बारामती Chhagan Bhujbal : बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जनसन्मान मेळाव्याच्या निमित्तानं मंत्री छगन भुजबळ बारामतीत आले होते. त्यांनी बारामतीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना आरक्षणावर भाष्य केलं. छगन भुजबळ म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आमची देखील भावना आहे. फक्त ते आरक्षण देताना इतर समाजावर अन्याय नको ही आमची भूमिका आहे. आरक्षणाचे भांडण मिटावे म्हणून सह्याद्री अतिथीगृहावर एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.
त्यासाठी शरद पवारांचे आभारच : छगन भुजबळ म्हणाले की, त्यांनी जितेंद्र आव्हाडांना आव्हान केले होते की, तुम्ही या आणि शरद पवार यांना देखील बोलवा. ओबीसींच्या आरक्षणात शरद पवारांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आम्ही शरद पवारांचे आभार देखील मानलेले आहेत.
'या' कारणाने बैठकीवर बहिष्कार : एक ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांनी बारामतीतील जनसन्मान मेळाव्यात यायला पाहिजे होते. सगळे येणार होते, पण संध्याकाळी अचानक बारामती मधून कोणाचा तरी फोन गेला आणि या सगळ्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. खरं तर तुमचा राग अजित पवार, छगन भुजबळ यांच्यावर असेल; पण आरक्षणाचे हे भांडण मिटवण्यासाठी तुम्ही का येत नाही? त्याऐवजी महाराष्ट्र पेटवण्याचा उद्योग सुरू आहेत. निवडणुकीच्या वेळेस तुम्ही तुमचे झेंडे घ्या. आम्ही आमचे झेंडे घेऊ; पण अशा मुद्द्यावर बहिष्कार टाकून समाजाला वाऱ्यावर सोडायचं हे बरोबर नाही, असेही विचार छगन भुजबळांनी मांडले.
हेही वाचा:
- "आयएएस अधिकारी पूजा खेडकर..." ; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी - Pooja Khedkar Case
- पंतप्रधान नरेंद्र मोदींना किती स्तराची असते सुरक्षा? कोण करतं संरक्षण? दररोज 'इतके' कोटी सुरक्षेवर होतात खर्च - PM Narendra Modi Security
- सिंचन घोटाळ्याला क्लीन चीट देणे हाच घोटाळा, फडणवीस यांचा पगार कापणार का-संजय राऊत - Sanjay Raut News today