ETV Bharat / state

इलेक्ट्रॉनिक बस अपघातांमध्ये वाढ, नेमकं जबाबदार कोण? - MUMBAI BEST BUS ACCIDENT

लोकल ट्रेन असेल किंवा बेस्ट बस सेवा या मुंबईच्या लाइफलाइन मानल्या जातात. पण बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रॉनिक बस आल्यापासून अपघातांचे प्रमाण वाढल्याने मुंबईकरांमध्ये भीतीच वातावरण आहे.

electronic bus accidents
इलेक्ट्रॉनिक बस अपघात (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2024, 6:17 PM IST

मुंबई - कुर्ला बस अपघातात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. चालकाला इलेक्ट्रॉनिक बस चालवण्याचा कोणताही अनुभव नसल्याचे पोलीस तपासात समोर आलंय. या अपघातामुळे सध्या बेस्टच्या सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, मुंबईकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. कोणतीही आपत्ती आली तरी त्यातून पुन्हा मुंबईकर उभा राहतो. मग ते वादळ असेल अथवा दहशतवादी हल्ला असो, यालाच मुंबईकरांचे स्पिरीट म्हणतात. मात्र, जेव्हा असे अपघात होतात तेव्हा त्याचा संपूर्ण मुंबईकरांवर परिणाम होतो. लोकल ट्रेन असेल किंवा बेस्ट बस सेवा या मुंबईच्या लाइफलाइन मानल्या जातात. पण बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रॉनिक बस आल्यापासून अपघातांचे प्रमाण वाढल्याने सध्या मुंबईकरांमध्ये भीतीच वातावरण आहे.

संजय मोरे कंत्राटी कामगार : कुर्ला अपघातावेळी सदर बसमधून तब्बल 60 प्रवासी प्रवास करीत होते. या अपघाताबाबत कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरणमल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बस चालक संजय मोरेने मद्यपान केले नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आलंय. हा अपघात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने घडला. आरोपी बस चालक संजय मोरे एक डिसेंबर रोजी बेस्ट बस चालक म्हणून रुजू झालाय. संजय मोरे कंत्राटी कामगार असून, त्याला अवजड वाहने चालवण्याचा कोणताही अनुभव नाही. संजय मोरेनं आतापर्यंत केवळ छोटी वाहने चालवली आहेत. सोमवारी 10 डिसेंबर रोजी संजय मोरेने पहिल्यांदाच बस मुख्य रस्त्यावर चालवायला घेतली. त्याचवेळी बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला.

बेस्ट बस मुंबईकरांची धमनी : ज्याप्रमाणे मुंबईत धावणाऱ्या रेल्वेच्या लोकल सेवेला मुंबईकरांची जीवन वाहिनी म्हटले जाते. त्याचप्रमाणे बेस्ट बस सेवेला मुंबईकरांच्या धमन्या म्हटले जाते. ट्राम पासून सुरू झालेली बेस्टची सुरुवात आज इलेक्ट्रॉनिक गाड्यांपर्यंत येऊन पोहोचली आहे. आज बेस्टच्या ताफ्यात दुमजली इलेक्ट्रॉनिक एसी बसदेखील आल्यात. मात्र, या खासगी कंत्राटदारांकडून घेतलेल्या इलेक्ट्रॉनिक बसची संख्या आजघडीला वाढल्यानंतर अपघातातदेखील तितकेच प्रमाण वाढलंय. बेस्टच्या अपघाताचे प्रमाण वाढल्याने 'बेस्टचा प्रवास सुरक्षित प्रवास' असा विश्वास असणाऱ्या बेस्टबाबत आज मुंबईकरांच्या मनात भीती आहे.

बेस्टच्या ताफ्यात कंत्राटी पद्धतीने इलेक्ट्रिक बस भरती : मुंबईकरांना प्रदूषणमुक्त, आरामदायी आणि स्वस्तात प्रवास करता यावा, यासाठी बेस्टच्या ताफ्यात कंत्राटी पद्धतीने इलेक्ट्रिक बस भरती करण्यात आल्यात. आजघडीला दररोज सुमारे 32 लाख प्रवासी बेस्ट बसने प्रवास करतात. बेस्टच्या अर्थसंकल्पानुसार, मार्च 2024 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात सुमारे 6 हजार बस असणार होत्या. पण आता या उलट होत असून, बसची संख्या कमी होत चालली आहे. सध्या मुंबईतील बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या बसेसची संख्या दीड हजारांहून कमी झालीय. बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या डिझेल बस होत्या. मात्र त्यांची मुदत संपल्याने त्या मोठ्या प्रमाणात भंगारात काढण्यात आल्या. याला उपाय म्हणून बेस्टच्या वतीने कंत्राटी पद्धतीने इलेक्ट्रिक बस सुविधा सुरू करण्यात आलीय. बेस्ट उपक्रमाच्या स्वतःच्या मालकीच्या डिझेल बसचा ताफा कमी झाल्यामुळे बेस्टने अनेक लांब पल्ल्याच्या फेऱ्या कमी केल्यात.

1,036 गाड्या बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या : आजच्या घडीला बेस्टच्या ताफ्यात एकूण 3,175 गाड्या असून, यातील 1,036 गाड्या बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत. तर 2,112 गाड्या बेस्टने कंत्राटी पद्धतीने घेतल्यात. बेस्टची दररोजची प्रवासी संख्या 34 लाखांहून अधिक असून, इलेक्ट्रिक बसचा सातत्याने अपघात होत असल्याने मुंबईकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मुंबईतील प्रदूषण कमी करणे आणि मुंबईकरांना प्रदूषण विरहित प्रवास करता येणे हा इलेक्ट्रॉनिक बसमागचा उद्देश होता. बेस्ट प्रशासनाला इलेक्ट्रॉनिक बस पुरवण्याचे कंत्राट आजघडीला मुंबईत सहा कंत्राटदारांना देण्यात आलंय. या कंत्राटदारांनी कोणत्या कंपनीच्या बनावटीच्या बस वापराव्यात याचा निर्णय कंत्राटदारांनी घ्यायचा असतो.

वाहकांची भरती मोठ्या प्रमाणात कंत्राटी पद्धतीनं : खरं तर बेस्ट बस मुंबईच्या रस्त्यांवरून चालवण्याचं काम बेस्टचे चालक आणि वाहक करत असतात. मात्र, या चालक आणि वाहकांची भरतीदेखील आज मोठ्या प्रमाणात कंत्राटी पद्धतीने झाल्याचे दिसून येतंय. बेस्टच्या ताफ्यात एकूण 7,212 चालक असून, 7423 वाहक आहेत. बेस्ट प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आजमितीस एकूण 7,212 चालकांपैकी 6,563 बस चालक कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेले आहेत. तर कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेल्या बस वाहकांची संख्या 2,340 इतकी आहे. बेस्ट प्रशासनाने दिलेली आणखी एक धक्कादायक माहिती अशी की, 2024-25 या वर्षात तब्बल 12 इलेक्ट्रॉनिक बसचे अपघात झालेत. म्हणजे आपण सरासरी महिन्याला एक अपघात म्हणू शकतो. यातील सर्वाधिक अपघात हे मे. ईव्ही ट्रान्स लिमिटेड या कंपनीच्या बसचे झालेत. या कंपनीच्या बसचे आठ अपघात झाले आहेत. सोबतच इलेक्ट्रा ग्रीन टेक लिमिटेड या कंपनीच्या बसचे दोन अपघात, तर टाटा कंपनीच्या बसचे दोन अपघात झालेत.

बसचा मेंटेनन्स राखणं ही जबाबदारीदेखील संबंधित कंत्राटदाराची : बेस्ट प्रशासनाची जनसंपर्क अधिकारी सुदास सावंत यांनी सांगितले की, बेस्ट प्रशासन जेव्हा या कंत्राटदारांसोबत कॉन्ट्रॅक्ट करते, तेव्हा त्या कॉन्ट्रॅक्ट पेपरमध्ये अनेक अटी, शर्ती आणि नियम घालून दिलेले आहेत. उद्या जर एखाद्या बसमध्ये काही बिघाड झाला तर त्याची पूर्ण जबाबदारी त्या संबंधित कंत्राटदाराची असते. बसचा मेंटेनन्स राखणं ही जबाबदारीदेखील संबंधित कंत्राटदाराची असते. एखाद्या बसचा अपघात होतो तेव्हा बेस्ट प्रशासनाकडून संबंधित कंत्राटदाराला 50 हजारांचा दंड ठोठावला जातो, तशी तरतूद या कॉन्ट्रॅक्ट पेपरमध्ये आहे.

चालक अन् वाहकांना प्रशिक्षणाची गरज : या संदर्भात आम्ही बेस्ट प्रशासनाचे जनरल मॅनेजर अनिल डिग्गीकर यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, आरटीओ आणि बेस्ट प्रशासन दोन्ही मिळून या प्रकरणाची चौकशी करीत आहोत. यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. भविष्यात असे अपघात घडू नयेत, यासाठी बेस्ट प्रशासन खबरदारी घेत आहे. या संदर्भात एक समिती गठीत करण्यात येत असून, बेस्टच्या सर्व चालक आणि वाहकांचे ऑडिट करण्यात येईल. यात ज्या चालक अन् वाहकांना प्रशिक्षणाची गरज आहे, त्यांना पुन्हा एकदा प्रशिक्षण दिले जाईल. चालकांचा वाहन चालवण्याचा अनुभवदेखील यावेळी लक्षात घेतला जाणार आहे.

हेही वाचा-

  1. नीट पेपर फुटीपासून कंगनाच्या कानशिलात लगावण्यापर्यंत 2024 मध्ये भारतात घडले सर्वात मोठे 12 वाद, नेमके कोणते? जाणून घ्या
  2. "मोदींच्या मदतीने देशाला लुटणाऱ्या अदानींच्या अटकेची राहुल गांधींची मागणी योग्यच", नाना पटोले कडाडले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.