पुणे Lok Sabha Exit Poll : देशभरात झालेल्या लोकसभा निवडणुकीचं एक्झिट पोल समोर आले असून यात भाजपाप्रणीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळत आहे. तर राज्यात महायुतीला 25 ते 30 जागा तर महाविकास आघाडीला 20 ते 22 जागा मिळणार असल्याचं सांगितलं जातंय. अशातच राज्यात काय परिस्थिती होईल तसंच राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात कोण जिंकून येईल याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता लागली आहे. अशातच शनिवारी आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलबाबत तसंच राज्यात कोण जिंकून येणार याबाबत आमच्या प्रतिनिधींनी पुणे शहरातील ज्येष्ठ पत्रकारांशी संवाद साधलाय.
पाच टप्प्यांत झालं मतदान : लोकसभेच्या जागांच्या बाबतीत महाराष्ट्र उत्तर प्रदेशनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातील 48 जागांसाठी 5 टप्प्यांत मतदान झालं. पहिल्या टप्प्यात 5, दुसऱ्या टप्प्यात 8, तिसऱ्या टप्प्यात 11, चौथ्या टप्प्यात 11 आणि पाचव्या टप्प्यात 13 जागांवर निवडणूक झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट पडल्यानंतर ही महाराष्ट्रातील पहिलीच निवडणूक होती. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात लढत झाली.
एक्झिट पोलचे निकाल समोर : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 63.71 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 62.71 टक्के, तिसऱ्या टप्प्यात 63.55 टक्के, चौथ्या टप्प्यात 59.64 टक्के आणि पाचव्या टप्प्यात 54.33 टक्के मतदान झालं. राज्यात पाचही टप्प्यात 60.78 टक्के मतदान झालं. आता सर्वांचं लक्ष 4 जूनवर आहे, पण त्याआधी एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. यात महाराष्ट्रात कोणाचं पारडं जड आहे याचं काहीस चित्र स्पष्ट होतंय.
महाराष्ट्रातही महायुतीच : महाराष्ट्रात एनडीएला 31-35 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसंच विरोधी इंडिया आघाडीला केवळ 12-16 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये 2019 ची भाजपा पुन्हा पुनरावृती करताना दिसत आहे. 26 पैकी 26 जागांवर भाजपाला तिथं विजय अपेक्षित आहे. राजस्थानबद्दल बोलायचं झालं, तर येथे भाजपाला 23-25 जागा मिळताना दिसत आहेत. छत्तीसगडमध्ये भाजपाच्या खात्यात 10-11 जागा जाण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात भाजपाला 28-29 जागा मिळू शकतात. इथं इंडिया आघाडीला म्हणजेच काँग्रेसला 0-1 जागांवर समाधान मानावं लागेल.
महाराष्ट्रात 'एबीपी सी वोटर' एक्झिट पोल :
महायुती
- भाजपा : 17
- शिवसेना : 6
- राष्ट्रवादी : 1
महाविकास आघाडी
- शिवसेना उबाठा : 9
- काँग्रेस : 8
- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष : 6
- इतर : 1
हेही वाचा :