ETV Bharat / state

इंद्राणी मुखर्जीला दणका ; उच्च न्यायालयानं नाकारली विदेश प्रवासाला परवानगी - Indrani Mukherjea - INDRANI MUKHERJEA

Indrani Mukherjea : विशेष न्यायालयानं इंद्राणी मुखर्जीला विदेशात जाण्यासाठी परवानगी दिली. त्या निर्णयाविरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (सीबीआय) उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर मुंबई उच्च न्यायालयानं त्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली आहे.

Indrani Mukherjea
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2024, 3:09 PM IST

मुंबई Indrani Mukherjea : बहुचर्चित शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख संसयित आरोपी असलेली तिची आई इंद्राणी मुखर्जी हिला विदेश प्रवासासाठी देण्यात आलेली परवानगी मुंबई उच्च न्यायालयानं नाकारली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस सी चांडक यांच्यासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी त्यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं दिलेला निर्णय रद्द केला. त्यामुळे हा इंद्राणी मुखर्जीला मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

विदेश प्रवासाला दिलेली परवानगी रद्द : विशेष न्यायालयानं इंद्राणीला स्पेन आणि युकेमध्ये बँकिंगशी संबंधित कामं करुन घेण्यासाठी तीन महिन्यात दहा दिवस जाण्यासाठी परवानगी दिली होती. सीबीआयचे विशेष सरकारी वकील श्रीराम शिरसाट यांनी सदर कामांसाठी प्रत्यक्ष जाण्याची गरज नसून इथून ऑनलाईन पद्धतीनं कामं करता येऊ शकतात, असं न्यायालयाला सांगितलं. त्यामुळे इंद्राणी मुखर्जीला भारतसोडून विदेशात जाण्याची काहीही गरज नाही. मात्र, इंद्राणी मुखर्जीचे वकील रणजीत सांगळे यांनी हा दावा खोडून काढला. इंद्राणी मुखर्जीला तिच्या बँकेशी संबंधित कामांसाठी प्रत्यक्ष स्पेन आणि युकेमध्ये हजर राहणं आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला.

उच्च न्यायालयाचा इंद्राणी मुखर्जीला दणका : इंद्राणी मुखर्जी हिनं तिची विदेशातील स्पेन आणि युकेमध्ये असलेली बँकिंगशी संबंधित कामं भारतातून करण्याचा प्रयत्न करावा, असं न्यायमूर्तींनी यापूर्वीच्या सुनावणी दरम्यान सुचवलं होतं. तिला प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक नसेल तोपर्यंत तिनं भारतातूनच ही कामं करण्याचा प्रयत्न करावा, असं मत न्यायालयानं व्यक्त केलं. 2012 मध्ये शीना बोरा हिची हत्या झाली. एप्रिल 2012 पासून शीना गायब होती, नंतर रायगड जिल्ह्यात तिच्या मृतदेहाचे अवशेष सापडले. इंद्राणी मुखर्जीला या प्रकरणी 2015 ला अटक करण्यात आली. मे 2022 मध्ये तिला जामीन मंजूर करण्यात आला.

हेही वाचा :

  1. 2012 मध्ये खून; आता सीबीआयच्या कार्यालयातच सापडले शीना बोराचे अवशेष - Sheena Bora Murder Case
  2. हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांडात मोठा ट्विस्ट, मृतदेहाचा सांगाडाच गायब - Sheena Bora Murder Case
  3. शीना बोरा हत्याकांडातील 23 साक्षीदारांची नावं वगळा, सीबीआयची न्यायालयाला विनंती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.