ETV Bharat / state

विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतांवर सर्वच पक्षांचा डोळा: उद्धव ठाकरेंचं पारडं जड, समाजवादी पक्षाच्या आशाही उंचावल्या - Assembly Election 2024 - ASSEMBLY ELECTION 2024

Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयात मराठी-मुस्लिम मतांची बेरीज निर्णायक ठरलीय. त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मुस्लिम मतं आपल्याकडं वळवण्यासाठी महायुतीला शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

Assembly Election 2024
महाविकास आघाडी तसंच महायुतीमधील नेते (ETV BHARAT MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 20, 2024, 7:01 PM IST

मुंबई Assembly Election 2024 : शिवसेनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी झालेल्या भाषणात एकनाथ शिंदे तसंच उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकमेकांवर टीका केली. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला हिंदू, मराठी मतं पडली नसून मुस्लिम मतं पडल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी सर्व देशभक्तांची मतं शिवसेनेला मिळाल्याचा हल्लाबोल केला. विशेष म्हणजे या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांच्या जोरावर महाविकास आघाडीनं घवघवीत यश संपादन केलं आहे. त्यामुळं येत्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष राज्यात 35 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. मुस्लिम, अल्पसंख्याक मतांच्या जोरावर येणारी विधानसभा निवडणूक राज्यात गाजणार आहे, यावरून हे स्पष्ट होतय.

उद्धव ठाकरे यांच्यावर वारंवार टीका : 18 व्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं मुस्लिम मतांच्या जोरावर घवघवीत या संपादन केलं. याचा फटका महायुतीला मोठ्या प्रमाणात बसला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या हाताला साथ दिली. त्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्यावर वारंवार प्रहार करण्यात आला. परंतु महाराष्ट्रात बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे मुस्लिम मतदारांमध्ये उद्धव ठाकरे यांची विश्वासाहर्ता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. पूर्वापार काँग्रेस पक्षाकडे झुकलेला मतदार आपल्याकडे खेचण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांमुळे मुस्लिम समाज शिवसेनेपासून दूर होता. त्यांची काँग्रेसशी जास्ती जवळीक होती. तो मुस्लिम मतदार उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेशी सोडला गेला. राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांना मुस्लिम मतदार संघात मिळालेल्या आकडेवारीवरून हे सिद्ध झालं आहे.

मुस्लिम मतांबाबत उद्धव ठाकरेंचं पारडं जड : या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी 21 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 9 जागांवर त्यांनी विजय संपादन केला. त्यात मुस्लिम मतांचा वाटा 51 टक्क्यांपेक्षाही अधिक होता. त्यामुळं या मतांचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसलाय. मुंबईतील भायखळा, मुंबादेवी, कुर्ला, मानखुर्द, शिवाजीनगर, अनुशक्तीनगर या मुस्लिम बहुल मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारांना फटका बसला. त्यामुळं महायुतीचे उमेदवार यामिनी जाधव, राहुल शेवाळे, मिहिर कोटेचा, उज्ज्वल निकम यांना पराभव पत्करावा लागला. महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनाही मतांचा फायदा झाला. भाजपावर नाराज असलेले मुस्लिम मतदार आता उद्धव ठाकरेंच्या बाजूनं वळल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हेच चित्र राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मुस्लिम मतदारांना पुन्हा आपल्याकडं खेचण्यासाठी महायुतीला शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

समाजवादी पक्षाची ३५ जागांवर चाचपणी : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतांची महत्वकांक्षा सर्वच राजकीय पक्षांना असणार आहे. समाजवादी पक्षानंसुद्धा राज्यात याबाबत चाचणी सुरू केली आहे. समाजवादी पक्षाचे राज्यातील सर्व पदाधिकारी, राज्य कार्यकारीणी सदस्य, जिल्हाध्यक्षांची बैठक काही दिवसापूर्वी मुंबईत पार पडली. या बैठकीत समाजवादी पक्षानं उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकीत केलेल्या कामगिरीबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांचं अभिनंदन केलं. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये समाजवादी पक्षानं एकही जागा न लढवता ‘संविधान बचाव, तानाशाही हटाव’ या भूमिकेतून महाविकास आघाडीला मदत केली. मुस्लिम बहुल भागात महाविकास आघाडीला मदत करण्यात समाजवादी पक्षानं खारीचा वाटा उचलला होता. त्यामुळं राज्यातील सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. तसंच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत समाजवादी पक्षानं 35 जागा लढवण्याबाबत आढावा घेतला आहे. याबाबत समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार अबू आझमी यांनी एक प्रस्ताव तयार करून अखिलेश यादव यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असं सांगण्यात आलं.

'हे' वाचलंत का :

  1. गुजरातचे सोमेगोमे शिवसेनेला संपवू शकत नाही-संजय राऊत - Sanjay Raut Speech
  2. भाजपाविरोधात 21 जून रोजी काँग्रेसचे राज्यभर ‘चिखल फेको’ आंदोलन; नाना पटोले यांची घोषणा - Nana Patole On BJP
  3. 'ठाकरेंचा विजय ही तात्पुरती आलेली सूज, त्यांना हिंदुत्वाची लाज वाटते'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात - Eknath Shinde Speech

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.