ETV Bharat / state

येरवडा कारागृहात चक्क बंदीवानांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन, बंदीवान म्हणाले... - Yerwada Jail - YERWADA JAIL

Yerwada Jail : तुरुंग म्हटलं की सक्त मजुरी करणारे कैदी डोळ्यासमोर येतात. मात्र येरवडा कारागृहात बंदीवानांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात कारागृहातील 20 बंदीवानांनी सहभाग घेतला. तसंच यात भारतातील नाही तर जगातील दिग्गज खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

येरवडा कारागृहात चक्क बंदीवानांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन
येरवडा कारागृहात चक्क बंदीवानांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 4:49 PM IST

पुणे Yerwada Jail : पुण्यातील येरवडा कारागृहात नेहमीच अनेक सामाजिक तसंच समाजपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं. अशातच आता येरवडा कारागृहात बंदीवानांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बंदीनी सहभाग घेत बुद्धिबळ स्पर्धेत आपला डाव टाकला. भारतातील अग्रगण्य ऊर्जा उत्पादक कंपनी इंडीयन ऑईल यांनी प्रायोजित केलेल्या तसंच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना (फिडे) यांनी आयोजित केलेल्या दुसऱ्या चेस फॉर फ्रीडम परिषदेचं आयोजन 19 ते 21 जून दरम्यान पुण्यात करण्यात आलं आहे. त्याअंतर्गत येरवडा कारागृहात या सांघिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.

येरवडा कारागृहात बंदीवानांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन (ETV Bharat Reporter)

अनेक खेळाडूंचा स्पर्धेत सहभाग : पुण्यातील येरवडा कारागृहात आयोजित करण्यात आलेल्या या बुद्धिबळ स्पर्धेत 10 पुरुष बंदीवान तर 10 महिला बंदीवान यांनी सहभाग घेतला होता. विशेष बाब म्हणजे जगातील तसंच भारतातील बुद्धिबळ खेळाळूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. यात ईशा करोडे, सौम्य स्वामिनाथन्, अनिर्वन बी या खेळाडूंनी या बंदीवांनांबरोबर बुद्धिबळ खेळून आपला डाव टाकला. या स्पर्धेत काही बंदींनी आपला डाव टाकत सामना जिंकला तर काही पराभूत झाले.

स्पर्धा जिंकणाऱ्याला 120 दिवस पॅरोल : याविषयी बोलताना अप्पर पोलीस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता म्हणाले की, "आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना (फिडे) यांनी आयोजित केलेल्या दुसऱ्या चेस फॉर फ्रीडम परिषदेला आजपासून सुरवात होत आहे. यात बंदिवान हे आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर बुद्धिबळ खेळत आहेत. मागच्या वर्षी एक पाऊल म्हणून आम्ही बंदीवानांसाठी बुद्धिबळ खेळाला सुरवात केली होती. आता एका वर्षातच परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. सुरवातीला या बंदींना बुद्धिबळाबाबत काहीच माहीत नव्हतं, पण त्यांच्याकडून रोज 4 ते 5 तास तयारी करुन मागच्याच वर्षी झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं आहे." तसंच विशेष बाब म्हणजे स्पर्धेत जिंकणाऱ्या बंदीला 120 दिवस पॅरोल दिला जातो, असं यावेळी गुप्ता म्हणाले. तसंच आम्हाला कैद्यांना बाहेर पडल्यावर पुन्हा समाजात चांगल्या पद्धतीनं समोर आणायचं आहे. बाहेर राहणाऱ्या खेळाडूला जे जमणार नाही ते आमच्या खेळाडूंनी करुन दाखवलं आहे. सुधारणा आणि पुनर्वसन हे जेल प्रशासनाचं ब्रीदवाक्य या कैद्यांनी खरं करुन दाखवलं. सध्या येरवडा कारागृहात पुरुष आणि महिला असे एकूण 200 कैदी बुद्धिबळ शिकत आहेत, असं यावेळी गुप्ता म्हणाले.

खेळानं मानसिकतेत बदल : याविषयी बोलताना एक बंदीवान म्हणाला, "आम्हाला आनंद होत आहे की पहिल्यांदा येरवडा कारागृहात विदेशी लोकांबरोबर आम्ही बुद्धिबळ खेळत आहोत. आज असं वाटत आहे की जेलच्या बाहेर येऊन आम्ही बुद्धिबळ खेळत आहोत. या खेळानं आमची मानसिकता बदलत आहे. आपण जेलमध्ये नसून बाहेर असल्याचं जाणवतं आहे. जेलमध्ये असताना मानसिक तणाव, घरचे विचार नेहमी येत होते. पण जेव्हापासून बुद्धिबळ खेळायला सुरवात केली तेव्हा पासून मनात चांगले विचार येऊ लागले आहे. आता दारोरोज 8 तास आम्ही बुद्धिबळाचा सराव करत असतो."

अनेक उपक्रमांचा समावेश : आजपासून सुरू झालेल्या या परिषदेमध्ये चर्चासत्र, परिसंवाद आणि मुलाखती याचा समावेश आहे. आभासी (ऑनलाईन) पद्धतीनं होणाऱ्या या चर्चासत्रात जगभरातील तज्ञ उपस्थित राहणार आहेत. चेस फॉर फ्रीडम या प्रकल्पाचा विविध देशांमध्ये कशा प्रकारे यशस्वी उपयोग करण्यात आला आहे, हा प्रकल्प भारतात कशा प्रकारे राबविता येईल, राष्ट्रीय स्तरावर विविध बंदीवानांच्या अभ्यासातून या प्रकप्लाचा कशाप्रकारे उपयोग करता येईल आणि विविध ठिकाणी बंदीवासात असलेल्यांचे संघ तयार करुन आंतरराष्ट्रीय स्पर्धा कशा घेता येईल या सर्व विषयांवर या परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

  1. पोलीस भरतीत घोटाळा टाळण्यासाठी अमरावती पोलिसांकडून 'आरएफआयडी' तंत्राचा वापर - Police Recruitment 2024
  2. Yerwada Central Jail : श्रृंखला उपहार गृह सेंटरचे उद्घाटन; कैद्यांनी बनविलेल्या नाष्ट्याचा घेता येणार स्वाद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.