अहमदनगर Couple Suicide In Ahmednagar : तीन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या नवदाम्पत्यानं आपलं जीवन संपवल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना साकूरजवळील महालदरा इथं घडली असून वैभव आमले आणि स्नेहा आमले अशी या नवदाम्पत्याची नावं आहेत. वैभव आमले हे पुण्याजवळील चाकण इथं नोकरी करत असून दोन दिवसांपूर्वी ते आपल्या गावी आले होते. मात्र गावी परतल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीसह आत्महत्या केल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नवदाम्पत्यानं गळफास घेऊन केली आत्महत्या : वैभव आमले आणि स्नेहा आमले हे मल्हादरा इथलं दाम्पत्य चाकण इथं राहत होते. मागील दोन दिवसांपूर्वी हे दाम्पत्य आपल्या गावी परतलं होतं. मात्र साकूरजवळील महालदरा इथं रविवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास या नवदाम्पत्यानं आत्महत्या केली. ही बाब उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी या नवदाम्पत्यानं आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं. मात्र त्यांनी आत्महत्या का केली, याचं कारण अद्यापही समोर आलं नाही.
नवदाम्पत्यानं आत्महत्या केल्यानं परिसरात हळहळ : नवदाम्पत्यानं आत्महत्या केल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. यानंतर शेकडो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती घारगाव पोलिसांना कळताच तातडीनं घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर नवदाम्पत्यांचा मृतदेह संगमनेर येथील कुटीर रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या नवदाम्पत्यानं आत्महत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तीन महिन्यापूर्वीच झाला होता विवाह : वैभव आमले आणि स्नेहा आमले या दोघांचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. वैभव आमले हे पुण्यातील चाकण इथं नोकरीस होते. दोन दिवसांपूर्वी नुकतंच दोघंही आपल्या गावी साकूरला आले. मात्र अचानक दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊन जीवन संपवलं. मात्र या दोघांनी आत्महत्या का केली ? याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
हेही वाचा :
- Lover Couple Suicide : प्रेम प्रकरणाला घरच्या मंडळींचा विरोध...प्रेमी युगुलानं आत्महत्या करत संपवलं जीवन!
- Nanavare couple suicide case : ननावरे दाम्पत्याच्या आत्महत्या प्रकरणातील चारही आरोपींना कल्याण सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर
- Lover Couple Suicide : कोल्हापुरात सोशल मीडियावर स्टेटस ठेवत प्रेमीयुगलाची आत्महत्या, परिसरात मोठी खळबळ