ETV Bharat / state

आंदोलन करताना भाजपा आणि ठाकरे गट आमने-सामने, पोलिसांची उडाली तारांबळ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 9, 2024, 8:00 PM IST

Controversy In BJP Thackeray Group : छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात आज (9 फेब्रुवारी) आंदोलनादरम्यान भाजपा विरुद्ध शिवसेनेचा ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्यानं मोठा तणाव निर्माण झाला. (BJP Agitation) दरम्यान दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.

Controversy In BJP Thackeray Group
पोलिसांची उडाली तारांबळ
भाजपा विरुद्ध ठाकरे गटाचा वाद पुन्हा चव्हाट्यावर

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Controversy In BJP Thackeray Group : आंदोलन करताना भाजपा विरुद्ध शिवसेनेचा ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्यानं मोठा तणाव निर्माण झाल्याचं क्रांती चौक भागात पाहायला मिळालं. एकीकडे राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपा आंदोलन करत असताना तिथे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन सुरू केलं गेलं. (Thackeray Group Agitation) यामुळे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्यानं पोलिसांची दमछाक उडाली. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एकाच गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानं भेदभाव केल्याचा आरोप महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला आहे.

भाजपानं केलं आंदोलन : भाजपा ओबीसी मोर्चातर्फे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतच्या वक्तव्याचा जोडे मारत निषेध करण्यात आला. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसी जातीत झाला नसून ते ओबीसी नाहीत असं वक्तव्य केलं होतं. राहुल गांधींच्या या वक्तव्यातून जनतेत संभ्रम पसरवून ओबीसी समाजाचा अपमान केला आहे, असा आरोप भाजपातर्फे करण्यात आला होता. या वक्तव्याचा निषेध करण्याकरिता छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली गेली. तसंच त्यांच्या फोटोला भाजपा कार्यकर्त्यांनी थोडे मारत वक्तव्याचा निषेध केला.

ठाकरे गटाचे आंदोलन : भाजपाचे आंदोलन सुरू असताना मुंबईमध्ये माजी नगरसेवक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या वतीनं क्रांतीचौक येथे अचानक निदर्शनं करण्यात आली. गुरुवारी मुंबईतील नगरसेवक यांच्यावर गोळीबार झाला. राज्यात भर दिवसा गोळीबार करून दहशत माजवली जात आहे. गुन्हेगारांवर सरकारचं नियंत्रण नाही. गुंडांना सरकार पोसत आहे, असा आरोप ठाकरे गटाच्या आंदोलनकांनी करत भाजपा आणि राज्य शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांची दमछाक उडाली. दोन्ही गटांना बाजूला करण्यात मोठ्या अडचणी आल्या. पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत कारवाई केली आहे. आम्ही पूर्व परवानगी घेतल्याचा दावा भाजपाने केलाय. तर गुन्हे परवानगी घेऊन होत नाहीत. आम्ही आंदोलनाला परवानगी घेतली नाही. आम्हाला आवर घालण्यापेक्षा गुन्हेगारांना आवरा, अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे.

हेही वाचा:

  1. एकाचवेळी तिघांना भारतरत्न; नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एमएस स्वामीनाथन यांना देशाचा सर्वोच्च सन्मान
  2. कोरोना योद्धा ते कोल्ड ब्लडेड मर्डरर! जाणून घ्या कोण होता अभिषेक घोसाळकर यांची हत्या करणारा मॉरिस नरोना?
  3. अभिषेक घोसाळकर खून प्रकरण नेमकं काय ? 'मॉरिस भाई'नं का केला थंड डोक्यानं खून आणि नंतर आत्महत्या...!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.