मुंबई Abu Salem Plea Dismissed : तळोजा कारागृहातून दुसऱ्या कारागृहात नये, अशी विनंती करणारी याचिका कुख्यात गॅंगस्टर अबू सालेमनं मुंबई सत्र न्यायालयात केली होती. मात्र, त्यांची मागणी मंगळवारी न्यायालयानं फेटाळून लावलीय. अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी.डी. शेळके यांनी सालेमची याचिका फेटाळीय. मात्र, या निर्णयाविरोधात सालेमला उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी सत्र न्यायालयानं 3 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. सत्र न्यायालयानं अबू सालेमला 3 जुलैपर्यंत तळोजा कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय त्याला अन्य कारागृहात स्थानांतरित करू नये, असं निर्देश तळोजा कारागृह प्रशासनाला न्यायालयानं दिले आहेत. अबू सालेमतर्फे ॲड. तारक सय्यद तसंच ॲड अलिशा पारेख यांनी यांनी काम पाहिलं.
1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी : 19 जून रोजी या याचिकेवर न्यायाधीश बी.डी. शेळके यांच्यासमोर सुनावणी झाली होती. त्यावेळी विशेष सरकारी वकील साळवी यांच्यातर्फे ॲड सागर रेडकर, तळोजा तुरुंगाचे अधिक्षक प्रमोद वाघ उपस्थित होते. दोन्ही बाजूंंचा ऐकल्यानंतर 25 जून रोजी निकाल जाहिर करण्यात येईल, असं त्यावेळी न्यायालयानं म्हटलं होतं. गॅंगस्टर अबू सालेमला तळोजा जेलमधून दुसऱ्या कारागृहात नेताना प्राणघातक हल्ला होण्याची भीती आहे. त्यामुळं तळोजा कारागृहातून दुसऱ्या कारागृहात हलवू नये, अशी मागणी करणारी याचिका त्यानं विशेष न्यायालयात दाखल केली होती. त्यावर न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत. 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी असलेल्या अबू सालेमचं पोर्तुगाल येथून भारतात प्रत्यार्पण करण्यात आलं होतं. 19 वर्षांपूर्वी भारतात प्रत्यार्पित झाल्यापासून अबू सालेम तुरुंगातच आहे.
अबू सालेम ऑर्थररोड कारागृहात : पोर्तुगालमधून प्रत्यार्पण झाल्यानंतर अबू सालेमला ऑर्थररोड कारागृहात ठेवण्यात आलंय. तिथं मुस्तफा डोसाकडून हल्ला झाल्यावर त्याला तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. तिथं डोसाच्या सहकाऱ्यानं हल्ला केल्यावर त्याला ठाणे कारागृहात ठेवण्यात आलं. मात्र, नंतर पुन्हा तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं. सध्या तो तळोजा कारागृहातील अंडा सेलमध्ये आहे. मात्र, आता तळोजा कारागृह प्रशासनानं अंडा सेलच्या दुरुस्तीच्या कारणासाठी अबू सालेमला दुसऱ्या कारागृहात नेण्याचा निर्णय घेतला आहे.
प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता : तळोजा कारागृह प्रशासनाच्या निर्णयामुळं अबू सालेम धास्तावला आहे. त्याला जीवाची भीती वाटत आहे. दुसऱ्या कुठल्याही मध्यवर्ती कारागृहात आपल्यावर प्राणघातक हल्ला होऊ शकतो, अशी त्यानं भीती व्यक्त केलीय. तळोजा कारागृहातून दुसऱ्या कारागृहात स्थलांतरित करु नये, अशी याचिका त्यानं न्यायालयात दाखल केली. आता त्याची शिक्षा वेळ जवळ- जवळ संपत आली आहे. त्यामुळं एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात नेताना आपल्यावर प्राण घातक हल्ला होऊ शकतो, अशी भीती त्यानं याचिकेत व्यक्त केली. छोटा राजनच्या साथीदारासह इतर गुंड आपल्यावर हल्ला करु शकतात. मुंबई, अमरावती, कोल्हापूर, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात अशा विविध ठिकाणी आपले वैरी शिक्षा भोगत आहेत. त्यामुळं आपल्याला जीवे मारण्याची शक्यता आहे, अशी भीती सालेमनं व्यक्त केलीय. अबू सालेम हा तळोजा कारागृहात गेल्या पंधरा वर्षांपासून बंद आहे.
'हे' वाचलंत का :