ठाणे Badlapur assault case - बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेवर गोळीबार म्हणजे न्यायाची हत्या असल्याचं दोन अल्पवयीन पीडित मुलींचे वकील असीम सरोदे यांनी म्हटलं आहे. अक्षय शिंदेवर पोलिसांनी केलेल्या गोळीबाराची चौकशी करावी, या मागणीकरिता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं असीम सरोदे यांनी सांगितलं.
Live updates
माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बदलापूरच्या कथित एन्काउन्टरबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
- बदलापूर शाळेचे विश्वस्त कुठे आहेत? त्यांना भाजप-मिंधे सरकार का संरक्षण देत आहे?
- पत्रकाराबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वामन म्हात्रेसारख्या लोकांना संरक्षण का दिले जात आहे?
- आंदोलन करणाऱ्या नागरिकांवरील खटले परत घेणार का? त्यांना गुंडांसारखी वागणूक दिली जात होती.
- पोलीस कोणाचे संरक्षण करत होते? शाळेच्या विश्वस्तांचा भाजपशी संबंध असल्याचे समजते. त्यांचे संरक्षण केले जात आहे का?
अरे @rautsanjay61 , अरे किती खोटं बोलणार? लोकांना किती फसवणार?? आपले पाय कुठल्या शेणात आहेत ते तरी बघा ...
— Naresh Mhaske (@nareshmhaske) September 24, 2024
चार-पाच वर्षांच्या चिमूरड्यांवर बलात्कार करणारा #अक्षयशिंदे मारला गेला तर तुम्हाला पोटशूळ उठतो, त्याला आजच्या आज फाशी द्या अशी मागणी करणारे तुम्हीच ना....
कल्याण कोर्टात… pic.twitter.com/DKe0IhVhx6
खासदार राऊत यांच्या टीकेला खासदार म्हस्के यांचे प्रत्युत्तर- खासदार संजय राऊत यांनी अक्षय शिंदे याला पोलीस घेऊन जात असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला. आरोपीचे हात बांधलेले आणि तोंडावर बुरखा असताना त्यानं पोलिसांवर हल्ला केला का? कुणाला वाचविण्याकरिता शिंदे फडणवीस हा बनाव करत आहेत? महाराष्ट्राला सत्य कळायलाच हवे, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते राऊत यांनी म्हटलं. त्यावर शिवसेने शिंदे पक्षाचे नेते तथा खासदार नरेश म्हस्के यांनी राऊत यांच्यावर टीका केली. जेव्हा हैदराबादमध्ये महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे एन्काउन्टर झाले तेव्हा न्याय मिळाल्याचं तुम्हीच सामनामध्ये म्हटलं होतं, अशी खासदार म्हस्के यांनी आठवण करून दिली.
#WATCH | Akola, Maharashtra: Special Public Prosecutor in the Badlapur incident, Advocate Ujjwal Nikam says, " two chargesheets were filed against akshay shinde and police had enough proof against akshay shinde. the two victims of the rape incident identified akshay shinde as the… pic.twitter.com/eNISvddNkd
— ANI (@ANI) September 24, 2024
- आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूची चौकशी महाराष्ट्राचा गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) करणार असल्याचं अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.
- सोमवारी रात्री आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणण्यात आला. आज सकाळी न्यायाधीशांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. मृतदेहाचे शवविच्छेदन जेजे रुग्णालयातील तज्ञ तसेच फॉरेन्सिक टीमकडून करण्यात येणार आहे.
- बदलापूर घटनेतील विशेष सरकारी वकील उज्जवल निकम म्हणाले "अक्षय शिंदेविरुद्ध दोन आरोपपत्रे दाखल करण्यात आली होती. पोलिसांकडे पुरेसे पुरावे होते. बलात्काराच्या घटनेतील दोन पीडितांनी अक्षय शिंदेला आरोपी म्हणून ओळखले. हे प्रकरण न्यायालयात गेले असते तर त्याला फाशीची शिक्षा झाली असती. दुर्दैवानं अनेक नेते या घटनेवर राजकारण करत आहेत. खटल्यानंतर सत्य बाहेर येईल. बदलापूर घटनेतील अन्य आरोपींवर कारवाई करण्यात येईल."
अक्षय शिंदे हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मुंब्रा बायपासजवळ संध्याकाळी साडेसहा वाजता ठार झाला. त्यानं पोलिसांची बंदूक खेचून पोलिसांवर गोळीबार केल्याचा दावा करण्यात येत आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात आरोपी शिंदे ठार झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा बदलापूर शाळेतील चिमुकलींवरील बलात्काराचे प्रकरण चर्चेत आले.
एका राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या शैक्षणिक संस्थेसाठी हे प्रकरण अवघड झाले होते. मात्र, अशा प्रकरणामुळे लोकांचा न्याय आणि पोलिसांवर विश्वास कमी होईल- पीडितेचे वकील असीम सरोदे
वकील असीम सरोदे हे एका माध्यमांशी बोलताना म्हणाले, " दोन अल्पवयीन मुलींची बाजू मांडत असताना ठाणे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात अस्वस्थता होती. एवढेच नव्हे तर अक्षय शिंदे काम करत असलेल्या शैक्षणिक संस्थेतदेखील अस्वस्थता होती. आता दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रकरण बाजूला राहिले आहे. अक्षय शिंदे प्रकरणातून येणाऱ्या मुद्द्यांमुळे सरकारवर मोठा नकारात्मक परिणाम झाला असता. अक्षय शिंदेचे हात बांधले असताना त्यानं बंदूक कशी घेतली? तसेच पोलिसांकडील बंदूक अनलॉक कशी केली? याचं मला आश्चर्य वाटत आहे. ही एक राजकीय हत्या आहे. ती पूर्णपणे चुकीची आहे."
आरोपीच्या आईचे गंभीर आरोप-पोलिसांकडून एन्काउन्टर करून अक्षयची हत्या झाल्याचा आरोप त्याची आई आणि काका यांनी आरोप केला. या प्रकरणी न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. अक्षयची हत्या म्हणजे पोलीस आणि बदलापूरच्या शाळा व्यवस्थापनाचा कट असल्याचा आरोपदेखील त्याच्या नातेवाईकांनी केला. अक्षयच्या नातेवाईकाच्या दाव्यानुसार त्यानं पोलिसांकडून कोठडीत मारहाण झाल्याचं सांगितलं होतं. तसेच त्यानं पैशाची मागणी केली होती. अक्षयची आईनं पोलिसांसह शाळेच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले. "अक्षय हा निराश नव्हता. पोलिसांनी आमच्या मुलाला ठार केलं आहे. शाळेच्या व्यवस्थापनाची चौकशी झाली पाहिजे. पोलिसांनी त्याला काहीतरी लिहायला लावले होते. मात्र, ते काय होते, हे आम्हाला माहित नाही. तो रस्ता ओलांडताना आणि फटाके वाजविताना घाबरत होता. मग पोलिसांकडून बंदूक कशी खेचून घेईल? तो असे कधीही करणार नाही, "असा दावा आरोपीच्या आईनं केला.
पोलीस अधिकाऱ्याची खासदारांसह पोलीस आयुक्तांनी घेतली भेट- अक्षय शिंदेच्या एन्काउन्टवर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. "जी घटना घडली, ती योग्य झाली. दोन ते तीन वर्षाच्या मुलीवर हा टाकताना मागे पुढे विचार केला नाही. पोलिसांनी केलेल्या कृत्याचा समर्थन करतो. मी म्हणालो होतो, आमचं सरकार असतं त्याचं एन्काउन्टर केलं असतं शर्मिला ठाकरे यांच्याकडून दोन्ही पोलिसांना 51 हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लवकरच राज ठाकरे त्यांची भेट घेणार आहे. मध्यरात्री ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अक्षय शिंदे याचे एन्काउन्टर करणाऱ्या जखमी पोलीस अधिकाऱ्याची रुग्णालयात विचारपूस केली. पोलीस अधिकाऱ्यांची योग्य ती काळजी घ्या, पोलीस आयुक्तांनी सूचना केल्या आहेत. ज्युपिटर रुग्णालयात खासदार नरेश मस्के यांनीदेखील जखमी पोलीस अधिकाऱ्याची भेट घेतली. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या पाठिशी शिवसेना असल्याचं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा-