नागपूर Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील अश्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरू आहेत. मात्र, स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी यासर्व चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं म्हंटलं होतं. या विषयाच्या पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'रेशीमबाग' (Reshim Bagh) येथील स्मृती मंदिर येथे जातं संघाच्या जेष्ठ पदाधिकाऱ्यांच भेटीगाठी घेतल्या आहेत. फडणवीस यांच्या रेशमबाग दौऱ्याबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती.
संघ पदाधिकाऱ्यांची भेट? : सुमारे अर्धा तास देवेंद्र फडणवीस स्मृती मंदिरात होते. तिथे त्यांनी एका ज्येष्ठ संघ पदाधिकाऱ्यांची भेट घेतली असल्याचं बोललं जातंय. फडणवीस यांनी ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पदाधिकाऱ्याची भेट घेतली, ते संघाच्या शिर्षस्थ कोअर ग्रुपमध्ये महत्वाचे सदस्य असल्याची माहिती पुढे आली आहे. यापूर्वी ६ जून रोजी त्यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी काही संघ पदाधिकाऱ्यांनी देखील फडणवीस यांची भेट घेतली होती.
ही चर्चा मीडियाने सुरू केली मागील काही दिवसांपासून भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आता या चर्चांवर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केलाय. "मी भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार ही चर्चा केवळ माध्यमांनी सुरू केली आहे, असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं". पालकमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर नागपुरात बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शुक्रवारी नागपूर जिल्हा नियोजन समितीची बैठक नागपूर इथं आयोजित करण्यात आली होती.
हेही वाचा -
- "भाजपाचा कार्यकर्ता महायुतीविरोधात लढणार..."; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितला विधानसभेचा प्लॅन - Chandrashekhar Bawankule
- "देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल..."; हायकोर्टाचा निकाल दाखवत अनिल देशमुखांचा गंभीर आरोप - Anil Deshmukh On Sachin Waze
- लाडक्या बहिणींना विरोध करणारे सावत्र भाऊ- मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर सोडला बाण - Eknath Shinde Attack On Thackeray