ETV Bharat / state

Theaters History In Mumbai: पालिका उलगडणार मुंबईतील चित्रपटसृष्टीचा इतिहास; ‘फिल्म हेरिटेज मॅप’ पालिकेचा नवा उपक्रम - Theaters History In Mumbai

Theaters History In Mumbai : चित्रपटसृष्टीचा इतिहास उलगडून दाखवण्यासाठी पालिकेच्या कौशल्य विकास विभागाच्या वतीनं मुंबईत ‘फिल्म हेरिटेज मॅप’ (Film Heritage Map Program) लावण्यात येणार आहे. क्यूआर कोडला स्कॅन करून हवा तो इतिहास जाणून घेता येणार आहे.

BMC
मुंबई पालिका
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 12, 2024, 10:59 PM IST

मुंबई Theaters History In Mumbai : मुंबईत सध्या विविध प्रकल्प सुरू आहेत. त्यासाठी अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आलं असून, अनेक इमारती हटवण्यात आल्या आहेत. बरेचसे मार्ग बदलण्यात आले असून त्या जागी नवे उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. तसंही सतत बदलणार आणि धावपळीचे शहर अशी मुंबईची ओळख आहेच. मात्र, या सतत होणाऱ्या बदलात आणि धावपळीत मुंबईतल्या अनेक जुन्या आणि महत्त्वपूर्ण गोष्टी काळाच्या पडद्याआड जात आहेत. त्यापैकीच आहेत चित्रपटांमध्ये चित्रित केलेले मुंबईतील अनेक बंगले आणि हॉटेल्स. या ठिकाणांचं जतन व्हावं आणि मुंबईतील चित्रपट सृष्टीचा इतिहास लोकांना कळावा, यासाठी पालिकेच्या कौशल्य विकास विभागानं आता पुढाकार घेतला असून, मुंबईत 'फिल्म हेरिटेज मॅप' (Film Heritage Map Program) लावण्याच्या विचारात पालिका करत आहे.

मुंबईत 'फिल्म हेरिटेज मॅप' लावण्यात येणार : या संदर्भात पालिका प्रशासनाकडून देण्यात आलेली माहिती अशी की, मुंबईला चित्रपटसृष्टीचा अनेक वर्षांचा इतिहास आहे. हा इतिहास मुंबईकरांना समजावा यासाठी मुंबईत 'फिल्म हेरिटेज मॅप' लावण्यात येणार आहे. यात क्यूआर कोड सुविधा देखील देण्यात येईल. जेणेकरून मुंबईकरांना कोड स्कॅन केल्यावर संबंधित जागेच्या माहितीसह, तिथे कोणता चित्रपट चित्रित झाला होता, कोणत्या वर्षी चित्रित झाला? त्यामध्ये कलाकार कोण होते? दिग्दर्शक दिग्दर्शक कोण होते? यासह इतंभुत माहिती मुंबईकरांना उपलब्ध व्हावी यासाठी पालिका हा उपक्रम राबवत आहे. पुढच्या अंदाजे दोन ते तीन महिन्यात याचं काम पूर्ण होईल.

कशी झाली चित्रपटसृष्टीची सुरुवात : ब्रिटिश काळात मुंबईत जी काही काम करण्यात आली, उद्योग उभारण्यात आले त्यापैकीच एक चित्रपट सृष्टी. ब्रिटिशांच्या काळात मुंबईत चित्रपटसृष्टीची सुरुवात झाली. ही इंडस्ट्री अगदी थोड्याच दिवसात नावारुपाला आली. त्यामुळं चित्रीकरणासाठी नवनवीन लोकेशन, सेट आणि सीनची निर्मात्यांना, दिग्दर्शकांना गरज भासू लागली. या गरजेतून मुंबईत अनेक स्टुडिओ उभारण्यात आले. यासह मुंबईतील अनेक रस्त्यांवर, समुद्र किनारे, हॉटेल, बंगले, रेल्वे स्थानक अशा ठिकाणी चित्रपटांच्या चित्रीकरणास सुरुवात झाली. त्यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणे प्रकाश झोतात आली आणि पुढे मुंबईची ओळख बनली.

लवकरच होणार काम पूर्ण : पालिका प्रशासनाने सांगितलं की, शहरात सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पामुळं अनेक वास्तू या आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचा इतिहास आणि त्यांचं अस्तित्व टिकून राहावं यासाठी पालिकेच्या कौशल्य विकास विभागामार्फत 'फिल्म हेरिटेज मॅप' तयार करण्यात येत आहे. यासाठी चित्रपटांशी निगडित जागांचा शोध आम्ही घेत असून लवकरच त्याचं काम पूर्ण होईल.

क्युआरकोडची असणार सोय : पालिकेच्या कौशल्य विकास विभागाचे प्रमुख शशी बाला यांनी सांगितलं की, 'फिल्म हेरिटेज मॅप' या आमच्या नव्या प्रकल्पांतर्गत मुंबईतील जुने स्टुडिओ, पहिलं चित्रीकरण झालेलं ठिकाण, गाण्यांचं स्टुडिओ, कलाकारांची घरे, या इंडस्ट्री बाबत उपलब्ध असलेलं लिखाण या गोष्टींचा आम्ही शोध घेत आहोत. यात जी ठिकाणे नष्ट झाली आहेत, सोबतच ज्या वास्तू पुन्हा नव्याने बांधण्यात आल्या आहेत. त्यांचा देखील या मॅपमध्ये समावेश करण्यात येणार आहे. यासोबतच प्रसिद्ध रस्ते, इमारती यांच्या बाहेर पालिकेच्यावतीनं माहिती फलक लावण्यात येणार असून, त्यावर क्युआरकोड देखील उपलब्ध करून दिला जाणार आहे. जेणेकरून एका स्कॅनमध्ये मुंबईकरांना संबंधित ठिकाणाची माहिती मिळू शकेल.

हेही वाचा -

  1. Supriya Sule On Vijay Shivtare : विजय शिवतारे बारामतीतून निवडणूक लढवणार; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "लोकशाही..."
  2. Ajit Pawar News : 'यशवंतरावांच्या आदर्शानुसार वाटचाल करताना अशा गोष्टी...', अजितदादांनी वाचाळवीरांना फटकारलं
  3. Loksabha Election 2024 : कल्याणची जागा जिंकायची आहे ना? अजित पवार गटाचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.