ETV Bharat / state

हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांडात मोठा ट्विस्ट, मृतदेहाचा सांगाडाच गायब - Sheena Bora Murder Case

Sheena Bora Murder Case : हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख पुरावा असलेली शीनाच्या मृतदेहाची जळालेली हाडे सापडत नसल्याची माहिती सीबीआयनं सत्र न्यायालात सुनावणी दरम्यान दिली. त्यामुळं या प्रकरणी आतापर्यंत तीन वेळा सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. हा पुरावा अत्यंत महत्त्वपूर्ण असल्यानं या खटल्याच्या सुनावणीवर मोठा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Sheena Bora
शीना बोरा फाईल फोटो (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 14, 2024, 10:05 PM IST

मुंबई Sheena Bora Murder Case : मुंबईतील हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांडात मोठा ट्विस्ट आला आहे. या हत्याकांडातील एक महत्त्वाचा पुरावा गायब झाला आहे. सरकारी वकिलांनी या खटल्याची माहिती मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात सादर केली आहे. पोलिसांनी पुरावा म्हणून जो सांगाडा जप्त केला होता, तो शीना बोराचा सांगाडा, हाडे गायब झाली आहेत. 2012 मध्ये शीना बोराची हत्या झाल्यानंतर त्याच वर्षी पोलिसांनी पुरावा म्हणून सांगाडा जप्त केला होता. विशेष सीबीआय न्यायालयात सांगाडा सापडला नसल्याचं सरकारी वकील सी. जे. नांदोडे यांनी सांगितलं. जे.जे. रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाचे डॉक्टर जेबा खान यांच्या साक्षीदरम्यान ही बाब उघडकीस आली.

हाडं सापडली नसल्याची माहिती : सीबीआयला मृतदेहाची जळालेली हाडे सापडली नाहीत. सत्र न्यायालयाच्या सुनावणीत सीबीआयनं या प्रकरणातील साक्षीदारांना हजर केलं नाही. सीबीआय जप्त केलेल्या सांगाड्यातील काही हाडे न्यायालयात सादर होणार होती. तसंच, या विधानांच्या आधारे जेजे रुग्णालयातील शरीरशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापकांची साक्ष घेण्यात येणार होती. मात्र, ही हाडं सापडली नसल्याची माहिती सीबीआयच्या वकिलानं न्यायालयाला दिली.

पुढील सुनावणी 27 जून रोजी : शीना बोरा हत्याकांडाचा तपास करणाऱ्या सीबीआयनं मृतदेहाची जळालेली हाडे जप्त केली होती. न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान सांगाड्यातील काही हाडे सादर करणे अपेक्षित होतं. मात्र, सीबीआयला ही हाडे सापडत नसल्यानं पुढील कार्यवाही रखडली आहे. दुसरीकडे, या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीनं या प्रकरणावर लवकर सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 27 जून रोजी होणार असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. शीना बोराची आई इंद्राणी मुखर्जी, तिचा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय यांनी गळा आवळून हत्या केली होती. त्यानंतर तिचा मृतदेह मुंबईबाहेर पेण पनवेल परिसरात फेकून दिला होता. खार पोलिसांनी या प्रकरणी 2015 मध्ये आणखी अवशेष गोळा केले होते. परंतु बचाव पक्षाच्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेत हे अवशेष एकाच व्यक्तीचे नसल्याचा दावा केला होता.

'हे' वाचलंत का :

  1. इचलकरंजी महानगरपालिकेत दोन आयुक्तात रंगला 'खुर्चीवाद', दोघांनीही थाटल्या एकाच दालनात खुर्च्या - Ichalkaranji Commissioner Dispute
  2. विधानपरिषद निवडणुकीतील अर्ज मागे घेण्यासाठी भाजपाचा शिवसेनेवर दबाव? - Legislative Council Elections
  3. राम मंदिर बॉम्बने उडवणार, 'जैश-ए-मोहम्मद' दहशतवादी संघटनेकडून धमकी, अयोध्येत सुरक्षा वाढवली - Ayodhya Ram Mandir Threat

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.