ETV Bharat / state

संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी कोल्हापूर महापालिका 'ॲक्शन मोडवर'; पंचगंगा नदीत केले प्रात्याक्षिके - Kolhapur News

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 27, 2024, 10:30 PM IST

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात 2019 ते 2021 साली आलेल्या महापुराचा (Floods) विचार करून, यंदाही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झालीय. आज अग्निशमन विभागाकडून अग्निशमन, शोध व बचाव कार्याची प्रात्याक्षिके पंचगंगा नदी घाट येथे सादर करण्यात आली.

Kolhapur News
कोल्हापूर महापालिका 'ॲक्शन मोडवर' (ETV BHARAT Reporter)

कोल्हापूर Kolhapur News : संभाव्य पूरपरिस्थितीचा (Floods) मुकाबला करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झालीय. आज पावसाळ्यापुर्वी अग्निशमन विभागाकडून अग्निशमन, शोध आणि बचाव कार्याची प्रात्याक्षिके पंचगंगा नदी घाट येथे सादर झाली. या प्रात्याक्षिकामध्ये अग्निशमन विभागाकडील आत्यधुनिक साधन सामुग्रींचे प्रत्याक्षिक प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्यासमोर मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे यांनी दाखविले.

प्रतिक्रिया देताना प्रशासक के.मंजुलक्ष्मी (ETV BHARAT Reporter)

आपत्ती काळात महापालिकेची यंत्रणा सज्ज : पुराच्या काळात आपत्ती येणार हे गृहित धरून महापालिका उपायोजना आणि नियोजन करत आहे. याचाच एक भाग म्हणून आज महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या साधन सामुग्रीच्या सर्व यंत्रणांचे प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे. पावसाळयापुर्वी शहरातील नाले सफाई, धोकादायक झाडे छाटणे, धोकादायक होर्डिंगवर, धोकादायक इमारतीवर कारवाई सुरु आहे. आपत्ती काळात महापालिकेच्या यंत्रणेसोबत महाराष्ट्र सोल्जर फोर्सचे 60 विद्यार्थी महापालिकेस आपत्ती काळात मदत करणार आहेत. शहरात कोणतीही आपत्ती आली तर त्याचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असलेचे सांगितले.

बचाव कार्य करण्याचं दिलं प्रशिक्षण : नदीमध्ये यावेळी प्रात्यक्षिका दरम्यान अग्निशमन विभागाकडं असलेल्या रबरी बोटीद्वारे एखादा व्यक्ती पाण्यात बुडल्यानंतर त्याला पाण्यातून लाईफ जॉकेट, फायबर इनर आणि दोरच्या सहाय्यानं कसं वाचवलं जातं याचंही लाईव्ह प्रत्याक्षिक दाखविण्यात आलं. त्याचप्रमाणं अग्निशमन विभागकडील कटर, स्प्रेडर, स्लॉप कटर, बी.ए.सेट, हायड्रोलिक जॉक, हायड्रालिक कटर, कॉम्प्रेसर, लिफ्टींग बॅग, लाईफ लाईन लाँचर, व्हिक्टम लोकेशन कॅमेरा आणि थर्मल इमेजिंग कॅमेरा, क्विक रिस्पॉन्स व्हेईकलचेही प्रात्याक्षिक दाखवण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सोल्जर फोर्स आणि नॅशनल फायर कॉलेज कोल्हापूर संस्थेकडील स्वंयसेवकांना अग्निशमन विभागाकडून आपत्ती कालीन कालवधीमध्ये बचाव कार्य करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं.

हेही वाचा -

  1. कोल्हापूरच्या अनेक गावात सव्वाशे वर्ष सुरू आहे 'ही' प्रथा, गावागावात का ओढला जातो 'मरीआईचा गाडा' - Kolhapur Village Tradition
  2. सलग 12 तास लाठी काठी फिरवत छत्रपती संभाजी महाराजांना मावळ्याचं अनोखं अभिवादन - Chhatrapati Sambhaji Maharaj
  3. राज्यातील मतदारांमध्ये 'अतिशय युनिक आळस', कोल्हापुरकरांनी सर्वाधिक मतदान करत दाखवला उत्साह - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.