ETV Bharat / state

आगामी विधानसभा निवडणूक महायुती कोणाच्या नेतृत्वात लढणार? मंत्री चंद्रकांत पाटलांनी थेटच सांगितलं - Chandrakant Patil - CHANDRAKANT PATIL

Chandrakant Patil : लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्व राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आपली तयारी सुरू केलीय. यातच भाजपाचे नेते तथा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकांवर भाष्य केलंय.

मंत्री चंद्रकांत पाटील
मंत्री चंद्रकांत पाटील (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 13, 2024, 7:20 PM IST

Updated : Jun 13, 2024, 7:48 PM IST

कोल्हापूर Chandrakant Patil : राज्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढवणार तसंच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्रुटी भरुन काढून विधानसभेत त्या पूर्ण करु, शरद पवार जसं कार्यकर्त्यांना पंप मारतात तसं आम्ही पंप मारणार नसून वस्तुस्थितीला धरुन विचारमंथन होणार आहे, त्यामुळं विधानसभा निवडणुकीत महायुती भक्कम होऊन सर्वाधिक जागा जिंकेल, असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

उद्धव ठाकरेंवर टीका : यावेळी चंद्रकांत पाटलांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करत म्हटलं की, "माझं उद्धव ठाकरेंना प्रेमाचं विचारणं आहे की तुम्ही काय मिळवलत? तुम्ही 18 चे 9 झालात, काँग्रेस 1 ची 13 आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 4 जागेचा 8 झाला. मी नेहमी लॉजिकवर बोलत असतो आणि लॉजिक असं सांगतं की उद्धव ठाकरेंची पिछेहाट झालेली आहे. परिश्रम त्यांनी खूप घेतले, लोकसभा निवडणुकीला उध्दव ठाकरेंचा चेहरा वापरला, सगळ्यांनी अंधारात ठेवलं आणि त्यांना 9 जागेवर यश मिळालं. 2019 ला त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या मोहापाई किंवा काही राजकीय घटना घडल्या त्याच्यावर मात करुन पुढं जायचं असतं. मात्र, घडलेल्या या घटनांमुळं त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला त्यामुळं लोकांमध्ये ते आता कडक हिंदुत्ववादी राहिलेले नाहीत. प्रत्यक्षात त्यांचा पक्ष फुटला लोकसभेत अठराच्या जागा 9 आल्या आता विधानसभेत 30 चं जागा दिसत आहेत." तसंच आम्ही तिघेजण एकत्र येऊन राज्यात सरकार आणणार आहोत आणि या सरकारचे प्रमुख उद्धव ठाकरे असणार आहेत, असं संजय राऊत म्हणत आहेत. मात्र संजय राऊत हे कशाच्या आधारावर म्हणत आहेत असा सवाल ही चंद्रकांत पाटील यांनी विचारला.

भाजपाकडून पराभवावर मंथन : कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या संजय मंडलिकांचा पराभव झाल्यानंतर भाजपा आता या पराभवाची कारणं शोधत आहे. त्यात सुधारणा करत विधानसभेच्या तयारीला लागली आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः लक्ष घातलं असून कोल्हापुरातील भाजपा कार्यालयात आज दिवसभर विधानसभा मतदारसंघाप्रमाणे मॅरेथॉन बैठका पार पडल्या. यानंतर माध्यमांशी बोलताना, विधानसभा मतदारसंघात आपला परफॉर्मन्स कसा चांगला करता येईल याच्यावर विचारमंथन करण्यात आलं. 3 नोव्हेंबरच्या आसपास नवीन विधानसभा अस्तित्वात येईल, 20 ऑक्टोबरच्या दरम्यान विधानसभा निवडणुका होतील. 45 दिवस आधी प्रक्रिया सुरू होते. 5 सप्टेंबरच्या आसपास सर्व निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. यामुळं विधानसभेसंदर्भातलं नोटिफिकेशन लवकरच निघेल असं मंत्री चंद्रकांत पाटील म्हणालेत.

हेही वाचा :

  1. मनसेच्या इंजिनाची दिशा काय? विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे राज ठाकरेंचे आदेश
  2. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित, सरकारला दिला नवा अल्टिमेटम
  3. राज्यसभेची उमेदवारी डावलल्याच्या मुद्द्यावर काय म्हणाले छगन भुजबळ...

Last Updated : Jun 13, 2024, 7:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.