ETV Bharat / state

शरद पवार यांनी 'तुतारी' हे चिन्ह विरोधकांना वाजवण्यासाठी घेतलं असावं- वडेट्टीवार - शरद पवार

Vijay Wadettiwar on Tutari: केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला 'तुतारी' हे चिन्ह दिलं आहे. या संदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ''शरद पवार यांनी तुतारी ही वाजवण्यासाठीच घेतली आहे. तुतारी वाजवून आणि मशाल पेटवून सत्ताधाऱ्यांना हाकलण्यासाठी चिन्ह घेतलं असावं'', असं ते म्हणाले आहे. आज ते नागपूर येथील निवासस्थानी बोलत होते.

Vijay Wadettiwar
वडेट्टीवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2024, 3:58 PM IST

विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

नागपूर Vijay Wadettiwar on Tutari : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी ते मनोहर जोशी यांच्या सोबतच्या काही जुन्या आठवणीत रमले. ''मला पहिल्यांदा आमदार तसेच महामंडळ जोशी सरांनीचं दिल्याचं ते म्हणाले आहेत. मी अनेक वर्षे त्यांच्यासोबत काम केलं. सर शिस्तीचे होते. पण, मनानं मात्र कोमल होते. त्यांनी बाळासाहेबांशी निष्ठा अखेरपर्यंत कायम ठेवली.

प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत येतील: ''वंचितला सोबत घेण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. ते जिथं म्हणतील तिथं चर्चा करू तशी आमची तयारी आहे. विश्वास आहे की, प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत येतील. अजून २७ फेब्रुवारी ही तारीख महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी निश्चित झालेली नाही. महाविकास आघाडीच्या बैठकीची तारीख ठरलेली नाही. बैठक निश्चित झाल्यावर प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण दिलं जाईल'', असं काँग्रेस नेते वडेट्टीवार म्हणाले.

माझी अनेक वर्षांची त्यांच्याशी ( मनोहर जोशी ) ओळख होती. सर मृदूभाषी, विद्वान आणि अभ्यासू नेते होते. कुठलंही काम वेळेत पूर्ण करणारे आणि वेळेत कुठेही जाणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख होती. मुंबईतील उड्डाणपूल, पुणे मुंबई एक्स्प्रेस वे हे जोशी सरांच्या काळातचं झालेत. महाराष्ट्राच्या इतिहासात उत्तम मुख्यमंत्री म्हणून ज्यांची नोंद आहे-विजय वडेट्टीवार

जागा वाटप अद्याप निश्चित नाही: '' महाविकास आघाडीची ही बैठक जागा वाटप संदर्भातील अखेरची नाही. अद्याप महायुतीनं जागा वाटप कुठेही जाहीर केलेलं नाही. आम्ही का घाई करावी? नऊ जागांचा तिढा अजून सुटलेला नाही, हे खरं नाही. फार कमी जागांबद्दल अडचण आहे. नेत्यांच्या बैठकीत तेही सुटेल'', असा आशावाद विरोधी पक्षनेत्यांनी व्यक्त केला.

आशिष देशमुख म्हणजे हवश्या, गवश्या, नवश्या: ''तीन पक्षातील नेत्यांची महायुतीमध्ये मोठी गर्दी झाली आहे. अनेकांना भाजपात त्यांची जागा सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे मविआकडे वळणाऱ्यांची यादी मोठी आहे. उपऱ्यांना उपरेगिरी सुचते. आशिष देशमुख स्वतः मागील दारातून आम्हाला भेटून जात आहे. उमेदवारी मागत आहे. हा हवश्या, गवश्या आणि नवश्या आहे'', अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केली.

हेही वाचा:

  1. बाळासाहेब ठाकरेंचं पत्र अन् जोशी सरांचा लगेच राजीनामा; जावयामुळं मुख्यमंत्रिपद गेलं?
  2. गाव तिथं 'कोहिनूर' स्थापन्याचं मनोहर जोशींचं होतं ध्येय; चार विद्यार्थ्यांपासून झाली होती सुरुवात
  3. "येणाऱ्या काळात एकट्याची... "; पंकजा मुंडेंचा इशारा कोणाला?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.