मुंबई Maharashtra ATS Head : नवल बजाज हे 1995 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते यापूर्वी सीबीआयच्या सहसंचालक या पदावर कार्यरत होते. नंतर त्यांना सीबीआयच्या सहसंचालक पदावरून मुक्त करण्यात आलं होतं; मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू असल्याने त्यांची नियुक्ती रखडली होती. पण अखेर त्यांची एटीएसच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बजाज यांनी या पदावर केलय काम : गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुखपद आता 1995 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी नवल बजाज यांना मिळाले आहे. नवल बजाज हे सीबीआयमध्ये सहसंचालक पदावर प्रतिनियुक्तीवर होते. सीबीआयमध्ये येण्यापूर्वी बजाज यांनी सीआयएसएफमध्ये पोलीस महासंचालक (आयजी) पदावरही काम केले होते. बजाज ऑक्टोबर 2020 मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख होते. ते परिमंडळ १ मध्ये डीसीपी (पोलीस उपायुक्त) म्हणून देखील त्यांनी कार्यभार पाहिला आहे. पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त पदही त्यांनी भूषवले आहे. 1990 च्या बॅचचे आयपीएस सदानंद दाते यांना मार्चच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रात एनआयए प्रमुख बनवण्यात आल्यापासून एटीएस प्रमुखाचे पद रिक्त होते. आता नवल बजाज हे पदभार सांभाळतील.
महाराष्ट्र केडरचा भाग म्हणूनही केले काम : नवल बजाज यांची बुधवारी महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. बजाज हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये पोलीस महानिरीक्षक म्हणून मे 2021 मध्ये प्रतिनियुक्तीवर केंद्रीय एजन्सीमध्ये रुजू झाले. जानेवारी 2022 मध्ये त्यांची केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) मध्ये सहसंचालक म्हणून बदली झाली. हा कार्यभार त्यांनी मे 2024 पर्यंत सांभाळला. महाराष्ट्र केडरचा एक भाग म्हणून बजाज यांनी मुंबईत पोलीस उपायुक्त (परिमंडळ १), अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त (विशेष शाखा) यासह अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांना महानिरीक्षकपदी बढती मिळाली आणि त्यांनी 2014 ते एप्रिल 2017 या कालावधीत नाशिक पोलीस अकादमीचे नेतृत्व केले.
कोकण क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक : एप्रिल 2017 ते मे 2019 पर्यंत बजाज यांनी कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक म्हणून काम केले. त्यानंतर नवल बजाज यांची मुंबई येथे बदली करण्यात आली. मुंबई पोलीस दलात प्रशासन विभागाचे सहपोलीस आयुक्त बनले. त्यांनी पहिल्या लॉकडाऊन दरम्यान ऑक्टोबर 2020 पर्यंत काम केले. त्यानंतर त्यांना बढती मिळाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
हेही वाचा:
- जगन मोहन रेड्डींच्या आलिशान राजवाड्यात 15 लाखाचा कमोड, बेडरूमची किंमत पाहून व्हाल थक्क - Jagan Mohan Reddy House Cost
- 'ठाकरेंचा विजय ही तात्पुरती आलेली सूज, त्यांना हिंदुत्वाची लाज वाटते'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात - Eknath Shinde Speech
- '...तर मी आतंकवादी आहे', वर्धापन सोहळ्यात उद्धव ठाकरे असं का म्हणाले? - Shivsena Foundation Day