ETV Bharat / state

महादेव अ‍ॅप प्रकरणी मुंबईसह देशभरात 17 ठिकाणी ईडीची छापेमारी

Mahadev App Scam : महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी ईडीकडून मुंबईसह 17 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. मुंबईसह पश्चिम बंगाल, दिल्ली आणि छत्तीसगड याठिकाणी छापेमारी करण्यात आलीय.

Mahadev App Scam
Mahadev App Scam
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 29, 2024, 6:56 AM IST

मुंबई Mahadev App Scam : महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी अंमलबाजवणी संचालनालयानं (ईडी) 17 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. बुधवार सकाळपासून ही छापेमारी करण्यात आली. महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणी ईडीनं देशभरात छापेमारी केली. पश्चिम बंगाल, दिल्ली एनसीआर, छत्तीसगड आणि मुंबईत तीन ठिकाणी ईडीची छापेमारी करण्यात आलीय. हवाला आणि एफडीआय गुंतवणूक प्रकरणी ही छापेमारीची कारवाई केली. महादेव अ‍ॅपच्या माध्यमातून आलेला पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवून तसंच टॅक्स सेव्हर देशात हा पैसे वळवून त्याला व्हाईट मनीमध्ये कन्व्हर्ट केल्याचं तपासात उघडकीस आल्यानं ही छापेमारीची कारवाई ईडीकडून देशभरात करण्यात आली.

महादेव बुक अ‍ॅप आणि लायन बुक अ‍ॅप : लायन बुक ॲपचं प्रमोशन बॉलीवूडमधील काही प्रसिद्ध कलाकारांनी केलं असून या प्रमोशनकरिता त्यांनी कोटींच्या घरात मानधन स्वीकारलंय. आता ही स्वीकारलेली रक्कम उघड झाली आहे. या सर्व कारणामुळं बॉलिवूडचे कलाकार आता ईडीच्या रडारवर आलं होते. लायन बुक अ‍ॅपची सक्सेस पार्टी गेल्या वर्षी 20 सप्टेंबरला दुबईतील एका हॉटेलमध्ये झाली होती. या पार्टीसाठी अनेक बॉलीवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली होती. संजय दत्त, सुनील शेट्टी, सोफी चौधरी, स्नेह उलाल, डेजी शहा आणि जॉर्जिया एड्रीयानी असे अनेक लायन बुक अ‍ॅपच्या सक्सेस पार्टीला कलाकार उपस्थित असल्याची चर्चा आहे.

अनेक बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती : बॉलीवूडमधील अभिनेते आणि गायकांनी महादेव बुक अ‍ॅपचे प्रमोटर चंद्रकार यांच्या लग्न सोहळ्याला दुबईमध्ये हजेरी लावली असल्याची माहिती देखील समोर आली. 2023 मध्ये फेब्रुवारी महिन्यात लग्न सोहळा पार पडला असून अभिनेता टायगर श्रॉफ, सनी लियोनी, गायक विशाल ददलानी आणि नेहा कक्कर या लग्न सोहळ्याला उपस्थित होते. त्याचप्रमाणे महादेव ॲपचं प्रमोशन केल्या संदर्भात गेल्या वर्षी अभिनेता रणबीर कपूरला ईडीनं समन्स बजावून रायपूर ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र त्यानं दोन आठवड्यांचा वेळ मागितला होता.

कलाकारांना मोठी रक्कम : महादेव अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन कॅसिनो आणि सट्टेबाजीसह अनेक बेकायदेशीर गोष्टी चालवल्या जातात. महादेव बुक अ‍ॅपच्या सक्सेस पार्टीनंतर दोन दिवसांनीच लायन बुक अ‍ॅपच्या सक्सेस पार्टीसाठी बॉलीवूड मधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यासाठी त्यांना मानधन म्हणून मोठी रक्कम देण्यात आली होती. ही रक्कम हवालामार्फत देण्यात आली असल्याचं ईडीच्या तपासात समोर येत आहे. त्यामुळं आता महादेव बुक अपनंतर लायन बुक अ‍ॅप ईडीच्या रडारवर आलं. त्यानंतर खिलाडी अँप देखील तपास यंत्रणांच्या रडारवर आहे.

हेही वाचा :

  1. महादेव अ‍ॅप प्रकरणात असीम दासने पुन्हा फिरवली साक्ष; भूपेश बघेल यांनी 508 कोटी घेतल्याचा केला दावा
  2. महादेव अ‍ॅप प्रकरण ; ईडीनं महादेव अ‍ॅप प्रकरणात दाखल केलं नवीन आरोपपत्र, 'या' तारखेला होणार सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.