ETV Bharat / state

पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन पतीनं प्रायव्हेट पार्टला लावलं खिळ्यानं छिद्र पाडून कुलूप, पिंपरी चिंचवडमधील भयानक प्रकार - inhuman act with wife

Inhuman act with wife पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती काय करेल सांगता येत नाही. अशीच एक भयानक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. पतीनं पत्नीच्या प्रायव्हेट पार्टलाच कुलूप लावलंय. वाचा नेमकं काय घडलं...

Inhuman act with wife
पिंपरी चिंचवड क्राईम न्यूज (File photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 17, 2024, 8:02 PM IST

पिंपरी चिंचवड Inhuman act with wife : निर्भया प्रकरणाची कटू आठवण जागी होईल अशी घटना आपल्या पुण्याजवळ घडली आहे. पिंपरी चिंचवडमधील घटना आहे. पतीनं पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर मोठ्या प्रमाणात शारीरिक अत्याचार केले. एवढंच नाही तर मानव जातीला काळीमा फासेल असं कृत्य त्यानं केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

चारित्र्यावर संशय घेत शहरात एका पतीने आपल्या पत्नीसोबत घृणास्पद कृत्य केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या गुप्तांगाच्या बाजूला छिद्र पाडून कुलूप बसवल्याचं आमनवीय कृत्य तिच्या पतीने केलं आहे. या घटनेमुळे पोलीस देखील चक्रावले आहेत. पीडित माहिलेच्या तक्रारीनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणी 30 वर्षीय पती विरोधात गुन्हा दाखल केला. तसंच त्याला अटक केली आहे. तर 28 वर्षीय पीडित पत्नीला रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलं आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि महिला हे नेपाळ मधील असून पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात वास्तव्यास आहेत. महिलेचा आरोपी पती तिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. तसंच तिला मारहाण करत होता. 11 मे रोजी रात्री दहाच्या सुमारास आरोपी पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला हाताने मारहाण केली. तसंच ब्लेडने गुप्तांगावर वार करुन जखमी केलं. घरातील चाकू हातात घेऊन महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली.आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने महिलेचे हात पाय ओढणीने बांधले.

त्यानंतर गुप्तांगाला लोखंडी खिळ्यांनी छिद्र पाडून कुलूप लावून गंभीर जखमी केलं. जखमी महिलेवर सध्या महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटने नंतर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, पोलीस उपनिरीक्षक बालाजी मेटे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पीएसआय बालाजी मेटे करीत आहेत.

आरोपी हा वॉचमनचं काम करतो आणि महिला गृहिणी आहे. या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे.

हेही वाचा..

  1. Domestic Violence Crime : माहेरहून १० लाख आणण्याकरिता विवाहितेच्या चारित्र्यावर संशय, पतीसह चार जणांवर गुन्हा
  2. पतीला पत्नीच्या चारित्र्यावर आधीच संशय, जेवणावरून उकरून काढला वाद अन् केली हत्या - Wife Murder Case Mumbai
  3. वेळ देत नसल्यानं चारित्र्यावर संशय; प्रियकरानं 'Oyo'मध्येच केला प्रेयसीचा गेम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.