ETV Bharat / state

आयफोन वापरकर्त्यांनो सावधान! त्वरित 'हे' करा काम, अन्यथा हॅकरच्या इशाऱ्यावर चालेल डिव्हाइस - Iphone users Alert - IPHONE USERS ALERT

Iphone users Alert : केंद्रीय एजन्सी CERT-in ने सर्व अ‍ॅपल वापरकर्त्यांना सावधानतेचा इशारा दिला. त्यासाठी काळजी घेण्यासाठी काही सूचनादेखील केल्या आहेत.

Iphone users Alert
संपादित फोटो (Source- ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 4, 2024, 5:51 PM IST

नवी दिल्ली Iphone users Alert : जगात आयफोन हे सर्वाधिक सुरक्षित मानले जातात. मात्र, आयफोन वापरकर्त्यांची चिंता वाढविणारी बातमी आहे. केंद्रीय एजन्सी CERT-in ला काही iOS सॉफ्टवेअर असलेल्या प्रोडक्टमध्ये अनेक त्रुटी निदर्शनास आलेल्या आहेत.

केंद्र शासनानं अलीकडेच दिलेल्या इशाऱ्यानुसार iPhone, iPad आणि इतर Apple प्रोडक्ट्समध्ये बऱ्याच त्रुट्या आढळून आलेल्या आहेत. याद्वारे संवेदनशील माहिती लीक होण्याची किंवा स्पूफिंग होण्याची शक्यता आहे. इंडियन कम्प्यूटर इमरजन्सी रिस्पांस टीमने (CERT-In) या त्रुट्या अत्याधिक गंभीर असल्याचं म्हटलं आहे. CERT-In ने 2 ऑगस्ट रोजी दिलेल्या सल्ल्यानुसार, अ‍ॅपल प्रॉडक्टमधील त्रुटींमुळे हॅकर्स संवेदनशील माहितीपर्यंत पोहोचू शकतो. यासह पासवर्ड क्रॅक करणे, सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नष्ट करणे, सर्व्हिस नाकारणे (DoS) आणि टार्गेटेड सिस्टिमवर हल्ला करण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

Iphone users Alert
केंद्र शासनातर्फे जारी सूचना (File Photo)

अ‍ॅपल सॉफ्टवेअरमध्ये 'या' त्रुटी चिन्हांकित : केंद्रीय एजन्सीने अ‍ॅपल सॉफ्टवेअर iOS आणि iPad वर्जन 17.6 आणि 16.7.9, macOS Sonoma वर्जन 14.6, macOS Ventura वर्जन 13.6.8, macOS Monterey एडिशन 12.7.6, watchOS वर्जन 10.6, tvOS वर्जन 17.6, visionOS वर्जन 1.3 आणि सफारी वर्जन 17.6 च्या आधीच्या त्रुटी यामध्ये चिन्हांकित करण्यात आल्या आहेत.

सॉफ्टवेअर अपडेट करावे : ''CERT-In'' ने अ‍ॅपल यूझर्सला हॅकर्सद्वारे संभवणाऱ्या धोक्यांपासून वाचण्यासाठी कंपनीद्वारे सूचीबद्ध आवश्यक सॉफ्टवेअर अपडेट करण्याचा सल्ला दिलाय. अ‍ॅपलने आतापर्यंत आपल्याकडून कोणत्याही प्रकारची सुरक्षितता निश्चित केलेली नाही. कंपनीने मागील आठवड्यात ''लेटेस्ट सिक्युरिटी अपडेट'' जारी केलेले आहेत. याची अधिकृत माहिती अ‍ॅपल कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

  • डिव्हाईसचे अ‍ॅक्सेस मिळविणे हॅकरला शक्य : ''CERT-In'' एजन्सीनं सांगितलं की, अ‍ॅपल कंपनीद्वारे निर्मित या डिव्हाइसमधील त्रुटींचा गैरवापर अ‍ॅक्सेस चोरण्यासाठी, सुरक्षा उपाययोजना नष्ट करण्यासाठी, माहिती उघड करण्यासाठी आणि तुमच्या डिव्हाइसवर फूल कंट्रोल मिळवण्यासाठी करणं शक्य आहे.

बचाव कसा कराल?: तंत्रज्ञान तज्ञांनी अ‍ॅपल डिव्हाईसच्या सर्व यूझर्सला संचार सेवेवर नियमितरीत्या लक्ष ठेवण्यास आणि दिलेल्या सर्व सल्ल्यांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगतिले आहे. असुरक्षित वेबसाईट न उघडणे, अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, फाईल्सचे अ‍ॅक्सेस इतरांना न देणे, सिक्युरीटी सिस्टिम अपडेट करणे, पासवर्ड मजबूत ठेवणे, नियमितरीत्या डेटा बॅकअप घेणे या उपाययोजनेतून अ‍ॅपल डिव्हाईसची सुरक्षा वाढवता येईल.

हेही वाचा :

  1. भविष्यातील कामगिरीसाठी AI सज्ज : ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सचा उपक्रम - Leveraging AI
  2. एआय तंत्रज्ञानामुळं देशात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या जाणार? आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवालात नेमकं काय म्हटलंय? वाचा सविस्तर - Economic Survey Report
  3. मायक्रोसॉफ्ट सेवा कशामुळं झाली प्रभावित, सायबर तज्ञ म्हणाले,... - Microsoft Outage Sparks

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.