ETV Bharat / state

बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील नागरिकांना विशेष विमानाने आणणार; मुख्यमंत्री शिंदेंची माहिती - CM Eknath Shinde

Students Stuck In Bangladesh : बांगलादेशात सुरू असलेल्या अराजक परिस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि अभियंत्यांना तातडीने परत आणण्यासाठी विशेष विमाने उपलब्ध करून दिली जातील, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केंद्रीय परराष्ट्रमंत्री जयशंकर (S Jaishankar) यांच्याशी चर्चेनंतर दिली आहे. बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांची यादी त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणासह केंद्रीय परराष्ट्र मंत्र्यांना दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 8, 2024, 11:54 AM IST

मुंबई Students Stuck In Bangladesh : बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळं तसंच हिंसाचाराच्या घटनांमध्ये भारतातील अनेक नागरिक बांगलादेशात अडकून पडले आहेत. बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची तसंच अभियंत्यांची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) यांच्याकडं दिली आहे.

तातडीने संपर्क साधून मदत देणार : या चर्चेदरम्यान केंद्रीय परराष्ट्र मंत्र्यांनी संबंधित विद्यार्थी आणि नागरिकांशी संपर्क साधून त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून दिली जाईल असं आश्वासन दिलं आहे. या संदर्भात समन्वय साधण्यासाठी राज्य सरकारनं एक पथकही नियुक्त केलं आहे. बांगलादेशातील बाधितांना तातडीनं राज्यात परत आणण्यासाठी राज्य सरकारमार्फत सर्व मदत आणि उपाययोजना केल्या जातील, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात : बांगलादेशातील अशांत परिस्थितीनंतर राज्यातील विद्यार्थी आणि अभियंत्यांची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क साधने आणि त्यांना हवी असलेली मदत देणं यासाठी आपण सातत्यानं परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात आहोत. त्यामुळं नागरिकांनी चिंता करू नये. तिथे अडकलेल्या नागरिकांना सुखरूप परत आणलं जाईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

संपर्कासाठी पथक स्थापन : बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळावी. तसंच त्यांना तातडीनं मदत उपलब्ध करून देता यावी. या अनुषंगानं बांगलादेशात असलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची यादी संकलित करून परराष्ट्र मंत्रालयाला उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांशी त्वरित संपर्क साधण्यासाठी, विद्यार्थ्यांना मदत उपलब्ध करून देण्यासाठी, तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रभावित कुटुंबांशी संपर्क ठेवण्यासाठी राज्य शासनामार्फत एक पथकही स्थापन करण्यात आल्याचं सांगण्यात आलय. बांगलादेशातील भारतीय दूतावासाशी समन्वयानं काम करण्यात येत असल्याचं स्पष्ट करण्यात आलय. तर बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून योग्य ती मदत आणि सहकार्य केलं जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलय.

हेही वाचा -

  1. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशमध्ये अराजक स्थिती, विहिंपनं सरकारकडं केली 'ही' मागणी - bangladesh News
  2. “शेख हसीना यांनी लोकशाहीचा मुखवटा घालून...”: बांगलादेशमधील परिस्थितीबाबत संजय राऊतांचं विधान, केंद्राला दिला इशारा - Sanjay Raut on Bangladesh Protest
  3. भारत-बांगलादेश सीमा भागात 'बीएसएफ' हाय अलर्ट; विमान उड्डाणं रद्द - Bangladesh Protest BSF High Alert

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.