ETV Bharat / state

MLA Ashish Shelar : नैसर्गिक युती या शब्दाला भ्रष्ट म्हणणारा नेता म्हणजे उद्धव ठाकरे, आशिष शेलारांचा हल्लाबोल - Shelar criticizes Uddhav Thackeray - SHELAR CRITICIZES UDDHAV THACKERAY

MLA Ashish Shelar : "उद्धव ठाकरेंच्या पक्षानं अहमद पटेल आणि महबुबा मुफ्ती यांच्यासोबत केलेली युती त्यांना चालते. ही तुमची नैसर्गिक युती म्हणायची का? मात्र, नैसर्गिक युती होते त्याला तुम्ही भ्रष्ट म्हणता," अशी टीका भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

MLA Ashish Shelar
आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 31, 2024, 6:02 PM IST

भाजपा आमदार आशिष शेलार उद्धव ठाकरेंवर टीका करताना

मुंबई MLA Ashish Shelar : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान, सावरकर चित्रपटावरुन देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना आवाहन केलं आहे की, "राहुल गांधी जर हा चित्रपट पाहत असतील तर माझ्या खर्चानं मी चित्रपटगृह बुक करतो." यावर आज (31 मार्च) उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत "तुम्ही जर मणिपूरमध्ये जाणार असाल तर तुमचा सर्व खर्च मी करतो", अशी टीका केली आहे. दरम्यान, आता उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजपाकडून प्रतिउत्तर आलं आहे.

माझं त्यांना आव्हान : "मी उद्धवजींच्या गाडीमध्ये पेट्रोल भरतो. जर इलेक्ट्रिक कार असेल तर इलेक्ट्रिक कनेक्शन द्यायला तयार आहे. पण मणिपूर जाऊ दे. मुंबईतील मालवणी या भागात उद्धवजींनी जावं आणि तिथं आमच्या बांधवांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवावा, असं माझं त्यांना थेट आव्हान आहे", असं मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रतिउत्तर दिलं आहे. तसेच "जोपर्यंत शिवसेनेतील लोकं (शिंदे गट) त्यांच्यासोबत होती, त्यावेळी ही मंडळी सफेद होती, मात्र त्यांच्या विचारधारेपासून दूर गेल्यानंतर ही लोकं भ्रष्ट दिसायला लागली. उद्धवजी तुम्ही कॅमेऱ्याच्या लेन्स बदलता हे आम्हाला माहीत होतं, परंतु भ्रष्ट आणि अभ्रष्ट यांना बघण्याच्या दूषित लेन्स तुम्ही कधीपासून बदलायला लागला? हा आमचा तुम्हाला सवाल आहे", अशी टीका यावेळी शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

त्यांच्यासोबत तुमची युती कशी? : "तुम्ही अहमद पटेल यांच्यासोबत युती केली. तुम्ही महबूबा मुक्ती यांच्यासोबत युती केली. ही तुमची नैसर्गिक युती म्हणायची का? किंवा ही युती तुम्हाला चालते, पण नैसर्गिक युती होते त्याला तुम्ही भ्रष्ट म्हणता. नैसर्गिक या शब्दाला भ्रष्ट म्हणणारा नेता म्हणजे उद्धव ठाकरे आहे," असा हल्लाबोल आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर केला. "दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीची कारवाई झालेली आहे. त्याचे तुम्ही समर्थन करताय की विरोध करताय? हा माझा तुम्हाला सवाल आहे. दारू घोटाळा प्रकरणात केजरीवाल यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. दिल्लीत केजरीवाल यांच्यावर झालेल्या कारवाई विरोधात आज मोर्चा होतोय. यात तुम्ही सामील होणे म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री असताना रेशन दुकानामध्ये दारू विक्रीचा जो प्रस्ताव होता, तो पूर्ण झाला नाही. त्याचा राग तुम्ही मोर्चाच्या माध्यमातून तर काढत नाही ना?" असा खोचक सवाल आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

स्वबळावर निवडणूक लढवा : "मोदी का परिवार म्हणजे संपूर्ण देश आहे, पण उद्धवजी तुमचा परिवार कोण आणि किती आहे ते सांगा. कारण तुम्ही स्वतःच्या भावा विरोधात तुम्हाला कोर्टात जावं लागलं. स्वतःच्या चुलत भावाला तुम्ही घरातून बाहेर काढलं. तुमच्या कुटुंबातील तुमच्या वहिनी तुम्हाला सोडून दुसरीकडे गेल्या. या सर्वांची उत्तरं तुम्ही आम्हाला देणार आहात का? हा माझा नम्रपणे आपल्याला सवाल आहे", असेही शेलार म्हणाले. "उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने स्वबळावर कधीच निवडणूक लढवली नाहीये. त्यामुळे त्यांनी अन्य पक्षाची साथ सोडावी आणि स्वतःच्या हिंमतीवर, स्वबळावर निवडणूक लढवावी, असं माझं उद्धव ठाकरेंना आव्हान आहे" असं शेलार म्हणाले.

हेही वाचा :

  1. पंतप्रधान मोदींची लोकसभा निवडणुकीसाठी "मॅच फिक्सिंग", रामलीला मैदानातून राहुल गांधींचा घणाघात - INDIA Bloc Maharally LIVE Updates
  2. अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नणंद-भावजयांचा प्रचार सुरू; दोघींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास - Supriya vs Sunetra
  3. भाजपामध्ये सगळे ठग गेल्यानं आम्ही ठगमुक्त झालो-उद्धव ठाकरे - Uddhav Thackeray In Delhi

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.