ETV Bharat / state

'घरातील पत्नी, मुलगी, आईचंही मत मिळालं नाही': मनसे उमेदवाराचे आरोप महापालिकेनं फेटाळले, दिलं जोरदार उत्तर - NOT GET MOTHER WIFE AND GIRLS VOTE

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजेश येरुणकर यांनी दहिसरमधून दोन मतं पडल्याचं सांगत ईव्हीएमवर सवाल उपस्थित केला. त्यावर महापालिकेनं त्यांचे आरोप फेटाळत 53 मतं पडल्याचं सांगितलं.

Not Get Mother Wife And Girls Vote
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2024, 1:21 PM IST

मुंबई : विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालात महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्यानंतर आता ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. महायुतीच्या इतक्या मोठ्या प्रमाणातील विजयामागं ईव्हीएम मशीनमधील छेडछाड असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी केला. खासदार संजय राऊत यांनी अनेक मतदारसंघात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचा आरोप करत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली. दुसरीकडं, दहिसर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजेश येरुणकर यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. घरातील आई, पत्नी, मुलगी यांची मतंही मिळाली नाहीत का? असं म्हणत त्यांनी ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Not Get Mother Wife And Girls Vote
मुंबई महापालिका (Reporter)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवाराचे आरोप : याबाबत राजेश येरुणकर यांनी ईव्हीएम मशीन सोबतच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला. याला आता बृहन्मुंबई महानगरपालिकेनं उत्तर दिलं असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजेश येरुणकर यांच्या आरोपात कोणतंही तथ्य नसल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलं. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, पहिल्यांदाच मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारीपदाची संयुक्तपणे जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडं सोपवण्यात आली. त्यामुळे राजेश येरुणकर यांच्या आरोपांना महापालिकेनं उत्तर दिलं आहे.

महापालिकेनं फेटाळून लावले राजेश येरुणकरांचे आरोप : महापालिकेनं चार मुद्द्यांच्या आधारे राजेश येरुणकर यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्या स्पष्टीकरणात पालिकेनं म्हटलं आहे की, "17 सी आणि ईव्हीएम मशीन यामधील एकूण मतदानाची आकडेवारी तसेच मशीनचा क्रमांक तंतोतंत जुळत आहे. 17 सी ची एक प्रत मतदानाच्या दिवशी सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींना देण्यात आलेली आहे. तसेच मतदानाच्या दिवशी 17A छाननी आणि मतमोजणी दिवशी कोणतीही लेखी तक्रार दहिसर विधानसभा मतदारसंघ येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडं प्राप्त झालेली नाही.

या केंद्रावर उमेदवाराला मिळाले 53 मतं : महापालिकेनं पुढं म्हटले आहे की, "निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या FAQ क्रमांक 34 मध्ये, कंट्रोल युनिटमध्ये दिसणाऱ्या 99 टक्के बॅटरीबाबतची सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. Carrying Case ला सील योग्य रितीनं लावण्यात आला होता. तसेच सील उघडल्यानंतर 17 सी आणि ईव्हीएम मशीन यावरील मतदानाची आकडेवारी तंतोतंत जुळली आहे. "सदर उमेदवार आणि त्यांचं कुटुंब यांचा समावेश मतदार यादी भाग क्रमांक 163 मध्ये असून मतदानाच्या दिवशी उमेदवारास प्रत्यक्षात 53 मतं मिळाल्याचं फॉर्म 17-C भाग 2 मध्ये दिसून येते. म्हणजेच सदर केंद्रावर उमेदवाराला फक्त 2 मतं मिळाल्याच्या तक्रारीत कोणतंही तथ्य नसल्याचे दिसून येते. यावरून स्पष्ट होते की, संबंधित आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही." असं स्पष्टीकरण बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं दिलं आहे.

हेही वाचा :

  1. मनसेच्या उमेदवाराला केवळ दोनच मत? पराभवासाठी ईव्हीएमवर संशयाचे बोट योग्य की अयोग्य?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.