ETV Bharat / state

भाजपाचा उद्धव ठाकरेंवर पलटवार : ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडल्याची टीका - BJP criticizes Uddhav Thackeray

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 31, 2024, 8:08 PM IST

विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं उद्धव ठाकरे तसंच भाजपामधील वाद टोकाला पोहोचला आहे. एकतर फडणवीस राजकारणात राहतील, नाहीतर मी राहीन, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपानं आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray
देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे (Etv Bharat MH Desk)

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय. फडणवीस राजकारणात राहतील अन्यथा मी राहीन असा थेट इशारा त्यांनी वांद्रे रंगशारदा येथील बैठकीत दिला. यानंतर या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहेत. भारतीय जनता पक्षानं देखील त्यांच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार केलाय. या संदर्भात बोलताना भाजपाचे आमदार प्रसाद लाड म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी वापरलेली भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारातून मिळणारे पैसे बंद झाल्यानं ठाकरे यांचं मानसिक खच्चीकरण झालंय. त्यामुळं ते असं वक्तव्य करत असल्याची टीका लाड यांनी ठाकरेंवर केलीय.

उद्धव ठाकरेंचं मानसिक खच्चीकरण : भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंचं आव्हान स्वीकारलं आहे. देवेंद्र फडणवीस हे इशारा देण्याएवढे छोटे नेते नाहीत. मात्र, कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी अशी भाषा वापरल्यानं त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. महापालिकेतील मलिदा बंद झाला, नंतर सरकार गेलं त्यामुळं त्याचं मानसिक खच्चीकरण झालंय. शरद पवार यांचं चुकीचं मार्गदर्शन घेऊन उद्धव ठाकरे अशा प्रकारची भाषा वापरत आल्याचा आरोपही प्रसाद लाड यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केलं आहे. अशा पद्धतीची सूडाची भाषा यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात कोणीही केली नव्हती. उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणाला, संस्कृतीला, लोकशाहीलाही शोभणारं नाही. - अनिल बोंडे, खासदार भाजपा

उद्धव ठाकरेंनी दिलेलं आव्हान पोकळ : उद्धव ठाकरेंनी दिलेलं आव्हान पोकळ असल्याचा पलटवार भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील राजकारण प्रभावीपणे हाताळलंय. त्यांनी पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम केलंय. आता दोन पक्षांच्या पाठिंब्यानं महायुतीचं सरकार सक्षमपणे काम करत आहे. त्यामुळं शरद पवार तसंच उद्धव ठाकरे यांच्या मनात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कमालीचा द्वेष निर्माण झालाय. त्यामुळंच ते असं वक्तव्य करताय. पण फडणवीस सुसंस्कृत राजकारणी आहेत. ते अशा प्रश्नाना काम करून उत्तर देतात. विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळं कोण कोणाला मदत करतंय हे स्पष्ट होत आहे, असं दरेकर यांनी म्हटलंय.

ढेकर म्हणजे डरकाळी नाही : शिवसेना प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी ट्विटद्वारे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ढेकर देणं म्हणजे डरकाळी होत नाही, असं टीकास्त्र त्यांनी ठाकरेंवर सोडलं आहे. एकेकाळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शिवसैनिक ऐकत होते. आता बिचाऱ्या चिऊ काऊच्या कहाण्या ऐकून शिवसैनिक निराश झाले आहेत. फक्त त्यांना गाडा, यांना तुडवा असं म्हणत ते झुकलेत. ते आज लाइव्ह दिसले आहेत. त्यामुळं ते थेट आता निवडणूक प्रचारातच दिसतील, असा उपरोधिक टोलाही म्हात्रे यांनी ठाकरेंना लगावला आहे.

'हे' वाचलंत का :

  1. 'राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा - Uddhav Thackeray targeted Fadnavis
  2. "ही सगळी हारुन अल-रशीदची पोरं...", वेषांतरावरून संजय राऊतांचा सणसणीत टोला - sanjay raut criticise on ajit pawar
  3. अमोल मिटकरी तसंच मनसेतील वादामुळं राजकारण तापलं; मनसेचा पुन्हा मिटकरींना इशारा - MNS warning to Amol Mitkari

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.