ETV Bharat / state

"...तर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये काढून घेईन", आमदार रवी राणांचं वादग्रस्त विधान - Ravi Rana On Ladki Bahin

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 12, 2024, 9:38 PM IST

Ravi Rana On Ladki Bahin : अमरावतीमध्ये आज महिलांना 'मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत मंजूर झालेल्‍या लाभार्थी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना रवी राणा यांनी वादग्रस्त केलंय. नेमकं काय म्हणाले रवी राणा? वाचा बातमी...

Ravi Rana On Ladki Bahin
Ravi Rana On Ladki Bahin (Source - Etv Bharat)

अमरावती Ravi Rana On Ladki Bahin : महायुती सरकारनं 2024च्या अर्थसंकल्पात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'ची घोषणा केली. राज्य सरकारने ही योजना जाहीर केल्यापासून महिलांचा या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. या योजनेवरुन बडनेरा मतदारसंघातील आमदार रवी राणा यांनी एक वादग्रस्त विधान केलंय. "जे मला आशीर्वाद देणार नाहीत त्यांच्या खात्यात येणारे पंधराशे रुपयेदेखील मी बंद करायला लावेन,"असे आमदार राणा यांनी म्हटलं.

1500 रुपये वापस घेणार : "लाडकी बहीण योजने'अंतर्गत सुरुवातीला दीड हजार रुपये मिळणार आहेत. तुम्ही मला भरभरून आशीर्वाद दिला तर दिवाळीनंतर या दीड हजार रूपयांऐवजी 3000 रुपयांची मागणी मी सरकारकडं करेन. जे मला आशीर्वाद देणार नाहीत, त्यांच्या खात्यात येणारे 1500 रुपये वापस घेणार." अशी धमकीच बडनेराचे आमदार रवी राणा यांनी बडनेरा मतदारसंघातील मतदार बहिणींना दिली.

सरकार देत राहतं पण... : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'चं प्रमाणपत्र वितरण सोहळा आज अमरावतीत आमदार रवी राणा यांनी घेतला होता. या कार्यक्रमासाठी हजारो महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात रवी राणा यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय. "ज्याचं खाल्लं त्याचं जागलं पाहिजे. सरकार देत राहतं. पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे. आपल्यासमोर कोणीही उभा राहतो, त्याची पर्वा करू नका. आपल्या सोबत जो उभा आहे, आपण त्याच्यासोबत राहावं." असंही रवी राणा यावेळी बोलताना म्हणाले.

आमदार यशोमती ठाकूर यांचा आक्षेप : आमदार रवी राणा यांनी केलेल्या विधानावर माजी मंत्री आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी आक्षेप घेतला आहे. त्या म्हणाल्या की, "आमदार रवी राणा यांच्या या वक्तव्यावरून लाडकी बहीण योजनेचा खेळ हा केवळ मतांसाठीच असल्याचा सरकारचा मनसुबा उघड झालाय. आमदार रवी राणा यांनी दिलेल्या धमकीचा आणि वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. 1500 रुपयांना भुलून महाराष्ट्रातील सुज्ञ आणि संवेदनशील महिला या महायुतीला निश्चितच आशीर्वाद देणार नाही."

हेही वाचा

  1. लाडकी बहीण योजनेचा अर्ज रिजेक्टेड की अप्रूव्हड?; 'नारीशक्ती दूत ॲप'वर असा तपासा अर्ज, पाहा व्हिडिओ - Ladki Bahin Yojana
  2. मुख्यमंत्र्यांची 'लाडकी बहीण' व्हायचंय? 'असा' दाखल करा ऑनलाईन अर्ज - Ladki Bahin Yojana

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.