ETV Bharat / state

वरळी हिट अँड रन प्रकरणात नवा ट्विस्ट, मिहीर शाहचा अल्कोहोल रिपोर्ट आला निगेटिव्ह - Worli hit and run case

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 8, 2024, 9:56 PM IST

Updated : Aug 8, 2024, 10:52 PM IST

वरळी हिट अँड रन प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. आरोपी मिहिर शाहचा अल्कोहोल अहवाल निगेटिव्ह आला आहे.

Worli hit and run case
वरळी हिट अँड रन प्रकरण (Etv Bharat File Photo)

मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. आरोपी मिहिर शाहचा अल्कोहोल अहवाल निगेटिव्ह आला आहे. वरळी परिसरातील अट्रिया मॉलसमोर रविवारी 7 जुलै रोजी पहाटे झालेल्या भीषण अपघातात कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला होता. बीएमडब्ल्यू कारनं दुचाकीला धडक दिल्यानं हा अपघात झाला होता. या अपघातातील मुख्य आरोपी मिहीर शाह नंतर विरार फाटा येथून अटक करण्यात आली होती. वरळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत मिहीर शाह अपघाताच्या वेळी कार चालवत होता. तसंच त्यानं मद्याचं सेवन केल्याचा आरोप होता. त्यानंतर मिहीर शाहचे रक्त आणि लघवीचे नमुने फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आले होते. हा फॉरेन्सिक अहवाल आज वरळी पोलिसांना प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर यांनी दिली.

अपघातानंतर मिहीर शहा फरार : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला 16 जुलै रोजी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. सर्व पुरावे तपासल्यानंतर न्यायालयानं मिहीर शाहला 30 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. 7 जुलै (रविवार) पहाटे वरळी परिसरात मिहीर शाहनं बीएमडब्ल्यू कार बेदरकारपणे चालवत एका जोडप्याला चिरडलं होतं. या अपघातात कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला होता तर, प्रदीप नाखवा जखमी झाले होते. हे दोघेही वरळी येथील रहिवासी आहेत. या घटनेनंतर मिहीर शाह फरार झाला होता.

मिहीरला 9 जुलैला अटक : घटनेच्या तीन दिवसांनी (9 जुलै) मिहिर शाहला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याला मंगळवारी (16 जुलै) शिवडी न्यायालयात हजर केलं होतं. मिहीर शाह हा शिवसेना नेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. अपघातानंतर मिहीर पळून गेला होता. तीन दिवस पोलीस त्याच्या मागावर होते. दाढी आणि केस कापून मिहिर फरार झाला होता. त्यानं त्याचा फोनही बंद केला होता. मात्र, 60 तासांच्या शोध मोहिमेनंतर गुन्हे शाखेच्या पथकानं त्याला अटक केली. त्याची आई आणि दोन मोठ्या बहिणींनी त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

'हे' वाचलंत का :

  1. अपघाताच्या रात्री मिहीर शाहनं बारमध्ये ढोसले मोठे पेग; रस्त्यात चार बिअरचे कॅन केले खाली - Mumbai BMW Hit And Run
  2. वरळी हिट अँड रन प्रकरणाचा 'सीन रिक्रियेट' होणार; आरोपी आणि ड्रायव्हरच्या जबाबात विसंगती - Worli Hit And Run Case
  3. पोलीस शोध घेताना आरोपी मिहीर टीव्हीवरून पाहायचा गुन्ह्याचा तपास, वरळी हिट अँड रनचा मुख्य आरोपी कसा पकडला? - Worli Hit and Run Case

Last Updated : Aug 8, 2024, 10:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.