ETV Bharat / state

15 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना अतिवृष्टी-अवकाळीची मदत, मंत्री अनिल पाटील यांची विधानसभेत माहिती - Heavy rain relief to farmers - HEAVY RAIN RELIEF TO FARMERS

Heavy rain relief to farmers : मुसळधार तसंच अवकाळी पावसाची मदत शेतकऱ्यांना 15 जुलैपर्यंत वाटप करण्यात येईल, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभेत सांगितलं. विधानसभेत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्यावर विरोधक सत्ताधाऱ्यात खडाजंगी झाली.

farmers
शेतकऱ्याचे संग्रहित छायचित्र (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 28, 2024, 3:58 PM IST

मुंबई Heavy rain relief to farmers : राज्यातील हजारो शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून राज्य सरकारनं अद्याप त्यांना मदत दिलेली नाही. तसंच राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामेसुद्धा सरकारनं केले नसल्याची बाब सभागृहात आमदार नितीन राऊत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात मांडली. याबाबत शेतकऱ्यांचे पंचनामे ताबडतोब करावेत, त्यांना ताबडतोब मदत द्यावी, अशी मागणी सभागृहातील अन्य सदस्यांनीही यावेळी केली.

15 जुलैपर्यंत मदत वाटप करणार : जानेवारी ते मे 2024 दरम्यान राज्यात जोरदार पाऊस झाला. याबाबतचा पंचनामा करण्याच्या सूचना राज्य सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. नुकसान झालेल्या भागाचा पंचनामा करण्यात आला. त्यानुसार 2 लाख 91 हजार 433 हेक्टर पिकांचं नुकसान झालं आहे. 5 फेब्रुवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदतीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 15 जुलैपर्यंत ही मदत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी मंगळवारी (दि. 28) विधानसभेत दिली. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरू झालं आहे. शेतीच्या प्रश्नावर विरोधकांनी पहिल्या दिवसापासून आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.

आठ दिवसांत मदत : सध्या एनडीव्हीआयची परभणी कृषी विद्यापीठाकडून कृषी विभागाच्या स्तरावर तपासणी केली जात आहे. एनडीव्हीआयची तपासणी पूर्ण झाल्यानंतर 15 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, असंही पाटील म्हणाले. शेतकरी वगळू नयेत यासाठी एनडीव्हीआयचे नियम लागू करण्यात आले आहेत. एनडीव्हीआय तपासणी पूर्ण झाल्यानंतर ज्या विभागातनं मदतीची मागणी केली त्या विभागाला आठ दिवसांत मदत दिली जाईल, असं आश्वासनही पाटील यांनी दिलं.

सत्ताधारी विरोधकांत खडाजंगी : अवकाळी पाऊस तसंच अतिवृष्टीमुळं राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळं हाताशी आलेलं पीक वाया गेलंय. शासनानं पंचनामा करून तातडीनं मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. राज्य सरकारनं मदत जाहीर केलीय. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलंय. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं गांभीर्य नसल्याचं सांगत बाळासाहेब थोरात यांनीही सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांना तातडीनं मदतीची गरज आहे. मात्र सरकारनं पंचनामा करण्यात वेळ वाया घालवला. गेल्या वर्षी दुष्काळ पडला होता. त्यामुळं खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मदतीची गरज होती. मात्र सहा महिने उलटूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही, असं थोरात म्हणाले. एनडीव्हीआय म्हणजे काय, असा सवाल विरोधकांनी केल्यानं राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या मदतीला धावून आले. त्यावरही मुंडे यांनी विरोधकांवर टीका केली. त्यानंतर तातडीच्या मदतीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला.

'हे' वाचलंत का :

  1. नीट पेपर लिक प्रकरण : विरोधकांचा नीटवरुन लोकसभेत गदारोळ, राहुल गांधी आक्रमक - Lok Sabha Session 2024
  2. नीट पेपर लिक प्रकरण; झालावाड मेडिकल कॉलेजच्या 10 विद्यार्थ्यांवर कारवाई, डमी उमेदवार बसवून परीक्षा दिल्याचा पोलिसांना संशय - NEET UG Scam
  3. राज्यात पुन्हा ‘डबल इंजिन’चं सरकार येणार”; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती - Chandrashekhar Bawankule

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.