ETV Bharat / state

प्रसिद्ध सैलानी बाबा यात्रेला सुरुवात; होळीनिमित्तानं लाखो भाविकांची मांदियाळी - Sailani Baba Festival

Sailani Baba Festival : देशभरातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत हजारो नारळांच्या होळीनं सैलानी बाबा यात्रेला सुरुवात झाली. या होळीला प्रदक्षिणा घालत हजारो भाविकांनी सैलानी बाबांच्या (Sailani Baba) दर्ग्यावर माथा टेकवला.

Holi 2024
सैलानी बाबा यात्रा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 24, 2024, 8:47 PM IST

सैलानी बाबा यात्रा

बुलडाणा Sailani Baba Festival : सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या बुलडाणा जिल्हातील सैलानी बाबा (Sailani Baba) महोत्सवाची नारळाच्या होळीनं सुरुवात झाली. नारळांची होळी करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम आहे. दरवर्षी होळीच्या दिवशी सैलानी बाबा यांच्या यात्रेला सुरुवात होत असते. हाजी अब्दुल रहेमान उर्फ सैलानी बाबा यांच्या दर्गावर चादर चढविल्यानंतर नारळाच्या होळीची विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर होळी पेटवली जाते. तर भाविक श्रद्धा म्हणून नारळ, जुने कपडे अंगावरून ओवाळून या होळीमध्ये अर्पण करतात.

लाखो भाविकांची मांदियाळी : राज्यासह परराज्यातील सर्वधर्मीय लाखो भाविक सैलानी बाबा यांच्या दर्गाला मनोभावे दर्शन घेण्यासाठी येतात. होळीच्या पाचव्या दिवशी म्हणजेच 30 मार्चला सैलानी बाबांचा संदल काढण्यात येणार आहे. या दिवशी लाखो भाविकांची मांदियाळी सैलानीत दाखल होत असते. या दिवशी पिंपळगाव सराई येथील एका घरातून रात्री नऊ वाजता संदल मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. सुशोभित केलेल्या उंटणीवरून ही संदल मिरवणूक निघणार आहे. अंगात येणं, भुतानं झपाटणं, करणी करणं आदी व्याधींचा येथे इलाज होतो, अशी धारणा मनी बाळगून हजारो नातेवाईक, मनोरुग्णांना होळीच्या दिवशी या ठिकाणी घेऊन येतात.

नारळांची आगळीवेगळी होळी : अनेक भाविक महामंडळाच्या बसेसने तर अनेक कुटुंब आपल्या खासगी वाहनाद्वारे सैलानीत दाखल होत आहेत. खऱ्या अर्थानं रविवारी (24 मार्च) होळीच्या सणापासून यात्रेला सुरुवात झाली आहे. विविध करमणुकीचे साधनं आणि विविध प्रकारची दुकाने यात्रेत थाटण्यात आली आहेत. आताच सैलानीत भाविकांची लाखोंच्या संख्येने गर्दी उसळली असून, पुढील पंधरा ते वीस दिवस भाविकांचा येथे वेगळाच माहोल राहणार आहे. दरम्यान, रविवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास लाखो भाविकांच्या उपस्थितीत नारळाची आगळीवेगळी होळी पेटवण्यात आली.

यात्रेसाठी राहणार चोख बंदोबस्त : पोलीस अधीक्षक सुनील काळासने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, एसडीपीओ सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रायपूर ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी चोख बंदोबस्त लावला आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक 3, एपीआय 25, पीएसआय 25, पुरुष कर्मचारी 450, महिला कर्मचारी 150, होमगार्ड 280 असा 900 पोलीस यात्रेदरम्यान तैनात करण्यात आले आहेत.

अग्निशमन दलही केले तैनात : तीन अग्निशमन दल तैनात करण्यात आले आहेत. तसेच गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी 3 दंगा काबू पथक, बुलडाणा पोलीस अधीक्षक यांचे क्यू आरटी पथक असा बंदोबस्त लावण्यात आला आहे. रफिक मुजावर, हशम मुजावर, कबीर मुजावर, शफिक मुजावर चांद मुजावर यांच्या हस्ते होळीचं पूजन करण्यात आलं आहे.

हेही वाचा -

  1. शिर्डीच्या साई मंदिरात पारंपरिक पद्धतीनं होळी उत्सव साजरा - Holi Celebrated Sai baba Temple
  2. होळी पौर्णिमेनिमित्त 'दगडूशेठ' गणपती मंदिरात 2 हजार किलो द्राक्षांची आरास; पाहा व्हिडिओ - Holi Festival 2024
  3. देशभरात साजरा होतोय होळीचा सण; काय आहे शुभमुहूर्त, कधी करता येईल होळी दहन? - Holika Dahan Muhurat 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.