ETV Bharat / state

नामांकित कंपनीच्या बेबीफूडमध्ये आढळल्या अळ्या; बाळाला विषबाधा - Larvae Found In Baby Food - LARVAE FOUND IN BABY FOOD

Larvae Found In Baby Food : अमरावतीत नामांकित कंपनीच्या बेबीफूडच्या (Baby Food) पॉकेटमध्ये अळ्या आढळल्या. हे बेबीफूड खाल्ल्यानंतर दीड वर्षांचं बाळ आजारी पडलं. बाळाच्या आईने याविषयी संताप व्यक्त केला.

larvae Found In Baby Food
बाळाची आई आणि अळ्यांचा फाईल फोटो (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 28, 2024, 9:43 PM IST

अमरावती Larvae Found In Baby Food : नामांकित कंपनीचे बेबीफूड (Baby Food) खाल्ल्यामुळं विषबाधा होऊन दीड वर्षाच्या बाळाची तब्येत बिघडली. जगप्रसिद्ध कंपनी लहान मुलांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप पालकांनी केलाय. या संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागात तसेच पोलिसांत तक्रार करणार असल्याचं पालकांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलतांना सांगितलं.

बाळाला झाली विषबाधा : रविवारी दुपारच्या सुमारास बाळाची तब्येत अचानक बिघडल्यानं विक्रम ढोके यांनी बाळाला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी विषबाधा झाल्याचं सांगितलं. आईचं दूध आणि बेबीफूड व्यतिरीक्त आपण बाळाला कोणतेच अन्न देत नाहीत, अशी माहिती बाळाच्या आईनं दिली. रुग्णालयातून घरी आल्यावर त्यांनी बेबीफूड पाकीटची बारकाईनं पाहणी केली असता, त्यांना त्यात बारीक अळ्या आढळून आल्या.

कंपनीचे प्रॉडक्ट वादाच्या भोवऱ्यात : विक्रम ढोके यांनी त्यांच्या दीड वर्षाच्या बाळासाठी चार- पाच दिवसांपूर्वी नामांकित कंपनीचे बेबीफूड खरेदी केलं होतं. बेबीफूडमध्ये अळ्या आढल्यानं नामांकित कंपनीचे प्रॉडक्ट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

जगातील नावाजलेला ब्रँड : सदरील कंपनीचं बेबीफूड हे जगातील नावाजलेला ब्रँड आहे. या कंपनीचे उत्पादन भारतातच नाही तर संपूर्ण जगात विक्री केले जाते. जगभर जाळं पसरून व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या उत्पादनात अळ्या आढळून आल्यानं लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप पालकांनी केलाय.

बेबीफूडमध्ये जास्त साखर : या पूर्वी लहान मुलांचं दूध आणि बेबीफूडसारख्या प्रोडक्टमध्ये प्रमाणापेक्षा जास्त साखर असल्याचं निरीक्षण एका सामाजिक संस्थेद्वारे नोंदवण्यात आलं होतं. अधिकची साखर लठ्ठपणाला आणि इतर आजारांना आमंत्रण देत असल्याचं संस्थेनं सांगितलं होतं.

हेही वाचा -

  1. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; जिल्हा परिषद शाळेतील शालेय पोषण आहारातील चॉकलेटमध्ये आढळल्या अळ्या - Larvae Found In Millets Chocolate
  2. Nanded News: डी मार्टमध्ये चॉकलेटमध्ये निघाल्या अळ्या; चॉकलेटच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह
  3. धक्कादायक...! शेगावच्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांच्या जेवणात आढळल्या अळ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.