ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत'च्या बातमीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेनं पालघरमधून राजेंद्र गावितांना दिली उमेदवारी, विलास तरे बोईसरमधून रिंगणात - RAJENDRA GAVIT JOINS SHIV SENA

'ईटीव्ही भारत'च्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाला. माजी खासदार राजेंद्र गावित यांना पालघरमधून शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली. त्यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला होता.

RAJENDRA GAVIT JOIN SHIV SENA
राजेंद्र गावित, एकनाथ शिंदे (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2024, 5:16 PM IST

Updated : Oct 27, 2024, 9:46 PM IST

पालघर : पालघर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीनं माजी खासदार राजेंद्र गावित यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यांचा शिवसेना पक्षात शनिवारी प्रवेश झाला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपानं हा मतदारसंघ शिवसेनेकडून ताब्यात घेतल्यानं गावित यांना थांबावं लागलं होतं. त्यावेळी भाजपानं त्यांचा पक्षप्रवेश करून घेऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द दिला होता. मात्र, भाजपाकडून पालघर जिल्ह्यातील एकाही विधानसभा मतदारसंघातून त्यांचं पुनर्वसन होण्याची शक्यता दिसत नसल्यानं त्यांनी पुन्हा शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं त्यांना पालघरमधून उमेदवारी मिळण्यावरही शिक्कामोर्तब झाला आहे.

शनिवारी केला पक्षप्रवेश : शिवसेनेत फूट पडल्यानंतर गावित यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. लोकसभेत उमेदवारी मिळत नसतानाही त्यांनी बंड केलं नाही. एकनाथ शिंदे यांना विचारूनच ते भाजपात गेले. आताही भाजपात पुनर्वसन शक्य नसल्यानं त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांशी चर्चा केलीय. महायुतीसाठी एक-एक जागा महत्त्वाची असल्यानं गावित यांच्या शिवसेना प्रवेशाला भाजपाचीही संमती होती, अशी चर्चा होती. शनिवारी गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून, त्यांची उमेदवारीही जाहीर झाली आहे.

वनगा यांची काढली समजूत : पालघर विधानसभा मतदारसंघातून गेल्या वेळी शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा निवडून आले होते. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांच्याबाबत पालघर विधानसभा मतदारसंघात नाराजी होती. शिंदे यांच्यासाठी पालघर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं शिंदे यांनी वनगा यांना बोलावून पुनर्वसन करण्याचा शब्द दिल्याची माहिती मिळाली आहे.

गावित यांच्या संपर्काचा फायदा : गावित यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात काम केलं. काँग्रेस, शिवसेना, भाजपा आणि पुन्हा शिवसेना असा प्रवास झाला असला, तरी त्यांनी कोणत्याही वरिष्ठ नेत्याला कधीच दुखावलं नाही. त्यांचा पालघर जिल्ह्यात चांगला संपर्क असून, त्यांची हक्काची मतपेढी आहे. सागरी, नागरी आणि डोंगरी या तीनही भागात चांगली संपर्क यंत्रणा असल्यानं त्यांच्या यंत्रणेचा फायदा शिवसेनेला मिळू शकेल. त्यामुळं त्यांची घरवापसी करून त्यांना उमेदवारी देण्याचे ठरवण्यात आलं होतं.

विकासकामांचीही साथ : गावित यांनी त्यांच्या काळात पालघर जिल्ह्यातील विविध विकासकामं मार्गी लावली. सातत्यानं जनतेत राहणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या प्रतिमेचा शिंदे यांनी उपयोग करून घेण्याचं ठरवलं आहे. शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी रविवारी जाहीर झाली असून, पालघर विधानसभा मतदारसंघातून गावित यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे, पालघरचे माजी आमदार विलास तरे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना बोईसर मतदारसंघातून शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केली आहे.

हेही वाचा

  1. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' उमेदवार रिंगणात
  2. भाजपा आमदार पुत्र तुतारीवर फुंकणार रणशिंग
  3. जयश्री थोरातांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Last Updated : Oct 27, 2024, 9:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.