ETV Bharat / state

वांद्रे पश्चिममध्ये आशिष शेलारांची हॅट्ट्रिक होणार की हुकणार? शेलारांसमोर काँग्रेसचं आव्हान - BANDRA WEST CONSTITUENCY

वांद्रे पश्चिम मतदारसंघातील विद्यमान आमदार आशिष शेलार हे विजयाची हॅट्ट्रिक करणार की काँग्रेसचे आसिफ झकेरिया बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे.

Bandra West constituency
आशिष शेलार आणि आसिफ झकेरिया (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2024, 8:05 PM IST

मुंबई : वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार हे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी 2014 आणि 2019 ला वांद्रे पश्चिम मतदारसंघातून सलग दोनदा विजय मिळवलाय. यावेळी देखील भाजपातर्फे त्यांनाच उमेदवारी मिळालीय. त्यामुळे या निवडणुकीत आशिष शेलार विजयाची हॅट्ट्रिक करणार की काँग्रेसचे आसिफ झकेरिया हे त्यांचा पराभव करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वांद्रे पश्चिम उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचा भाग : या निवडणुकीत काँग्रेसने गेल्या निवडणुकीतील उमेदवार आसिफ झकेरिया यांनाच पुन्हा संधी दिलीय. या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे माजी खासदार प्रिया दत्त यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, पक्षाने प्रत्यक्षात माजी नगरसेवक आसिफ झकेरिया यांना उमेदवारी दिलीय. 2019 मध्ये झकेरिया विरुद्ध आशिष शेलार असा सामना झाला होता. 2024 मध्येदेखील आशिष शेलार यांच्याविरोधात पुन्हा एकदा आसिफ झकेरिया लढत होणार आहे. आसिफ झकेरिया तीन वेळा नगरसेवक होते. वांद्रे पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. या मतदारसंघात उच्चभ्रूंची संख्या लक्षणीय आहे. या मतदारसंघात मुस्लिम समाज आणि ख्रिश्चन समाजाची मतेदेखील मोठ्या प्रमाणात आहेत.

बाबा सिद्दिकींनी केली होती आमदारकीची हॅट्ट्रिक: वांद्रे मतदारसंघातून काँग्रेसतर्फे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांनी 1999, 2004 आणि 2009 अशा सलग तीन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली होती. मात्र 2014 मध्ये त्यांना आशिष शेलारांकडून पराभव पत्करावा लागला होता. तर 2014 व 2019 ला या मतदारसंघातून भाजपाचे आशिष शेलार विजयी झालेत. सिद्दिकींनी 2019 ला निवडणूक लढवली नाही. त्याऐवजी त्यांनी वांद्रे पूर्वमधून त्यांच्या मुलाला झिशान सिद्दिकीला उमेदवारी मिळवून दिली होती आणि त्यामध्ये झिशान यांचा विजय झाला होता. वांद्रे पश्चिम मतदारसंघात 2 लाख 87 हजार 025 एकूण मतदार आहेत.

2019 विधानसभा निवडणुकीचा निकाल
उमेदवार पक्ष मिळालेली मते
आशिष शेलार भाजपा 74,816
आसिफ झकेरिया काँग्रेस 48,309
इश्तियाक जहांगिरदार वंचित बहुजन आघाडी 3,312
नोटा 3,531
आशिष शेलार हे या निवडणुकीत 26 हजार 507 मताधिक्याने विजयी झाले होते.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत निकाल
उमेदवार पक्ष मिळालेली मते
आशिष शेलार भाजपा 74,779
बाबा सिद्दीकी काँग्रेस 47,868
विलास चावरी शिवसेना 14,156
नोटा 1,535
आशिष शेलार या निवडणुकीत 26 हजार 911 मताधिक्याने विजयी झाले होते.
२००९ विधानसभा निवडणुकीचा निकाल
उमेदवार पक्ष मिळालेली मते
बाबा सिद्दिकी काँग्रेस 59,659
आशिष शेलार भाजपा 57,968
रहबर सिराज खान अपक्ष 5,132
बाबा सिद्दिकी या निवडणुकीत 1 हजार 691 मताधिक्याने विजयी झाले होते.

हेही वाचा

  1. अमित ठाकरेंचा दारोदारी जाऊन प्रचार सुरू, पण सदा सरवणकरही निवडणूक लढवण्यावर ठाम
  2. जरांगे पाटील 'येडा' माणूस; ओबीसी 'या' उमेदवारांना मतदान करणार नाही, लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.