ETV Bharat / state

राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का; अज्ञातांच्या हल्ल्यात भायखळा तालुकाध्यक्षांचा मृत्यू - Sachin Kurmi Murder - SACHIN KURMI MURDER

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय. अज्ञात व्यक्तींनी केलेल्या हल्ल्यात भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांचा मृत्यू झालाय. त्यामुळं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

NCP Ajit Pawar Group Bycualla Taluka President Sachin Kurmi died in fatal attack by unknown people
सचिन कुर्मी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2024, 11:23 AM IST

मुंबई : मुंबईतील भायखळा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी (Sachin Kurmi Murder) यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी कुर्मी यांना मृत घोषित केलं. या घटनेनंतर राजकारणात एकच खळबळ उडाल्याचं बघायला मिळतंय. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, या हत्येमागं कोण आहे? याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येतोय.

नेमकं काय घडलं? : भायखळा मधील म्हाडा कॉलनीच्या मागील परिसरात सचिन कुर्मी यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा सचिन कुर्मी जखमी अवस्थेत होते. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ सचिन कुर्मी यांना जे जे रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तेथील डॉक्टरांनी कुर्मी यांना मृत घोषित केलं. मध्यरात्री एकच्या सुमारास सचिन कुर्मी यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

हल्ल्याचं कारण अस्पष्ट : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर झालेला हल्ला हा राजकीय की वैयक्तिक कारणावरून झाला याविषयीची माहिती अद्याप समजू शकली नाही. सचिन कुर्मी यांच्या समर्थकांकडून तसंच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तर पोलिसांनी सदर प्रकरणी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.