ETV Bharat / state

दारूच्या नशेत भाजवईसोबत झाला वाद, त्यानं तिला जागीच संपवलं - Brother Wife Murder Case - BROTHER WIFE MURDER CASE

Brother Wife Murder Case : दारूच्या नशेत दीरानं भावजयीचा खून केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरात घडली आहे. बबन गोविंद पवार असं आरोपीचं नाव असून मृत महिलेचं नाव सविता पवार आहे. या प्रकरणी राहाता पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.

Brother Wife Murder Case
महिलेचं हत्याकांड (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 10:07 PM IST

अहमदनगर Brother Wife Murder Case : गेल्या अनेक वर्षांपासून भावजयी सोबत एकत्रित राहणाऱ्या दीरानं दारूच्या नशेत भावजईचा खून केल्याची खळबळजनक घटना राहाता शहरात 15 चारी हद्दीत घडली आहे. यात सविता लहानु पवार (वय 40 वर्षे) या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेप्रकरणी राहाता पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी बबन गोविंद पवार याला पोलिसांनी जेरबंद केलं आहे.

सविताचा मारहाणीत मृत्यू : याबाबतचं वृत्त असं की, राहाता शहरात 15चारी हद्दीत प्रकाश जगताप यांच्या शेतात आदिवासी समाजाची काही कुटुंबं बाभळीची झाडं तोडून भट्टी लावून कोळसा बनविण्याचं काम करत होती. दरम्यान, शुक्रवारी आठवडी बाजार असल्याचं कारण देत बबन पवार आणि इतरांनी पगाराचे पैसे घेतले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री दारूच्या नशेत बबन गोविंद पवार याचे आणि मयत सविता लहानू पवार या दोघांमध्ये काहीतरी भांडणं झाली असावीत. या भांडणामध्ये आरोपी बबनने सविताला मारहाण केली. ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला.

सविताच्या खूनाचं रहस्य कायम : मयत सविताच्या डोक्यावर आणि कानशिलालगत गंभीर इजा झाल्यानं तसेच छातीवर जखमा झाल्यानं त्यात ती मृत पावली. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारील व्यक्ती त्यांना उठवण्यासाठी आले असता तिचा मृतदेह आढळला. आरोपी हा तेथून फरार झालेला होता. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती दिली असता पोलीस पथकानं घटनास्थळ गाठलं आणि तपास सुरू केला. पोलिसांच्या प्रयत्नामुळे आरोपीला काही तासाच्या आतच अटक केली गेली. सविताचा खून नेमका कोणत्या कारणानं केला, त्यामागची इतर कारणं काय याचा उलगडा पोलीस तपासात समोर येईल.

आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल : शेतमालक प्रकाश जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी बबन गोविंद पवार यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे हे करीत आहे.

हेही वाचा:

  1. गोरेगावात पती पत्नीचा आढळला मृतदेह; पत्नीची हत्या करुन पतीनं आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय - Goregaon Couple Found Dead
  2. उरण तरुणी हत्याकांड ; फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत बोलावलं भेटीला, अन् मग तिनं लग्नास नकार देताच निर्घृणपणे भोसकलं - Uran Girl Murder Case
  3. इमारतीवरुन ढकलून प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप ; न्यायालयानं हरियाणाच्या प्रियकराला ठोठावली पोलीस कोठडी - MBBS Student Murder Case

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.