ETV Bharat / state

कुर्ल्यातील आईनं लेकासह दिली 12वीची परीक्षा, दोघांनी मारली बाजी...सर्वत्र होतंय कौतुक - Son Mother HSC Result

Son Mother HSC Result : बोर्डानं मंगळवारी 12वी परीक्षेचा निकाल जाहीर केला. एका आईची जिद्द काय असते हे कुर्ल्यातील गीता पासी (Geeta Passi) यांच्याकडं बघून समजतं. याचं कारण म्हणजे गीता आणि त्यांच्या मुलगा आर्यन या दोघांनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय.

Success Story
आई आणि मुलगा दोघेही उत्तीर्ण (Mumbai Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 22, 2024, 5:19 PM IST

प्रतिक्रिया देताना परीक्षा उत्तीर्ण आई आणि मुलगा (Mumbai Reporter)

मुंबई Son Mother HSC Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता 12वीचा निकाल मंगळवारी जाहीर केला. बोर्डाची 12वीची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 93.37 टक्के इतकी आहे. यावर्षी मुलींच्या उत्तीर्णतेचं प्रमाण 95.44 टक्के आहे, तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 91.60 टक्के आहे. याच परीक्षेला मुंबईच्या कुर्ल्यातील आई आणि मुलगा देखील बसले होते. या परीक्षेत दोघंही उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.

एका आईची जिद्द : असं म्हणतात माणूस आयुष्यभर शिकत असतो. शिकण्याचं कोणतंही वय नसतं. याचाच प्रत्यय कुर्ल्यातील या घटनेनं आलाय. या आईचं नाव 'गीता पासी' आहे. 2003 मध्ये वडिलांचं निधन झालं आणि घरातील जबाबदारी गीता यांच्या खांद्यावर पडली. त्यानंतर 2004 मध्ये गीता पासी यांचा विवाह झाला. आधी वडिलांचा मृत्यू त्यानंतर लगेचच झालेलं लग्न यामुळं घर आणि संसाराची जबाबदारी गीता यांच्या अंगावर पडली. इच्छा असून सुद्धा त्यांना शिक्षण सोडावं लागलं. मात्र, गीता यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी कायम होती. एका आईची जिद्द काय असते याचा प्रत्यय गीता यांच्या संघर्षातून येतो.

मुलापेक्षाही आईनं मिळवले जास्त गुण : 'गीता पासी' आणि त्यांचा मुलगा 'आर्यन पासी' हे दोघेही बारावीच्या परीक्षेला बसले आणि दोघेही बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यात खास बाब म्हणजे मुलापेक्षाही आईनं जास्त गुण मिळवले आहेत. गीता यांचा मुलगा आर्यनला ५२ टक्के गुण पडले असून गीता यांना ५३ टक्के गुण पडले आहेत. गीता यांनी नेहमीच अभ्यासाला पसंती दिल्यानं त्यांनी कला शाखेत तर, आर्यन विज्ञान शाखेत चांगल्या गुणांनी पास झालाय. आर्यन चांगल्या गुणांनी पास झाला याचा मला अभिमान असल्याचं आई गीता सांगतात.

गीता यांना पतीची खंबीरपणे साथ : गीता यांनी सांगितलं की, मी आणि अर्यन एकत्र बसून अभ्यास करायचो. पूर्ण वर्षभर आम्ही याचं पद्धतीनं अभ्यास केला. यासाठी मी आणि माझ्या पतीनं घरातील कामे, नोकरी या रोजच्या दैनंदिन कामांची वाटणी करून घेतली होती. आमच्या तिघांमधील जो कोणी घरी लवकर येईल त्यानं घरातील सर्व कामं करायची, हे आमचं ठरलं होतं. त्यामुळं मी आणि आर्यन आम्हाला दोघांनाही अभ्यासाला वेळ मिळायचा. मी सकाळी लवकर उठून अभ्यास करायची तर आर्यन रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा. एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हणतात. मात्र, इथं एका यशस्वी स्त्रीमागे त्यांचे पती खंबीरपणे उभे राहिलेत.

जेव्हा मी मित्रांमध्ये असायचो त्यावेळी सर्वजण म्हणायचे तुझी आई या वयात कुठे अभ्यास करते? तेव्हा मी सर्व मित्रांना सांगायचो फक्त रिझल्ट लागू द्या, मग आपण बोलू. आज माझ्या आईनं माझ्यापेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. आता मी माझ्या मित्रांना फोन करतोय मात्र कोणीही फोन उचलत नाही. नावे ठेवणाऱ्या सर्वांची तोंडं बंद झाली आहेत. आर्यन, मुलगा

आईचा अभिमान आहे : मी दररोज कॉलेजला जायचो रोज थोडा थोडा अभ्यास केला. त्यामुळं मला फार मेहनत घ्यावी लागली नाही. मात्र, माझ्या आईनं कॉलेजला न जाता 17 नंबरचा अर्ज भरून शिक्षकांच्या प्राथमिक मार्गदर्शनानं आणि ऑनलाइन लेक्चर पाहून अभ्यास केला आहे. घरची सर्व जबाबदारी पार पाडून तिनं परीक्षेच्या काही दिवस आधी अभ्यासाला सुरुवात केली आणि माझ्यापेक्षा अधिक गुण मिळवले याचा मला अभिमान आहे.

पत्रकारितेत करणार करिअर : गीता पाशी यांना पुढे मास मीडियामध्ये शिक्षण घेऊन पत्रकारितेत करिअर करायचं आहे, तर मुलगा आर्यनला डॉक्टर होऊन लोकांची सेवा करायची आहे. घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून जोमानं अभ्यास करुन गीता पासी यांनी 25 वर्षानंतर यश मिळवल्यानंतर त्यांच्या सर्व कुटुंबातील सदस्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. मेहनत सार्थकी लागली असं त्यांच्या पतीचं म्हणणं आहे. याचबरोबर त्यांच्या या अभ्यासू वृत्तीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा -

  1. बारावी नापास, एमपीएससीच्या 30 मुख्य परीक्षा, अखेर भाऊसाहेब जाधव झाला पोलीस उपनिरीक्षक - Bhausaheb Jadhav Motivational Story
  2. Despite Partial Blindness : 75% अंध असूनही व्रजेशने दिली बारावीची परीक्षा, मिळवले 86.83% गुण, वाचा संपूर्ण बातमी
  3. CM Not Complete Promise : अपंगत्वावर मात करत दोन वर्षापूर्वी कृष्णाने 12 वीत मिळवले होते घवघवीत यश, आज ही सरकारी सुविधांपासून आहे वंचित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.