ETV Bharat / state

मुंबई विमानतळावर 'कस्टम'नं वेगवेगळ्या कारवायांमध्ये 4 किलो 75 ग्राम सोनं केलं जप्त - Gold Seize On Mumbai Airport

Gold Seize On Mumbai Airport : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या विविध देशातील नागरिकांना पकडण्यात आलं. यावेळी कस्टम विभागानं 4 किलो 75 ग्रॅम सोनं या तस्करांकडून जप्त केलं.

Gold Seize On Mumbai Airport
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 9:38 AM IST

मुंबई Gold Seize On Mumbai Airport : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विविध देशातून तस्करी करुन आणलेलं सोन विमानतळ आयुक्तालय, मुंबई कस्टम झोन 3 च्या अधिकाऱ्यांनी जप्त केलं. या कारवायांमध्ये तब्बल 4.75 किलो सोनं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन जप्त केलं आहे. 22 मार्च ते 24 मार्च दरम्यान केलेल्या विविध कारवायांमध्ये 2 कोटी 77 लाख रुपयांचं चार किलो 75 ग्राम सोनं जप्त करण्यास कस्टमला यश मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

फूड रिटेल आउटलेटच्या शिफ्ट मॅनेजरला घेतलं ताब्यात : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून 22 मार्च रोजी कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका फूड रिटेल आउटलेटच्या शिफ्ट मॅनेजरला ताब्यात घेतलं. त्याला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन बाहेर पडत असताना कस्टमनं अंगझडतीत 3200 ग्रॅम सोन्याच्या पावडरसह पकडलं होतं.

सोन्याची पावडर द्यायची होती दोन तस्करांना : कस्टम अधिकाऱ्यांच्या प्राथमिक चौकशीत अशी माहिती उघड झाली की, फूड रिटेल आऊटलेट शिफ्ट मॅनेजरला एका ट्रान्सलेट पॅसेंजरद्वारे सोन्याची पावडर मुंबईतील धारावीजवळील दोन व्यक्तींना द्यायची होती. या धारावीतील व्यक्तींना पकडण्यासाठी विमानतळ आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर ऑटोरिक्षा स्टँडजवळ सापळा रचला होता. मॅनेजरनं ओळखलेल्या दोन संशयितांना कस्टमच्या पथकानं 1.5 किमीपर्यंत पाठलाग करून पकडलं. अधिक चौकशी केली असता ते मुंबईतील मस्जिद बंदर पश्चिम येथील हॉटेलच्या खोलीत राहत असल्याचं आढळून आलं. विमानतळ आयुक्तालयाच्या पथकानं हॉटेल गाठून रुममधून 3 लाख 82 हजार रुपये जप्त करत तस्करीत सहभागी असलेल्या तिघांनाही अटक करुन न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

सोन्याच्या बांगड्या आणल्या लपवून : थाई लायन एअर फ्लाइट SL 218 द्वारे बँकॉक ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकाला अटक करण्यात आली. या प्रवाशानं 491 ग्रॅम वजनाच्या 24 कॅरेट सोन्याच्या बांगड्या लपवून आणल्याचं आढळलं. तर दुसऱ्या एका प्रकरणात केनिया एअरवेज फ्लाइट KQ 202 द्वारे नैरोबी ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या एका परदेशी नागरिकाला रोखण्यात आलं. 454 ग्रॅम वजनाचा 22 कॅरेट गोल्ड मेल्टेड बारचे एकूण पाच नग प्रवाशानं हातात घेतलेल्या पिशवीत लपवून ठेवल्याचं आढळून आलं.

दुबईतून लपवून आणले सोन्याचे दागिने : इंडिगो फ्लाइट 6E 1456 द्वारे दुबई ते मुंबई प्रवास करणाऱ्या एका भारतीय नागरिकाला अटक करण्यात आली. या नागरिकानं 350 ग्रॅम वजनाचे 24 कॅरेट सोन्याचे दागिने लपवून ठेवलेले आढळून आले. तर दुसऱ्या एका प्रकरणात कॅथे पॅसिफिक फ्लाइट CX 685 द्वारे हाँगकाँग ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या एका भारतीय नागरिकाला अडवण्यात आले. या प्रवाशानं 258 ग्रॅम वजनाचे 24 कॅरेट सोन्याचे दागिने लपवून ठेवल्याचं आढळलं.

हेही वाचा :

  1. ऐन लग्नसराईत सोन्याला झळाळी; सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा मोठी वाढ... - GOLD RATE IN INCREASED
  2. खालापूर टोल नाक्यावर सोन्याची तस्करी करणाऱ्या वृद्धास अटक, ४४ लाखाचे दागिने जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.