंबरला जाहीर केली आहे. या यादीत 16 उमेदवारांचा समावेश आहे. रिसोड मालेगाव विधानसभा मतदार संघातून प्रशांत गोळे यांना वंचितकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे वंचितनं रिसोड मालेगाव विधानसभा मतदार संघात उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे.
वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून 16 जणांची यादी : वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. या यादीत एकूण 16 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच वंचितकडून उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 21 ऑक्टोंबर रोजी जाहीर केलेल्या यादीत 16 उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदार संघातून प्रशांत गोळे यांच्या नावाचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य समितीनं ही उमेदवारी जाहीर केली आहे.
कोण आहेत प्रशांत गोळे : प्रशांत गोळे हे मागील अनेक वर्षापासून रिसोड विधानसभा मतदार संघात सक्रीय आहेत. 2019 च्या विधानसभेपूर्वी त्यांनी मतदार संघात जनसंपर्क अभियान राबवून विधानसभा लढवण्याची मनिषा व्यक्त केली. परंतु त्यावेळेस त्यांना वंचितकडून उमेदवारी मिळाली नव्हती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. परंतु विधानसभेपूर्वी त्यांनी पुन्हा वंचितमध्ये प्रवेश घेतला. त्यांचे वडील जिल्हा परिषदेत सभापती होते. आता त्यांना वंचितनं इथून उमेदवारी दिल्यानं रिसोड मतदार संघात चुरस वाढणार आहे.
कारंजा मानोऱ्यातून कुणाला संधी : वंचितनं उमेदवारांची उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. यापूर्वी वंचितनं वाशिम मतदार संघातून मेघा डोंगरे मनवर यांना उमेदवारी दिली. त्यांनतर आता रिसोडमधून प्रशांत गोळे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे. परंतु अद्यापही कारंजा मानोरा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे इथून कुणाला संधी मिळणार याकडं जिल्हावासीयांचं लक्ष लागून आहे.
हेही वाचा :
- विधानपरिषद क्रॉस वोटिंग प्रकरण; काँग्रेसच्या सात आमदारांवर कारवाई करणं चुकीचं : प्रकाश आंबेडकर - Prakash Ambedkar On Congress
- वंचितनं मुस्लिम उमेदवार दिला कारण..प्रकाश आंबेडकरांचा एआयएमआयएम थेट आरोप - Prakash Ambedkar
- 'संजय, कितना झूठ बोलोगे?'; प्रकाश आंबेडकरांचा ट्विट करून राऊतांवर हल्लाबोल - Prakash Ambedkar On Sanjay Raut