ETV Bharat / state

मुंबईत भरधाव वेगातील पोर्शची दुचाकींना धडक, बड्या उद्योगपतीच्या मुलाचा कारनामा - MUMBAI PORSCHE CAR ACCIDENT

मुंबईनगरीत भरधाव वेगातील पोर्श कारनं आज पहाटे 2 वाजून 40 मिनिटाला अनेक दुचाकींना धडक दिली. या प्रकरणी 19 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल झाला.

porsche car accident in mumbai, businessman son hits several two wheelers with porsche car
मुंबईत पोर्शे अपघात (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 8, 2024, 8:51 AM IST

मुंबई : पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणानंतर आता मुंबईतदेखील अशाच पद्धतीचा प्रकार घडलाय. मात्र, सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. पण असं असलं तरी यात अनेक दुचाकी गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

मुंबईच्या वांद्रे पश्चिम येथील साधू वासवानी चौकात रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेल्या दुचाकींना पोर्श कारनं जोरदार धडक दिली. मुंबईतील मोठ्या उद्योगपतीचा 19 वर्षीय मुलगा ही कार चालवत असल्याची माहिती समोर आलीय. तर ही कार चालवत असताना मुलगा नशेत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. तर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आले आहेत.

नेमकं काय घडलं?: मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या वांद्रे भागात शनिवारी पहाटे 2:40 वाजता हा अपघात झाला. ध्रुव नलीन गुप्ता (वय 19) हा त्याच्या मित्रांसोबत पोर्श कारमधून जात असताना वांद्रे भागातील साधू वासवानी चौका जवळील पदपथावर ही घटना घडली. इथं अनेक दुचाकी गाड्या पार्किंगमध्ये उभ्या होत्या. यावेळी जलद गतीनं येणाऱ्या पोर्श कारनं त्या दुचाकींना धडक दिली. सुदैवानं या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही.

गुन्हा दाखल : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाला तेव्हा कारमध्ये एक तरुणी आणि चार पुरुष होते. या अपघातानंतर उपलब्ध झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कारमधील पाचही जण अपघातानंतर खाली उतरताना दिसून आले. तसंच या कारमध्ये समोर बसलेली तरुणी बाटली काचेतून बाहेर फेकताना दिसत आहे. परंतु, ती बाटली खरंच दारूची होती का? यासंदर्भात अद्याप स्पष्टता नाही. अपघातानंतर ध्रुव गुप्ता याच्या रक्ताचे नमुने घेऊन ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सध्या ध्रुव विरोधात रॅश ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला नोटीस देखील बजावण्यात आलीय. तर कारचं स्टेरिंग जाम झालं असल्याकारणानं हा अपघात झाला, असं ध्रुवनं पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.

हेही वाचा -

  1. पोर्श कार अपघात प्रकरणावरुन सुनील टिंगरेंकडून शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "हिंमत असेल तर..."
  2. "तुम्ही खुनी आहात, कुठल्या तोंडानं मतं मागणार?"; सुप्रिया सुळेंचा सुनील टिंगरेंवर निशाणा - Supriya Sule On Sunil Tingre
  3. भरधाव कारनं 4 वाहनांना उडवलं; एका मुलीचा मृत्यू, थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद! - Car Accident

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.