ETV Bharat / state

भाजपाची 'जैसी करणी वैसी भरणी', विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका - Ambadas Danve Criticizes BJP

Ambadas Danve Criticizes BJP : भाजपाचा 'डीएनए' ओबीसींचा आहे असं म्हणत होते. मराठा समाज कधीही भाजपाचा मतदार नव्हता. जरांगे यांना एक आणि भुजबळ यांना वेगवेगळं सांगून लटकवतात. त्यामुळे त्यांना 'जैसी करणी वैसी भरणी' असते अशी टीका विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाजपावर केली.

Ambadas Danve Criticizes BJP
अंबादास दानवे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 15, 2024, 10:38 PM IST

छत्रपती संभाजीनगर Ambadas Danve Criticizes BJP : राज्यातील बँकामध्ये पीक कर्ज प्रकरणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. शेतकऱ्यांकडे लाच मागितली जात असून त्यांच्या कर्ज मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. राज्यात बोगस बी बियाणे यांची विक्री होत आहे, यावर कारवाई होत नाही. सर्व बोगस बी-बियाणे, गुटखा आणि ड्रग्स गुजरातमधून येत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला.

अंबादास दानवे भाजपावर टीका करताना (ETV Bharat Reporter)

गणवेश मिळाले नाहीत : विद्यार्थ्यांना गणवेश अद्याप मिळाले नसून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे गुत्तेदार आणि टक्केवारीसाठी राज्य चालवत आहे की काय? असा प्रश्न विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. शासकीय शाळांना राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने दोन गणवेश देण्याचे ठरविले होते. आज राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत, तरी पुढील दीड महिना सामान्य कुटुंबातील ४८ लाख विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार नाही. महायुती सरकारचे हे धोरण अक्षम्य दुर्लक्ष करणारे असून टक्केवारी आणि गुजराती गुत्तेदारांना पोसणारे असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दीड महिना गणवेश विना राहावे लागणार असून मे महिन्यातच त्यांना गणवेश मिळायला पाहिजे होते.

वंचित भाजपाची 'बी' टीम : वंचित बहुजन आघाडी हा पक्ष भाजपाची 'बी' टीम असल्याचं स्पष्टपणे आता लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून दिसून आलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी माझा पक्ष भाजपाची बी टीम नाही हे सांगून थकलो असल्याचं स्वीकारलं असून मत खाण्यासाठी ते महाविकास आघाडी विरोधात राजकारण करत असल्याचं जनतेला आता कळलं असल्याचं अंबादास दानवे म्हणाले. भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून सर्व गद्दार एकत्र केले. एवढं करूनही फक्त त्यांच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात १७ जागा निवडून आल्या. शिवसेना तुमच्या सोबत होती तेव्हा ४१ जागा निवडून येत होत्या. जनतेला भाजपाचे राजकारण आवडले नसून अशोक चव्हाण हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. भाजपाने ज्यांच्यावर आरोप केले तेच भाजपाचे नेते झाले, यामुळे मतदारांनी त्यांना धडा शिकवला असल्याचं दानवे म्हणाले.

मराठा आरक्षण अधिसूचना असेल तर स्वागत : राज्य सरकारने सगेसोयरे अधिसूचना जारी केली तर त्याचे स्वागतच आहे. आक्षेप सर्व अधिसूचनावर येत असतात. त्याचे योग्य पद्धतीने निराकरण शासनाने करावे, असा सल्ला दानवे यांनी दिला. आम्ही कोणतेही खोटे नरेटिव्ह सेट केले नाही. भाजपाचेच मंत्री अनंत्रकुमार हेगडे म्हणाले होते, आम्हाला घटना बदलायची आहे म्हणून ४०० जागा हव्या आहेत. यामुळे जनतेमध्ये रोष निर्माण झाला होता. ज्यामुळे भाजपाला जनतेने नाकारलं असल्याचं अंबादास दानवे म्हणाले.

हेही वाचा :

  1. अजित पवार भाजपासाठी 'नाकापेक्षा मोती जड'; पवारांना बाजूला कसं सारायचं? भाजपासमोर प्रश्न - Ajit Pawar
  2. माध्यमसम्राट रामोजी राव यांच्या पुतळ्याचं होणार अनावरण; भावी पिढ्यांना मिळणार प्रेरणा - Ramoji Rao statue unveiled
  3. शिंदे-फडणवीस-पवारांनी पाहणी दौऱ्यात वापरलेल्या रॉल्स रॉईसवर होता चक्क ट्रकचा नंबर, वाचा काय आहे ही भानगड - Rolls Royce number

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.