ETV Bharat / state

लाकडाचा भुसा आणि केमिकल मिश्रणापासून तयार केलेला सात लाखांचा बनावट जिरेसाठा जप्त, दोघांना अटक

Fake Cumin Stock Seized: लाकडाचा भुसा आणि केमिकल मिश्रणापासून बनावट जिरे तयार करून विक्री करण्यासाठी आलेल्या टेम्पोवर ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील शांतीनगर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी ७ लाख १९ हजार ७०० रुपये किमतीचे २३९९ किलो बनावट जिऱ्याची पाकिटे जप्त केली गेली. (Bhiwandi police action) या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून या गोरखधंदाच्या पर्दाफाश केल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

Fake Cumin Stock Seized
दोघांना अटक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 26, 2024, 10:24 PM IST

बनावट जिरे निर्मितीवरील कारवाईविषयी सांगताना भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे

ठाणे Fake Cumin Stock Seized: शादाब इस्लाम खान (वय ३३ वर्ष, रा. नवलीफाटा पालघर) आणि चेतन रमेशभाई गांधी (वय ३४ वर्ष, रा. कांदिवली पश्चिम) असं बनावट जिरे प्रकरणी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. (chemical cumin) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ९० फूट रोड, नागाव फातमा नगर येथे बनावट जिरे येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक एस एम घुगे आणि पोलीस शिपाई क्षीरसागर यांना २४ जानेवारी रोजी मिळाली होती.

पिकअप टेम्पोत बनावट जीरा आढळला: पोलिसांना प्राप्त माहितीनुसार, शांतीनगर पोलिसांनी भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून नागाव फातमानगर येथे सापळा लावला असता या ठिकाणी पिकअप टेम्पोत बनावट जीरा आढळला. पोलिसांनी टेम्पोतून आणलेल्या ८० गोण्यांमधील ७ लाख १९ हजार ७०० रुपये किंमतीचा सुमारे साडेतीन टन बनावट जिरे माल आणि ४ लाख रुपये किंमतीचा टेम्पो असा सुमारे ११ लाखांचा मुद्देमाल शांतीनगर पोलिसांनी जप्त केला आहे.

बनावटी जिऱ्याचा ढाब्यांवर वापर: अटक मुख्य आरोपी चेतन गांधी याने मे. जागृती इंटरप्राईजेस नोबेल इंडस्ट्रियल इस्टेट मनोर (जि. पालघर) या ठिकाणी शासनाची परवानगी न घेता बनावट जिऱ्याची फॅक्ट्री उघडली होती. खळबळजनक बाब म्हणजे, बडीशेपचा टाकाऊ हिस्सा, लाकूड यात केमिकल आणि केमिकल मिश्रित पावडरचा वापर करून हा जीरा बनविण्यात येत होता. यासाठी कच्चामाल गुजरात येथील उंजा येथून येत होता. त्यांनतर जीरा बनवून तो बाजार भावाच्या अर्ध्या किंमतीत विकला जात होता. आरोपींनी मागील सहा महिन्यांहून अधिक काळापासून हा बनावट जिऱ्याचा व्यवसाय सुरू केला असून बनावट जीरा वाशी, नवी मुंबई, एपीएमसी मार्केट, भिवंडी, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात तसेच हॉटेल, धाब्यांवर विक्री केला जात होता. हॉटेल आणि धाब्यांवर खाल्ला जाणाऱ्या जीरा राईसमध्ये या जिऱ्याचा सर्रास वापर केला जात होता.

आरोपींनी दोन दिवसांची पोलीस कोठडी: शांतीनगर पोलिसांनी पालघर येथील बनावट जिरा फॅक्टरी सील केली असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता २७ जानेवारी पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. ही कारवाई शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे, पोलीस नाईक किरण जाधव, श्रीकांत पाटील, पोलीस शिपाई नरसिंग क्षीरसागर, रवी पाटील, तौफिक शिकलगार यांच्या पथकासह अन्न सुरक्षा अधिकारी इंद्रजीत चिलवंते यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

हेही वाचा:

  1. आता अध्यादेशाशिवाय माघार नाय; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
  2. मालदीवच्या राष्ट्रपतींचा सूर बदलला, भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत म्हणाले...
  3. मनोज जरांगे पाटलांच्या केसालाही धक्का लावाल तर याद राखा; नाना पटोलेंचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.