ETV Bharat / state

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कुणाचा? : NCP पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी - NCP party and symbol Hearing - NCP PARTY AND SYMBOL HEARING

NCP party and symbol Hearing : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्षासह चिन्ह अजित पवारांना दिलं. त्याविरोधात शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. त्यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

Sharad Pawar, Ajit Pawar
शरद पवार, अजित पवार (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 9:00 PM IST

मुंबई NCP party and symbol Hearing : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांनी याचिका दाखल केली होती. आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं उत्तर देण्यासाठी अजित पवार यांना दोन आठवड्यांचा अवधी दिल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. याप्रकरणी पुढील सुनावणी 6 ऑगस्ट रोजी होणार असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. पाच-सहा सुनावणीनंतर या प्रकरणी निकाल लागण्याची शक्यता आव्हाड यांनी व्यक्त केली. आज ते मुंबईत पत्रकरांशी संवाद साधत होते.

राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह कुणाचं? : या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती भुयान यांच्यासमोर सुनावणी झाली. या प्रकरणी 23 जुलै रोजी सुनावणी होणार होती. मात्र, शरद पवार यांच्या वकिलांनी न्यायमूर्तींना न्यायालयात प्रकरण लवकर निकाली काढण्याची विनंती केली. त्यानंतर मंगळवारी हे प्रकरण सुनावणीसाठी आलं. अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्ष तसंच चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला होता. या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या पक्षानं निवडणूक आयोगाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

शरद पवारांचे 8 उमेदवार विजयी : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या फुटीनंतर अजित पवार यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तसंच घड्याळ चिन्ह दिलं. त्यानंतर निवडणूक आयोगानं शरद पवारांना ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष’ असं नाव दिलं. तसंच त्यांना तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह दिलं. लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र पवारांच्या पक्षानं 10 उमेदवार उभे होते. त्यापैकी 8 उमेदवार विजयी झाले, तर अजित पवारांच्या पक्षाचा एक उमेदवार विजयी झालाय.

'हे' वाचलंत का :

  1. नाना पटोले होणार भावी मुख्यमंत्री? महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वात मोठा भाऊ - Nana Patole CM Post Race
  2. विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा- ओबीसी संघर्षातून ध्रुवीकरण - Maratha VS OBC Reservation
  3. 'बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला'; संजय राऊत, जितेंद्र आव्हाडांच्या आरोपानंतर शिवसेना आक्रमक - MLC Results 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.