ETV Bharat / state

नागपूर, रामटेक मतदारसंघात कोण मारणार बाजी? नितीन गडकरी मोठ्या मतांनी आघाडीवर - Lok Sabha Election Result 2024 - LOK SABHA ELECTION RESULT 2024

Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी 19 एप्रिलला मतदान केल्यानंतर तब्बल एक महिना 14 दिवसांनी मतमोजणी होत असल्यानं निवडणुकीत कोण जिंकणार, याची मतदारांमध्ये उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक या दोन्ही जागा भाजपासाठी प्रतिष्ठेच्या असल्यानं सर्वांचं लक्ष निकालाकडं लागलंय.

Lok Sabha Election Result 2024 Nagpur and Ramtek Constituency Counting Live Updates
नागपूर, रामटेक मतमोजणी (Source ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 9:38 AM IST

नागपूर Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणूक 2024 च्या मतमोजणीला सुरुवात झाली असून नागपूरसह रामटेक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एकाचं ठिकाणी होत आहे. कळमनाच्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात नागपूर आणि रामटेक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. दोन मतदारसंघाची मतमोजणी एकाच जागी होत असल्यानं पोलीस यंत्रणेवर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळेचं या संपूर्ण परिसरात तीन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नागपुर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात सहा-सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. विधानसभा निहाय मतमोजणीसाठी 20 टेबल लावण्यात आले असून नागपूर, रामटेक मध्ये एकूण 240 टेबलांवर ईव्हीएमची (EVM) मतमोजणी होत आहे. तर तात्पुरत्या पोस्टलच्या मतमोजणीसाठी प्रत्येकी 10 टेबल लावण्यात आले होते. दरम्यान, मतमोजणी सुरळीतपणे पार पडावी याकरिता दोन्ही मतदारसंघ मिळून साडेतीन हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 3 हजार पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

मोबाईल वापरास बंदी : मतमोजणी केंद्राला पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला असून सध्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या परीसरात त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. सीआरपीएफ, एसआरपीएफच्या सशस्त्र जवानांसह नागपूर पोलिसांचे जवान हे ठिकठिकाणी तैनात असल्याचं बघायला मिळतंय.

नागपूरसाठी 20 तर रामटेकसाठी 26 फेऱ्यांची प्रतीक्षा : नागपूर लोकसभेच्या निकालासाठी 20 व्या फेरीची तर रामटेक निकालासाठी 26 व्या फेरीची प्रतीक्षा करावी लागेल. प्रत्येक टेबलसाठी एक काउंटिंग सुपरवायझर, एक असिस्टंट आणि एक मायक्रो ऑबजरवर येथे उपस्थित असून यासोबतच उमेदवारांचे प्रतिनिधी सुद्धा येथे उपस्थित आहेत.

नागपूर 54.30 टक्के मतदान : नागपूर लोकसभेसाठी 54.30 टक्के मतदान झालं होतं. नागपुरात एकूण मतदारांची संख्या ही 22 लक्ष 23 हजार 281 आहे. त्यापैकी 12 लाख 7 हजार 344 मतदारांनी मतदान केलंय. यात 6 लाख 28 हजार 636 पुरुष मतदार आणि 5 लाख 78 हजार 680 महिला मतदारांचा समावेश होता.

रामटेकमध्ये 61 टक्के मतदानाची नोंद : याचप्रमाणे रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये 61 टक्के मतदान झालं होतं. रामटेकमध्ये 27 लाख 6 हजार 448 मतदारांपैकी 18 लाख 3 हजार 485 मतदारांनी मतदान केलं. सहा विधानसभा क्षेत्रापैकी रामटेकमध्ये सर्वाधिक मतदान झालं होतं.

हेही वाचा -

  1. बारामतीत नणंद विरुद्ध भावजय लढतीत कोण मारणार बाजी? लवकरच होणार निकाल स्पष्ट - Lok Sabha Election Result 2024
  2. खासदार होण्याकरिता सुरू आहे रस्सीखेच, तुम्ही निवडून दिलेल्या खासदाराला पगाराव्यतिरिक्त मिळतात 'या' सुविधा! - Lok Sabha Election Results 2024
  3. राज्यात मतमोजणीत कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर? मतमोजणीच्या फेऱ्या सुरू - Maharashtra lok Sabha election

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.