ETV Bharat / state

मुंबईत बालकांचे 'विकृत शिकारी'; वडाळ्यात बालकाचं धड अन् शिर आढळल्यानं खळबळ, बंगालचा संशयित पळाला

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 7:15 AM IST

Updated : Mar 7, 2024, 7:10 AM IST

Mumbai Boy Kidnapped And Murder Case : वडाळ्यातील बालकाला बिर्याणी देण्याच्या आमिषानं सोबत नेऊन त्याचा खून केल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आहे. या प्रकरणी नागरिकांनी एका पश्चिम बंगालच्या संशयिताला पकडून पोलीस ठाण्यात नेलं होतं. मात्र त्यानं पोलिसांच्या 'हातावर तुरी' दिल्या. हा संशयित कुख्यात बाल तस्कर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Mumbai Boy Kidnapped And Murder Case
संग्रहित छायाचित्र

मुंबईत बालकांचे 'विकृत शिकारी'; वडाळ्यात बालकाचं धड अन् शिर आढळल्यानं खळबळ

मुंबई Mumbai Boy Kidnapped And Murder Case : वडाळ्यातून 28 जानेवारीला अपहरण झालेल्या 12 वर्षीय मुलाची निर्घृणपणे हत्या करत मृतदेहाचे दोन तुकडे करुन शांतीनगर खाडीजवळ फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडाळा टी टी पोलिसांनी मुलाच्या मृतदेहाचे कुजलेल्या अवस्थेतील धड आणि शिर असे दोन भाग ताब्यात घेऊन केईएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविल्याची माहिती वडाळा टी टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी दिली आहे. "याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन पोलीस पुढील तपास करत आहेत," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

मच्छी विक्रेत्याच्या बालकाचं वडाळ्यातून अपहरण : वडाळा पूर्वेकडील शांतीनगर परिसरात राहात असलेल्या 49 वर्षीय तक्रारदार यांचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा 12 वर्षीय मुलगा हा इथल्या एका शाळेमध्ये सहावीत शिकत होता. 28 जानेवारीच्या रात्री सव्वा आठच्या सुमारास घराबाहेर पडलेला मुलगा घरी परतलाच नाही. सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्यानं अखेर त्याच्या वडिलांनी वडाळा टी टी पोलीस ठाणे गाठून मुलगा हरवल्याची तक्रार दिली. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरू केला.

मुलाच्या शरीराचे आढळले दोन तुकडे : पोलिसांनी शांतीनगर परिसरात केलेल्या चौकशीत, हा लहान मुलगा याच परिसरात राहणाऱ्या बिपुल शिकारी नावाच्या तरुणासोबत जातानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बघितल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. यावेळी हा मुलगा शिकारी याच्यासोबत जाताना येथील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता. त्यानुसार, पोलिसांनी संशयित आरोपी शिकारी याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. मात्र तो पोलीस ठाण्याजवळील बाथरुममध्ये जात तेथून पसार झाला. त्यानंतर सोमवारी या मुलाचे कुजलेल्या अवस्थेतील धड आणि मंगळवारी शिर वडाळ्यातील खाडीजवळ सापडलं. मृतदेहाच्या अंगावरील टी शर्ट, हातातील कडं आणि चप्पल यावरुन मृत मुलाची ओळख पाठवण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून संशयित आरोपी शिकारी याचा शोध सुरु केला आहे.

बिर्याणी देण्याच्या बहाण्यानं नेलं सोबत : वडाळा टी टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतीनगर परिसरातील खाडीच्या खारफुटीमध्ये 12 वर्षीय मुलाचं शिर आणि धड सापडल्यानं खळबळ उडाली. वडाळ्यातील शांतीनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या एका 12 वर्षीय मुलाला त्याच्या शेजाऱ्यानं 28 जानेवारी रोजी हॉटेलमध्ये बिर्याणी खायला देण्याच्या बहाण्यानं नेलं होतं. परिसरातील लोकांनी कसं तरी आरोपीला शोधून पोलीस ठाण्यात नेलं. मात्र वडाळा टी टी पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आरोपी पोलीस ठाण्यातून फरार झाल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे.

मुलाच्या कुटुंबीयांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार : यासंदर्भात मुलाच्या कुटुंबीयांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 5 फेब्रुवारी रोजी लेखी निवेदनही दिलं. तपासादरम्यान पोलिसांना काही सीसीटीव्ही फुटेज सापडलं. त्याच्या मदतीनं पोलिसांनी अनेकवेळा फरार आरोपी आणि अपहरण झालेले मूल शोधून काढल्याचा दावा केला. मात्र पोलीस ठाण्यातून पळून गेलेल्या आरोपीला पोलीस पकडू शकले नाही. शिवडी ते वडाळा दरम्यान मुलाचं शेवटचं लोकेशन असलेल्या सीसीटीव्ही फुटेजपासून हाकेच्या अंतरावर सोमवारी मुलाचा मृतदेह सापडला. त्यानंतर मात्र मुलाच्या कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे.

संशयित पश्चिम बंगालचा कुख्यात बाल तस्कर : मूळचा कोलकाता येथील नाडिया जिल्ह्यातील कल्याणी गावचा रहिवासी असलेल्या संशयित आरोपी बिपुल शिकारी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल होता. 2012 मध्ये केलेल्या हत्येच्या गुन्ह्यात पश्चिम बंगालमधील बर्टोला पोलिसांनी शिकारीला अटक केली. त्यानंतर 2016 मध्ये कारागृहात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत असलेला शिकारी हा कोव्हीड काळात पॅरोलवर बाहेर पडल्यानंतर मुंबईत पळून आला. येथून तो मुलांच्या तस्करीमध्ये उतरल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मुलाला तृतीयपंथीना विकल्याची मारली थाप : आरोपी बिपुल शिकारी हा काही दिवसांपूर्वीच वडाळ्यात रहायला आला होता. घटनेच्या दिवशी तो मुलाला जेवायला हॉटेलमध्ये घेऊन गेला होता. रात्री उशिरा शिकारी घरी परतल्यानंतर शेजाऱ्यांनी त्याला पकडून मुलाबाबत विचारणा केली. मात्र तो काहीच बोलत नसल्यानं नागरिकांनी त्याला चोप दिला. त्यानंतर आरोपी शिकारी यानं मुलाला तृतीयपंथीना विकल्याचं सांगितलं. त्यानंतर शेजाऱ्यांनी त्याला पोलिसांच्या हवाली केल्याची माहिती शेजाऱ्यांनी आणि नागरिकांनी दिली.

हेही वाचा :

  1. अभिषेक घोसाळकर खून प्रकरणातील आरोपी अमरिंदर मिश्राचा जामीन अर्ज फेटाळला, 5 मार्च पर्यंत पोलीस कोठडी
  2. कायद्याचा धाक गेला कुठं?, लोकांच्या रागानं गाठला कळस; जिल्ह्यात दोन महिन्यांत 13 जणांचा खून

Last Updated : Mar 7, 2024, 7:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.