ETV Bharat / state

राजकारणी खेळात लक्ष घालत असतील तर खेळाडूही राजकारण करु शकतात, कपिल देव यांचे उद्गार - Kapil Dev - KAPIL DEV

Kapil Dev : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांच्या हस्ते पुण्यातील रुग्णालयात ऑर्थोपेडिक सर्जरीसाठी अत्याधुनिक रोबोटिक टेक्नॉलॉजी लॉन्च करण्यात आली. याचं महत्तव कपिल देव यांनी सांगितलं. तसेच राजकारणात सजर खेळाडू जात असतील तर त्याचे स्वागतच त्यांनी केलं.

Kapil Dev
कपिल देव
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 17, 2024, 4:41 PM IST

Updated : Apr 17, 2024, 5:05 PM IST

कपिल देव

पुणे - Kapil Dev : गेल्या काही वर्षात देशाच्या राजकारणात खेळाडूंही सक्रिय होत असल्याच पाहायला मिळत आहे. याच खेळाडूंच्या राजकीय प्रवेशावर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, "जर राजकारणी व्यक्ती खेळांच्या व्यवस्थेत लक्ष घालत असतील तर खेळाडूंनीही राजकारणात का जाऊ नये", असा मार्मिक टोलाही राजकारण्यांना कपिल देव यांनी लगावला आहे.

"राजकारणी जर खेळात सहभागी होऊ शकत असतील तर खेळाडूंमीही राजकारात गेल्यास त्यात काय वाईट आहे. चांगले लोक राजकारणात चागले विचार घेऊन आले पाहिजेत. आपण प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे. त्यादिवशी सुट्टीच्या नावाखाली कोणी जर मतदानाला जाणार नसेल तर त्याच्यावर टीकाही झाली पाहिजे," असं कपिल देव यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

मणिपाल हॉस्पिटल, खराडी येथे पद्मभूषण कपिल देव यांच्या हस्ते उन्नत ऑर्थोपेडिक सर्जरीसाठी अत्याधुनिक रोबोटिक टेक्नॉलॉजी लॉन्च करण्यात आली. यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव बोलत होते.

यावेळी कपिल देव म्हणाले की, "चांगल्या राजकारण्याने हा देश चालवावा असं प्रत्येक नागरिकांना वाटत असेल तर मतदानाच्या या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन मोठया संख्येनं मतदान करणे गरजेचे आहे. तसेच जे मतदान करणार नाही त्यांना कोणतीही टीका करण्याचा अधिकार नाही", असे परखड मत यावेळी कपिल देव यांनी मांडलं.

कपिल देव पुढे म्हणाले की, "क्रिकेटमध्ये अधिक चांगल्या परफॉर्मन्ससाठी आम्ही सतत आमची उपकरणे आणि टेकनिक सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे, रोबोटिक असिस्टेड सर्जरीसारख्या हेल्थकेअर क्षेत्रातील प्रगतीमुळे ऑर्थोपेडिक समस्यांनी पीडित लोकांना उपचाराचे अधिक चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत. एक खेळाडू म्हणून मी सांध्याच्या दुखापतीचे परिणाम आणि त्यातून लवकर बरे होण्याचे महत्त्व समजू शकतो आणि मणिपाल हॉस्पिटलची ही नवीन रोबोटिक टेकनिक या शहरात उपलब्ध ऑर्थोपेडिकशी संबंधित उपचारांच्या पर्यायांमध्ये गेम-चेंजर आहे. ही टेकनिक जलद रिकव्हरी, कमी वेदना आणि सक्रिय जीवनशैलीत झपाट्याने परतणे शक्य करते."

हेही वाचा -

कपिल देवनं पूर्ण केलं 'लाल सलाम'चं डबिंग, रजनीकांतसोबत शेअर करणार रुपेरी पडदा

World Cup २०२३ : व्हिडिओ पुरावा नसलेला ऐतिहासिक सामना; कपिल देवनं ठोकल्या होत्या 175 धावा

बटलरच्या 'जोशा'पुढं कोलकाताचं 'नारायण'अस्त्र विफल; केकेआरकडून हिसकावला विजय - KKR vs RR

Last Updated : Apr 17, 2024, 5:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.