ETV Bharat / state

बालिकेला छेडणाऱ्या रोडरोमियोला नागरिकांनी चोपलं; संतप्त जमावाची पोलिसांनाही धक्काबुक्की - Minor Girl Abuse In New Mumbai - MINOR GIRL ABUSE IN NEW MUMBAI

Minor Girl Abuse In New Mumbai : घराबाहेर कचरा टाकायला गेलेल्या बालिकेची छेडछाड करणाऱ्या नराधमाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. या प्रकरणी नराधम महेश लोखंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी ठोठावली आहे.

Abuse Minor Girl In New Mumbai
रोडरोमियोला नागरिकांनी चोपलं (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2024, 9:20 AM IST

नवी मुंबई Minor Girl Abuse In New Mumbai: दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींची छेडछाड करुन त्यांच्यावर अत्याचार होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. नवी मुंबई परिसरातील कळंबोली इथं अल्पवयीन बालिकेची छेड काढून तिचा घरापर्यंत पाठलाग करणाऱ्या रोड रोमिओला नागरिकांनी बेदम मारहाण केली. महेश लोखंडे असं नागरिकांनी बेदम चोपलेल्या रोड रोमिओचं नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. यामध्ये पोलिसांना देखील धक्काबुक्की करण्यात आली आहे. नराधम महेश लोखंडेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Minor Girl Abuse In New Mumbai
पोलीस ठाणे (Reporter)

काय आहे प्रकरण : 12 वर्षीय बालिका कचरा टाकण्यासाठी 30 ऑगस्टला घराबाहेर गेली. त्याचवेळी रोड रोमिओ महेश लोखंडे यानं संबंधित अल्पवयीन बालिकेला अडवलं. "तू खूप सुंदर दिसतेस, मला फार आवडते," असं म्हणत बालिकेचा तिच्या घरापर्यंत पाठलाग केला. या घटनेची माहिती पीडित बालिकेनं तिच्या आईला दिली. त्यानंतर पीडितेच्या आईनं या घटनेची माहिती तिच्या वडिलांना दिली. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी संबंधित रोड रोमियो महेश लोखंडे याचा शोध घेतला. त्याला नागरिकांनी बेदम चोपलं.

पोलिसांसमोरही नराधमाला दिला चोप : रोड रोमिओला नागरिकांनी चोपल्याची घटना माहिती होताच कळंबोली पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नराधम महेश लोखंडेला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतरही जमावातील चार-पाच अनोळखी नागरिकांनी नराधम महेश लोखंडेला मारहाण करणं सुरूच ठेवलं. यावेळी जमावानं पोलिसांना देखील धक्काबुक्की केली. या प्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली.

नराधमावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल : अल्पवयीन बालिकेची छेडछाड करुन, तिचा पाठलाग करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं नराधम महेश लोखंडे याला 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास कळंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल चौगुले हे करत आहेत.

हेही वाचा :

  1. तरुणीसमोर पॅन्ट काढणारा नराधम रिक्षा चालक अटकेत; रिक्षाच्या दोन आकड्यांवरुन लागला शोध - Rickshaw Driver Molestation Girl
  2. ठाण्यात पुन्हा २ वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण करुन लैंगिक अत्याचार, सात महिन्यात २३३ अल्पवयीन मुली नराधमांच्या भक्ष्यस्थानी - Sexually assault
  3. एक्स-रे काढण्यासाठी मुलीला काढायला लावले कपडे, घाटी रुग्णालयातील संतापजनक प्रकार; टेक्निशियनला अटक - Chhatrapati Sambhajinagar Crime

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.