मुंबई Munawar Faruqui Apologises Konkani People : स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीनं कोकणी माणसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद सर्वत्र उमटले. मराठी माणसाचा आणि कोकणी लोकांचा दणका पाहता अखेरकार मुनव्वर फारुकीला माफी मागावी लागली. याबाबत भाजपा नेते, आमदार नितेश राणे (Nitesh Ran) त्याचबरोबर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada sarvankar) यांनी आवाज उठवला होता.
कोकणावर खूप खूप प्रेम आणि माझी माफी❤️ pic.twitter.com/pUSPYuZ9Kf
— munawar faruqui (@munawar0018) August 12, 2024
आमदार नितेश राणे आक्रमक : स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीनं कोकणी माणसांबाबत एका शोमध्ये वादग्रस्त विधान केलं होतं. त्याचे पडसाद सर्वत्र उमटले. मुनव्वर फारुकीच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आमदार नितेश राणे आक्रमक झाले होते. "या फारुकी नावाच्या हिरव्या सापाला घरी जाऊन कोकणातले लोक कशी असतात हे सांगायला लागेल. त्यानंतर हा स्टॅण्डअपपण मालवणीत सुरू करेल", असा इशारा नितेश राणे यांनी दिला होता.
मालवणी हिसका दाखवायला लागेल : नितेश राणे यांनी मुनव्वर फारुकीचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. "मुनव्वर फारुकी नावाचा हिरवा साप, याची जीभ जरा जास्तच वळवळायला लागली. याला स्टॅण्डअप कॉमेडीमध्ये कोकणातल्या माणसांची टिंगल उडवण्याची एवढीच खाज असेल तर त्याच्या घरचा पत्ता आम्हालासुद्धा चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. त्याला मालवणी हिसका आता दाखवायला लागेल," असं म्हणत नितेश राणे यांनी फारुकीला दम दिला होता. त्यानंतर त्यानं माफी मागितली आहे.
फटके खाण्य अगोधर सरळ झाला..
— Nitesh Rane (@NiteshNRane) August 12, 2024
परत कोकण आणि हिंदुं बदल बोललास तर ..
direct action होईल !
जय कोकण
जय श्री राम 🚩 pic.twitter.com/Bnrqi03Sod
जो तुडवेल त्याला एक लाखांचं बक्षीस : मुनव्वर फारुकीच्या विधानाचा समाचार आमदार सदा सरवणकर यांनीही घेतला. त्यांनी 'एक्स'वर पोस्ट केलं की, "जर मुनव्वर फारुकीनं कोकणी माणसांची माफी मागितली नाही तर हा पाकिस्तान प्रेमी मुनव्वर जिथे दिसेल तिथे त्याला तुडवणार. कोकणी माणूस कसा तुडवतो हे याला समजू दे. तसेच याला जो तुडवेल त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस देणार." "येवो कोकण आपलंच असा, असं म्हणत स्वागत करणाऱ्या कोकणी माणसांबद्दल हे उपरे अशा पद्धतीची भाषा बोलतात," असंही सदा सरवणकर म्हणाले.
मला काही गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. काही दिवसांपूर्वी एक शो झाला होता. हा काही विनोदी शो नव्हता. एकमेकांबाबत जाणून घेण्याचा विषय होता. तेव्हा कोकण संबंधात विषय निघाला. मला माहिती आहे की तळोजामध्ये माझे खूप कोकणी मित्र राहतात. त्यांना वाटलं की, मी कोकण संदर्भात काही विनोदी बोललो. त्यांची चेष्टा केली. पण असं काही नाही. माझा हेतू तसा काही नव्हता. एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून मला कुठल्याही कोकणी माणसाला दुखायचं नव्हतं. पण मी मनापासून तुम्हा सर्वांची माफी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र - मुनव्वर फारुकी, स्टँडअप कॉमेडियन
मुनव्वर फारुकी नेमकं काय म्हणाला होता? : स्टँडअप कॉमेडी शो करत असताना मुनव्वर फारुकी हा प्रेक्षकांना “मुंबईतून सर्वजण आला आहात ना?”, असं विचारतो. तसेच "कुणी लांबून प्रवास करुन आला नाहीत ना?" असंही विचारतो. यावेळी प्रेक्षकांमधील एकजण आपण तळोजा येथून आलो असल्याचं सांगतो. त्यावर मुन्नवर बोलतो की, “अच्छा आज विचारलं प्रवास करुन आलात का? तर तळोजा म्हणून सांगत आहात. तळोजा मुंबईपासून वेगळा झाला. पण यांचे गाववाले जेव्हा यांना विचारतात की, कुठे राहतात? तर मुंबईत राहतात असं सांगतात. हे कोकणी लोकं सर्वांना चु** बनवतात," असं वादग्रस्त वक्तव्य मुनव्वर फारुकीनं केलं होतं. मुन्नवरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
हेही वाचा -